Gold Silver Price : बऱ्याच दिवसानंतर सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 13:04 IST2025-02-12T12:52:32+5:302025-02-12T13:04:52+5:30

Gold Silver Price : बऱ्याच दिवसानंतर सोन्याच्या दरात मोठा बदल झाला आहे.

Gold Silver Price : सोनं खरदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बऱ्याच दिवसानंतर आता सोन्याचे दर कमी झाले आहेत.

Gold Silver Price : सध्या लग्नाचे मुहूर्त सुरू आहेत. अनेकजण लग्नाची तयारी करत आहेत. यात काहीजण सोन्याची खरेदी करत असतात. गेल्या काही दिवसापासून सोन्याचे दर वाढले आहेत. पण खरेदीदारांसाठी दिलासा मिळाला आहे. सोन्याचे दर कमी झाले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या धोरणांमुळे सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली होती. पण आज दर कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

मंगळवारी विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर आज सोन्याच्या किमतीत किंचित घट झाली आहे. गुड रिटर्न्सच्यानुसार, सोन्याच्या किमतीत ७०० रुपयांची घसरण झाली आहे. काल २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ८७,३८० रुपये होती, आज ती कमी होऊन ८६,६७० रुपये झाली आहे. या किमतीमध्ये बदल होऊ शकतात.

सोन्याच्या किमती घसरण्याचे कारण नफा बुकिंग असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गुंतवणूकदारांनी नफा बुक केला आहे, हे एक चांगले धोरण आहे.

देशातील सोन्याच्या किमती फक्त मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून नसतात, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या घडामोडींवर देखील त्यांचा परिणाम होतो.

लंडन ओटीसी स्पॉट मार्केट आणि COMEX गोल्ड फ्युचर्स मार्केटसह प्रमुख जागतिक बाजारपेठांमधील व्यापारावर सोन्याच्या किमती मोठ्या प्रमाणात प्रभावित होतात.

जगभरात सोन्याची किंमत लंडन बुलियन मार्केट असोसिएशनद्वारे ठरवल्या जातात. ते सोन्याची किंमत अमेरिकन डॉलरमध्ये प्रसिद्ध करतात. आपल्या देशात, इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन सोन्याच्या आंतरराष्ट्रीय किमतींमध्ये आयात शुल्क आणि इतर कर जोडतात आणि किरकोळ विक्रेत्यांना सोने कोणत्या दराने दिले जाईल हे ठरवतात.