भारीच! गूगल मॅप्स वाचवणार पेट्रोल-डिझेल; आता भारतीयांसाठी खुले झाले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 08:32 AM2023-12-14T08:32:23+5:302023-12-14T08:39:13+5:30

गूगल मॅप्सने आपले ‘फ्युअल सेव्हिंग फिचर’ भारतात खुले केले आहे.

: गूगल मॅप्सने आपले ‘फ्युअल सेव्हिंग फिचर’ भारतात खुले केले आहे. त्याचा वापर करून वाहनचालक आता पेट्रोल-डिझेलची बचत करू शकतात.

गूगल मॅप्सचे हे फिचर आधी केवळ अमेरिका, कॅनडा आणि यूरोपमध्येच वापरले जाऊ शकत होते. ते आता भारतीयांसाठी खुले झाले आहे.

फिचर वापरकर्त्यास फोनवर ‘क्विक रूट’ सूचित करते. कार्यरत नसताना मॅप्स सर्वाधिक वेगवान मार्ग सूचवते. यात इंधन बचतीचा पर्याय दिलेला नसतो.

गूगल मॅप्स उघडा. उजव्या बाजूच्या प्रोफाईलवर क्लिक करा.सेटिंगवर, नंतर नेव्हिगेशन सेटिंग्जवर टॅप करा.

स्क्रॉल डाऊन करून ‘रूट ऑप्शन’वर टॅप करा. ‘प्रेफर फ्युअल एफिशिअन्सी रूट’ ऑन करा. यानंतर ‘इंजिन टाइप’ निवडा.