आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
By जयदीप दाभोळकर | Updated: July 31, 2025 09:37 IST2025-07-31T09:26:32+5:302025-07-31T09:37:01+5:30
EPFO Investment Tips: तुम्ही सरकारी नोकरी करत असाल किंवा खाजगी, प्रत्येकाला चांगल्या भविष्याची चिंता असते. पण जर आपण असं म्हटलं की तुमच्या पीएफच्या पैशातून तुम्हाला निवृत्तीपर्यंत कोट्यवधींचा निधी मिळेल तर? जाणून घेऊया संपूर्ण कॅलक्युलेशन.

EPFO Investment Tips: तुम्ही सरकारी नोकरी करत असाल किंवा खाजगी, प्रत्येकाला चांगल्या भविष्याची चिंता असते. हेच कारण आहे की लोक म्युच्युअल फंड, शेअर बाजार आणि विविध प्रकारच्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात, जेणेकरून त्यांना निवृत्तीच्या वेळी चांगला निधी मिळेल. पण जर आपण असं म्हटलं की तुमच्या पीएफच्या पैशातून तुम्हाला निवृत्तीपर्यंत कोट्यवधींचा निधी मिळेल तर? जाणून घेऊया संपूर्ण कॅलक्युलेशन.
ईपीएफ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ही एक अशी गुंतवणूक आहे जी प्रत्येक नोकरदार व्यक्तीच्या पगारातून आपोआप कापली जाते आणि दीर्घकाळात ती एक मोठा फंड बनते. सोप्या भाषेत सांगायचं तर, जर तुमचा मूळ पगार ३० हजार रुपये असेल आणि तुम्ही ईपीएफमध्ये १२% योगदान देत असाल, तर तुम्ही निवृत्तीच्या वेळेपर्यंत २ कोटी १७ लाख २४ हजार ७३७ रुपयांचा निधी तयार करू शकता.
असं गृहीत धरलं की तुमचं सध्याचं वय २५ वर्षे आहे आणि तुम्ही वयाच्या ६० वर्षापर्यंत काम कराल. याशिवाय, EPF वरील वार्षिक व्याजदर ८.२५% निश्चित केला आहे (जो वेळेनुसार बदलूही शकतो) आणि दरवर्षी तुमच्या पगारात ५% वाढ देखील जोडलं आहे. यासोबतच, कंपनीकडून मिळालेले ३.६७% योगदान देखील त्यात जोडलं गेलंय.
अशा परिस्थितीत, जेव्हा तुम्ही एक्सटर्नल ईपीएफ कॅल्क्युलेटर वापरून एकूण गणना करता तेव्हा तुम्हाला कळेल की ३५ वर्षांत तुम्ही एकूण ५४ लाख ६ हजार १६८ रुपये योगदान दिलं आहे. यावर व्याजाच्या स्वरूपात तुम्हाला १ कोटी ६३ लाख १८ हजार ५६९ रुपयांचा फायदा मिळाला. अशाप्रकारे, तुमच्या निवृत्तीच्या वेळेपर्यंत, हा निधी एकूण २ कोटी १७ लाख रुपयांपेक्षा जास्त होईल.
या उदाहरणावरून असं दिसून येतं की तुमचं उत्पन्न कमी असलं तरीही, जर तुम्ही नियमितपणे ईपीएफमध्ये योगदान दिलं आणि ते मध्ये काढलं नाही तर निवृत्तीच्या वेळेपर्यंत तुम्ही एक मोठा फंड उभा करू शकता. ईपीएफची खासियत म्हणजे चक्रवाढीद्वारे रक्कम वेगानं वाढते.
आजच्या महागाई आणि भविष्यातील अनिश्चितता लक्षात घेता, ईपीएफ सारखा सुरक्षित आणि परतावा देणारा गुंतवणूक पर्याय अत्यंत महत्त्वाचा बनला आहे. विशेषतः खाजगी नोकरी करणाऱ्यांसाठी, निवृत्तीनंतर आर्थिक स्वातंत्र्याचा हा एक मजबूत स्रोत बनू शकतो.
येथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ईपीएफचा फायदा घेण्यासाठी, तुम्ही त्यात अधूनमधून पैसे काढणं टाळलं पाहिजे. याशिवाय, तुम्ही नोकरी बदलली तरीही, तुमचा ईपीएफ ट्रान्सफर करत रहा आणि तो तुमच्याकडेच राहू द्या. यासोबतच, दरवर्षी EPFO पोर्टल किंवा अॅपवर तुमचे योगदान आणि व्याजाची माहिती तपासत राहा.