Gold Rate Today: सणासुदीच्या कालावधीत सोन्याला झळाळी; दर ५२ हजारांच्या जवळ, चांदीही महागली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 02:28 PM2022-10-06T14:28:56+5:302022-10-06T14:33:00+5:30

सोन्या-चांदीच्या भावात गुरुवारी मोठी उसळी पाहायला मिळाली.

सोन्या-चांदीच्या भावात गुरुवारी मोठी उसळी पाहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर गुरुवारी सकाळी 11:44 वाजता, डिसेंबर 2022 मध्ये डिलिव्हरीसाठी सोने 276 रुपयांनी म्हणजेच 0.53 टक्क्यांनी वाढून 51,922 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करत होते.

मागील सत्रात डिसेंबर करारासाठी सोन्याचा दर 51,646 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. त्याचप्रमाणे, फेब्रुवारी 2023 मध्ये डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव 254 रुपये म्हणजेच 0.49 टक्क्यांच्या वाढीसह 52,117 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. यापूर्वी, गेल्या सत्रात, फेब्रुवारीच्या करारातील सोन्याचा भाव 51,863 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) डिसेंबर 2022 मध्ये डिलिव्हरीसाठी चांदी 775 रुपये म्हणजेच 1.28 टक्क्यांच्या वाढीसह 61,542 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत होती. मागील सत्रात डिसेंबर करारातील चांदीचा भाव प्रतिकिलो 60,767 रुपये होता.

त्याचप्रमाणे मार्च 2023 मध्ये डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव 828 रुपये किंवा 1.34 टक्क्यांनी वाढून 62,768 रुपये प्रति किलो झाला. मागील सत्रात, मार्च करारासह सोन्याचा दर 61,940 रुपये प्रति किलो होता.

कॉमेक्सवर, डिसेंबर 2022 मध्ये डिलिव्हरीसाठी सोने 0.54 टक्क्यांच्या वाढीसह 1,730.10 डॉलर्स प्रति औंस पातळीवर व्यवहार करत होते. त्याचप्रमाणे चांदीचा भाव स्पॉट मार्केटमध्ये 0.33 टक्क्यांनी वाढून 1,721.91 डॉलर्स प्रति औंस या पातळीवर होता.

कॉमेक्सवर, डिसेंबर 2022 मध्ये डिलिव्हरीसाठी चांदी 1.39 टक्क्यांच्या वाढीसह 20.83 डॉलर्स प्रति औंसवर व्यापार करत होती. त्याचप्रमाणे स्पॉट मार्केटमध्ये चांदी 0.69 टक्क्यांच्या वाढीसह 20.79 डॉलर प्रति औंसच्या पातळीवर व्यवहार करत होती.