Gold Price : अरे व्वा... आज 2700 रुपयांनी स्वस्त मिळतंय सोनं, किमतीत मोठी घसरण! पटापट चेक करा लेटेस्ट रेट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 01:33 PM2023-02-22T13:33:47+5:302023-02-22T13:43:06+5:30

याशिवाय चांदीच्या दरातही 0.28 टक्क्यांनी म्हणजेच 230 रुपयांनी घसरण होऊन 65866 रुपये प्रति किलोग्रॅमवर आले आहे.

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जर आपणही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर यावेळी आपल्याला स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी आहे. कारण सध्या सोन्याच्या दरात सातत्याने घसरताना बघायला मिळत आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेन्जवर सोन्याचा दर 56 हजार रुपयांच्या जवळपास ट्रेड करत आहे. तसेच, चांदीचा दरही 65,800 च्या जवळपास आहे. जर आपणही सोन्याची ज्वेलरी खरेदीचा विचार करत असाल, तर जाणून घ्या आजचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव.

2700 रुपयांनी स्वस्तात मिळतंय सोनं - मल्टी कमोडिटी एक्सचेन्जवर सोन्याचा दर 0.09 टक्क्यांच्या घसरणीसह 56120 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर ट्रेड करत आहे. महत्वाचे म्हणजे, यावेळी वायदा बाजारात सोने अपल्या विक्रमी उच्च पातळीपेक्षा 2,700 रुपयांनी स्वस्त झाले आहे. तसेच, गेल्या ट्रेडिंग सेशनमध्ये सोने 56,471 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले.

चांदीही झाली स्वस्त - याशिवाय चांदीच्या दरातही 0.28 टक्क्यांनी म्हणजेच 230 रुपयांनी घसरण होऊन 65866 रुपये प्रति किलोग्रॅमवर आले आहे.

ग्लोबल मार्केटमध्येही सोनं स्वस्त - ग्लोबल मार्केटसंदर्भात बोलायचे झाल्यास, यूएस मार्केटमध्ये सोन्याच्या दरात घसरण बघायला मिळाली आहे. यूएस गोल्ड 0.42 टक्क्यांच्या घसरणीसह 1,842.50 डॉलर प्रति औंसवर आले आहे. सिल्वर फ्यूचर 1.44% च्या तेजीसह 22.027 डॉलर प्रति औंस वर होते.

चेक करा आपल्या शहरातील रेट - आपण घरबसल्याही सोन्याचा दर चेक करू शकतात. इंडियन बुलियन अँड ज्वैलर्स असोसिएशननुसार आपण केवळ 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन दर जाऊन घेऊ शकतात. आपण ज्या क्रमांकावरून मेसेज करता त्याच क्रमांकावर आपल्याला मैसेज येईल.

लक्षात असू द्या ही महत्वाची गोष्ट - जर आपण सोनं खरेदीसाठी बाजारात जात असाल तर हॉलमार्क बघूनच सोनं खरेदी करा. सोन्याची शुद्धता चेक करण्यासाठी आपण सरकारी अॅपचाही वापर करू शकता. ‘BIS Care app’ च्या माध्यमाने आपण सोन्याची शुद्धता चेक करू शकता. याशिवाय याच अॅपच्या माध्यमाने आपण तक्रारही करू शकता.