Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा वाढ; पाहा किती रूपयांनी वाढले दर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 09:15 PM2021-06-11T21:15:05+5:302021-06-11T21:19:09+5:30

Gold, Silver Price : शुक्रवारी सोनं आणि चांदीच्या किंमतीत तेजी दिसून आली.

Gold Price: शुक्रवारी सोन्या-चादींच्या किंमतीत तेजी दिसून आली. सोन्या चांदीच्या वाढलेल्या मागणीमुळे सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाली.

दिल्लीतील सर्राफा बाजारात शुक्रवारी सोन्याचे दर ४४१ रूपयांनी वाढून ४८,५३० रुपये प्रति १० ग्राम इतके झाले. एचडीएफसी सिक्युरिटीजनं यासंदर्भातील माहिती दिली.

यापूर्वी गुरुवारी सोन्याचे दर ४८,०८९ प्रति १० ग्रामवर बंद झाले होते. याप्रमाणे चांदीच्या दरातही १,१४८ रूपयांची वाढ दिसून आली. या तेजीनंतर चांदीचे दर ७१,४३२ रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे. यापूर्वी गुरूवारी चांदीचा दर ७०,२८४ रूपये होता.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात शुक्रवारी किरकोळ घसरण झाली. त्यानंतर सोन्याचा दर १,८९६ डॉलर्स प्रति औसवर आला. तर चांदीचा दर २८.१५ डॉलर्स प्रति औसवर जवळपास स्थिर राहिला.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या चांदीच्या किंमतीवर होणारा परिणाम डोमेस्टीक मार्केटवरही पडतो. मागणी वाढल्यामुळे स्थानिक वायदा बाजारात सोन्याचा दर ५६ रूपयांच्या तेजीसह ४९,२५४ प्रति १० ग्रामवर पोहोचला.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये ऑगस्ट महिन्यात पुरवल्या जाणाऱ्या सोन्याच्या दरात ५६ रुपयांची म्हणजेच ०.११ टडक्क्यांची वाढ झाली असून दर ४९,२५४ रूपये प्रति १० ग्राम इतके झाले. यामध्ये ११,५५९ लॉचसाठी व्यवहार झाला.

चांदीचीही मागणी वाढल्यामुळे वायदा बाजारात शुक्रवारी चांदीच्या दरात ४७७ रूपयांची वाढ झाली. यानंतर चांदीची दर ७२,४७६ रूपये प्रति किलोवर पोहोचले. २०२० मध्येही सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळाली होती.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजाराऐवजी गुंतवणूकदारांनी आपला कल सोन्यातील गुंतवणुकीकडे वळवला होता. त्यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं होतं.