NPS पासून फास्टॅगपर्यंत; १ फेब्रुवारीपासून बदलणार हे पाच नियम, खिशावर होणार थेट परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 08:30 PM2024-01-25T20:30:39+5:302024-01-25T20:35:47+5:30

Change From February 1 2024: नव्या वर्षातील पहिला महिना बघता बघता संपत आला आहे. आता फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला विविध क्षेत्रांमध्ये काही बदल होणार आहेत. त्याबरोबरच १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्याचा परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. आता आपण १ फेब्रुवारीपासून होणाऱ्या काही महत्त्वाच्या बदलांबाबत जाणून घेऊयात.

नव्या वर्षातील पहिला महिना बघता बघता संपत आला आहे. आता फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला विविध क्षेत्रांमध्ये काही बदल होणार आहेत. त्याबरोबरच १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्याचा परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. आता आपण १ फेब्रुवारीपासून होणाऱ्या काही महत्त्वाच्या बदलांबाबत जाणून घेऊयात.

PFRDAकडून नॅशन पेन्शन सिस्टिममध्ये १ फेब्रुवारीपासून बदल होणार आहे. नॅशनल पेन्शन सिस्टिमकडून खात्यातून रक्कम काढण्याच्या नियमामध्ये बदल करण्यात आला आहे. नव्या नियमानुसार खातेधारकाला एकूण जमा रकमेपैकी २५ टक्के रक्कमच काढता येणार आहे. यात खातेदार आणि कंपनी या दोघांनीही दिलेल्या रकमेचा समावेश असेल.

१ फेब्रुवारीपासून आयएमपीएसच्या नियमामध्ये मोठा बदल होणार आहे. आता तुम्ही तारखेशिवाय लाभार्थ्याचं नाव जोडून थेट बँकेतून खात्यामध्ये ५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम ट्रान्सफर करू शकता. NPCI ने दिलेल्या माहितीनुसार आता केवळ फोन नंबर आणि बँक खात्याचं नाव टाकून पैसे पाठवता येतील.

सध्या एसबीआयकडून स्पेशल होमलोन अभियान चालवलं जात आहे. त्याअंतर्गत स्वस्त होमलोन मिळू शकतं. एसबीआयच्या संकेतस्थळानुसार या ऑफरअंतर्गत बँक ६५ बीपीएसपर्यंतची सवलत देऊ शकते. ही सवलत सर्व होमलोनसाठी लागू आहे.

पंजाब अँड सिंध बँखेचे ग्राहक ‘धनलक्ष्मी ४४४ दिवस’ एफडी सुविधेचा फायदा ३१ जानेवारी २०२४ पर्यंत घेऊ शकतील. १ फेब्रुवारीनंतर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही. यामध्ये सामान्य ग्राहकांसाठी ७.४ टक्के दराने व्याज मिळत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना ७.९ टक्के आणि सुपर सिनियर सिटीझन्सना ८.०५ दराने व्याज मिळत आहे.

जर तुम्ही फास्टॅगचा वापर करत असाल तर तुम्हाला त्याची केवायसी ३१ जानेवारीपूर्वी पूर्ण करावी लागेल. रिझर्व्ह बँकेकडून याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जर तुमच्या फास्टॅगची केवायसी झाली नसेल तर त्याला बॅन किंवा ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं जाईल.