खूशखबर! पुढील वर्षी भारतात लोकांच्या पगारात होणार मोठी वाढ...? जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 02:13 PM2021-07-24T14:13:22+5:302021-07-24T14:25:17+5:30

Michael Page and Aon Plc नुसार, कोरोनाची तिसरी लाट नियंत्रणात राहिल्यास एप्रिल 2022 पासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांचा पगार मोठी वाढ होऊ शकते...

कोरोना काळात देशातील अनेक लोकांना नोकरी गमवावी लागली आहे. तर अनेकांचे पगार मोठ्या प्रमाणावर कापण्यात आले आहेत. मात्र, येणारे वर्ष लोकांसाठी अत्यंत चांगले ठरणार आहे. (Good news for employees in india may be see bigger pay rises in next year)

पुढील आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये आपल्या पगारात मोठी वाढ होऊ शकते. आता देशातील कंपन्या हळू-हळू लॉकडाउनच्या फटक्यातून सावरताना दिसत आहेत आणि अर्जदारांचा पुरवठा गरजेपेक्षा कमी आहे. यामुळे, कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होऊ शकते.

पगारात होऊ शकते 8 टक्के वाढ - Michael Page and Aon Plc नुसार, कोरोनाची तिसरी लाट नियंत्रणात राहिल्यास एप्रिल 2022 पासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांचा पगार जवळपास 8 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. सर्वेक्षणानुसार, ही पगारवाढ चालू आर्थिक वर्षाच्या तुलनेत 6-8 टक्क्यांपेक्षाही अधिक आहे.

आर्थिक वृद्धीची अपेक्षा - भारताने संपूर्ण आशियात नेहमीच सर्वाधिक वाढ नोंदविली आहे. एका रिपोर्टनुसार, पुढील दोन वर्षांपर्यंत हे कायम राहण्याची अपेक्षा आहे. मात्र, सध्या महागाई वाढल्याने यात घट नोंदविली गेली आहे.

विशेषतः कोरोना महामारीच्या काळात दैनंदिन आवश्यक वस्तूंच्या किंमतीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.

ई-कॉमर्स, फार्मास्युटिकल, आयटी आणि आर्थिक सेवा यासारख्या क्षेत्रांनी आधीच वेतन वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

या क्षेत्रांत दिसेल हाइक - Aon Plc मध्ये भारत आणि दक्षिण आशियासाठी चीफ कमर्शिअल ऑफिसर रूपंक चौधरी यांच्या मते, संघटित क्षेत्रांसाठी काही श्रमिकांच्या कमतरतेमुळे पगार वाढ करण्यात येईल, अशी आशा आहे.

Read in English