Gold Silver Rate on Gudi Padwa: गुढीपाडव्याच्या दिवशी स्वस्त झालं सोनं-चांदी; सिल्व्हरमध्ये २५०० पेक्षा अधिक घसरण, गोल्डचे रेट काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 10:54 IST2026-03-19T10:37:34+5:302026-03-19T10:54:32+5:30
Gold Silver Rate on Gudi Padwa 2026: गुढीपाडव्याच्या दिवशी सोनं आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळत आहे. लग्नसराईच्या हंगामात ही घट सर्वसामान्यांसाठी दिलासादायक ठरू शकते. पाहा काय आहेत सोन्या-चांदीचे दर.

Gold Silver Rate Gudi Padwa MCX: गुढीपाडव्याच्या दिवशी सोनं आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळत आहे. लग्नसराईच्या हंगामात ही घट सर्वसामान्यांसाठी दिलासादायक ठरू शकते. मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया म्हणजेच MCX वर १९ मार्च २०२६, गुरुवार रोजी सोन्याचा भाव १,५२,२४८ रुपये प्रति दहा ग्रॅमवर आला आहे. त्याचबरोबर चांदीचा भाव आज २,४५,१९७ रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

बुधवारी देशांतर्गत कमोडिटी मार्केटमध्ये सोन्याची किंमत १,५३,१०० रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा भाव २,४७,७०० रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. त्यानंतर आज गुरुवारी बाजार उघडल्यानंतर सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ८५२ रुपयांची आणि चांदीमध्ये प्रति किलो २५०० रुपयांहून अधिकची घसरण नोंदवण्यात आली आहे.

अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात कपात करण्यात आली नाही, त्यानंतर अध्यक्ष जेरोम पॉवेल यांचे विधान समोर आले आहे. इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावामुळे महागाई वाढण्याची शक्यता असल्याचं त्यांनी म्हटलंय. जर महागाई कमी झाली नाही, तर व्याजदरातही कपात केली जाणार नाही. मात्र, त्यांनी या वर्षाच्या अखेरीस एकदा बाजारात कपात करण्याचे संकेत दिलेत.

लग्नाचा हंगाम सुरू झाला असून जर आपण खरेदीचा विचार करत असाल, तर मोठ्या शहरांमधील आजचे दर जाणून घेणं महत्त्वाचं आहे: दिल्लीत २४ कॅरेट सोन्याची किंमत १,५७,८९० रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर १,४४,७४० रुपये आणि १८ कॅरेटची किंमत १,१८,४५० रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे. तसंच एक किलो चांदीची किंमत २,६४,९०० रुपये आहे.

आज मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा भाव १,५७,७४० रुपये प्रति १० ग्रॅम आणि १८ कॅरेट सोन्याची किंमत १,१८,३०० रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे. चांदीची किंमत २,६४,९०० रुपये प्रति किलो आहे.

चेन्नईमध्ये आज २४ कॅरेट सोन्याचा भाव १,५८,९४० रुपये प्रति १० ग्रॅम आणि २२ कॅरेट सोन्याची किंमत १,४५,६९० रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे. १ किलो चांदीची किंमत येथे २,७४,९०० रुपये आहे.

कोलकात्यात आज २४ कॅरेट सोन्याचा भाव १,५४,६४० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. २२ कॅरेट सोन्याची किंमत १,४१,७५० रुपये प्रति १० ग्रॅम असून चांदीचा भाव २,६४,९०० रुपये प्रति किलो झालाय.

















