शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

संकटात संधी! घरबसल्या झाले १ लाखाचे १० लाख; ‘या’ शेअरमुळे गुंतवणूकदारांचा भरघोस नफा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 5:26 PM

1 / 10
मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून शेअर बाजार उच्चांकी पातळीवर असल्याचे पाहायला मिळाले. बुधवारी शेअर बाजाराच्या तेजीला काहीसा ब्रेक लागला होता.
2 / 10
अदानी समूहातील अनेक कंपन्यांचे एका वृत्तामुळे मोठे नुकसान झाले. अदानी समूहाच्या गौतम अदानी यांनाही मोठा फटका सहन करावा लागला आहे.
3 / 10
मात्र, या चढ-उताराच्या काळात एका कंपनीच्या शेअरने उच्चांक गाठला असून, गुंतवणूकदारांना भरघोस नफा मिळवून दिला आहे. कोरोना संकटामुळे अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत असले, तरी या कंपनीचे शेअर घेतलेल्या गुंतणूकदारांना लॉटरी लागल्याचे पाहायला मिळत आहे.
4 / 10
गोदावरी पॉवरच्या (Godawari Power) या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना भरघोस नफा मिळवून दिला आहे. वर्षभरापूर्वी गुंतवणूकदारांनी या कंपनीत १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल, तर ती आता ९.९६ लाख रुपये झाली आहे.
5 / 10
या कंपनीचे शेअर्स केवळ एका वर्षात अनेक पटीने वाढले आहेत. वर्षभरात गोदावरी पॉवर स्टॉक ८९६ टक्क्यांनी वाढला आहे. १७ जून २०२० रोजी या शेअरची किंमत १५८.६५ रुपये होती, ती १५ जून रोजी १५६१.९५ रुपये झाली आहे.
6 / 10
मुंबई शेअर बाजारात गोदावरी पॉवरचे शेअर्सची किंमत १५६१.९५ रुपये असून, ती ५२ आठवड्यांतील उच्चांकापर्यंत पोहोचली आहे.
7 / 10
गोदावरी पॉवरचे शेअर्स ५ दिवस, २० दिवस, ५० दिवस, १०० दिवस आणि २०० दिवसाच्या त्यांच्या डेली मूव्हिंग एव्हरेजच्या वर ट्रेड करत आहेत. कंपनीच्या समभागात झालेल्या या तेजीमुळे त्याची मार्केट कॅप ५ हजार कोटी रुपयांवर गेली आहे.
8 / 10
छत्तीसगडच्या या वीज कंपनीमो परतावा देण्याच्या बाबतीत आपल्या सर्व प्रतिस्पर्धी कंपन्यांपेक्षा खूप मागे सोडले आहे. गोदावरी पॉवरच्या शेअर्समध्ये मजबूत फायनान्शियल रिझल्ट्समुळे वाढ झाल्याचे सांगितले जात आहे.
9 / 10
गेल्या एक वर्षात जेएसडब्ल्यू स्टीलच्या शेअर्समध्ये ५९ टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये २८३.७४ टक्के, SAIL चे शेअर्समध्ये ३७१ टक्के आणि हिंडाल्को इंडस्ट्रीजमध्ये १६९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
10 / 10
गोदावरी पॉवरचा गेल्या आर्थिक महिन्याच्या चौथ्या तिमाहीतील नफा ८७९ टक्के वाढून ३२६.९५ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत तो ३३.३७ कोटी रुपये होता. कंपनीच्या विक्रीत ६० टक्के वाढ झाल्याचे सांगितले जात आहे.
टॅग्स :share marketशेअर बाजार