₹644 वरून आपटून ₹2 वर आला शेअर, आता खरेदीसाठी उडालीय गुंतवणूकदारांची झुंबड; कंपनीवर आहे कर्जाचा डोंगर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 14:43 IST2024-04-07T14:30:20+5:302024-04-07T14:43:53+5:30
बऱ्याच दिवसांपासून या कंपनीचा शेअरची किंमत 5 रुपयांच्याही खाली आहे.

दिग्गज बिझनेसमन किशोर बियाणी यांच्या फ्युचर ग्रुपच्या बहुतांश कंपन्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात आहेत. याचा परिणाम कंपन्यांच्या शेअर्सवरही दिसून आला आहे. अशीच एक कंपनी म्हणजे, फ्युचर रिटेल लिमिटेड. बऱ्याच दिवसांपासून या कंपनीचा शेअरची किंमत 5 रुपयांच्याही खाली आहे.

किती आहे शेअरची किंमत - गेल्या शुक्रवारी फ्यूचर रिटेल लिमिटेडच्या शेअरची किंमत 2.59 रुपये एवढी होती. या शेअरमध्ये गेल्या 2.47 रुपयांच्या क्लोजिंगच्या तुलनेत 4.86% ची तेजी दिसून आली. महत्वाचे म्हणजे, नोव्हेंबर 2017 मध्ये या शेअरची किंमत 644 रुपयांवर पोहोचली होती.

फ्यूचर रिटेलच्या कमिटी ऑफ क्रेडिटर्सची (CoC) बैठक 22 मार्चला पार पडली. ही 30 वी बैठक होती, अशी माहिती कंपनीने स्टॉक एक्सचेन्जला दिली आहे.

कंपनीवर कर्जाचा डोंगर - फ्यूचर रिटेलवर कर्जाचा मोठा डोंगर आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने 2020 मध्ये फ्यूचर ग्रुपच्या किरकोळ, घाऊक, लॉजिस्टिक आणि वेअरहाउसिंग व्यवसायाचे ₹24,713 कोटी रुपयांमध्ये अधिग्रहण करण्याची घोषणा केली होती. मात्र, मालकी हक्काच्या वादानंतर, रिलायन्स इंडस्ट्रीजने हा करार रद्द केला.

यानंतर, रिलायन्स रिटेलने शेकडो फ्युचर रिटेल स्टोअर्स लीजवर घेतले आहेत.

फ्यूचर रिटेलवर बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील कर्जदारांचे ₹19,000 कोटींहून अधिकचे देणे आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)


















