Gold Rate Today: अशी संधी पुन्हा नाही! सोन्याचे दर पुन्हा घसरले, पटापट चेक करा लेटेस्ट रेट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 03:57 PM2023-03-06T15:57:12+5:302023-03-06T16:03:16+5:30

Gold Rate Today: जर तुम्ही सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

Gold Rate Today: जर तुम्ही सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोनं-चांदीचे गगनाला भिडले असून आता या दरात थोडा दिलासा मिळाल्याचे दिसत आहे.

आज सोन्याचा भाव ५६,१०८ रुपये प्रति १० ग्रॅम तर चांदी ६४,२९३ रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्या-चांदीचे दर करमुक्त आहेत, त्यामुळे देशातील बाजारातील दरांमध्ये तफावत आहे.

या व्यावसायिक सप्ताहाच्या पहिल्या दिवशी आज सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे. आज, सोमवारी सोन्याच्या दरात १० ग्रॅममागे ५ रुपयांची किरकोळ वाढ झाली आहे, तर चांदीच्या दरात १५४ रुपयांनी वाढ झाली आहे. यानंतर आज सोने ५६,१०८ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी ६४,२९३ रुपये प्रति किलोने विकले जात आहे.

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज ६ मार्च रोजी सोनं प्रति दहा ग्रॅम ५ रुपयांनी महागले आहे आणि ५६,१०८ रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​व्यवहार करत आहे.

तर शुक्रवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याचा भाव १६ रुपये प्रति १० ग्रॅमने महागले होते आणि ५६,१०३ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाला.

चांदी आज १५४ रुपयांच्या वाढीसह ६४,२९३ रुपये प्रति किलो दर आहे.

तर शुक्रवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदी ४३३ रुपयांनी महागली आणि ६४,१३९ रुपये प्रति किलोवर बंद झाली.

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन प्रमाणेच आज कमोडिटी एक्सचेंजवर सोने आणि चांदी तेजीत आहे. MCX वर सोने १८१ रुपयांनी महागून ५५,९०२ रुपयांवर आहे, तर चांदी ३४९ रुपयांच्या उसळीसह ६४,७५० रुपयांवर व्यवहार करत आहे.