श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 12:23 IST2025-10-09T11:50:07+5:302025-10-09T12:23:23+5:30
Forbes India Rich List : फोर्ब्सने नुकतीच भारतातील १०० सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. कॉर्पोरेट आणि उद्योजक क्षेत्रातील दिग्गजांनी या यादीत आपले स्थान कायम राखले आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी $१०५ अब्ज (सुमारे ८.७ लाख कोटी रुपये) संपत्तीसह पहिल्या स्थानावर टिकून आहेत. ते 'सेन्टिबिलियनेअर' म्हणून ओळखले जातात.
अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी हे ९२ अब्ज डॉलर संपत्तीसह देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून कायम आहेत.
ओ.पी. जिंदल समूहाच्या सावित्री जिंदाल ४०.२ अब्ज डॉलर संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर पोहोचल्या आहेत. यासह त्या भारतातील सर्वात श्रीमंत महिला ठरल्या आहेत.
सावित्री जिंदाल यांच्या निव्वळ संपत्तीत $३.५ अब्जची (सुमारे २९ हजार कोटी रुपये) घसरण झाली असली तरी, त्यांनी तिसरे स्थान राखले आहे.
सुनील मित्तल (भारती एअरटेल) यांनी मोठी प्रगती करत तीन स्थानांची झेप घेतली असून ते आता चौथ्या क्रमांकावर पोहोचले आहेत.
सुनील मित्तल यांच्या निव्वळ संपत्तीत $३.५ अब्जची वाढ झाली असून, त्यांची एकूण संपत्ती $३४.२ अब्ज इतकी झाली आहे.
एचसीएल टेकचे संस्थापक शिव नादर हे चौथ्या स्थानावरून घसरून आता पाचव्या क्रमांकावर आले आहेत. त्यांची एकूण संपत्ती $३३.२ अब्ज आहे.
डी-मार्टचे संस्थापक राधाकिशन दमानी हे $२८.२ अब्ज संपत्तीसह श्रीमंतांच्या यादीत सहाव्या स्थानावर कायम आहेत.
फार्मा उद्योगातील मोठे नाव असलेले दिलीप सांघवी हे $२६.३ अब्ज संपत्तीसह सातव्या क्रमांकावर आहेत.
भारतीय उद्योगातील प्रतिष्ठित बजाज कुटुंबीय $२१.८ अब्ज संपत्तीसह देशातील टॉप १० श्रीमंत व्यक्तींमध्ये आठव्या स्थानावर आहेत.
तर सायरस पुनावाला २१.८ अब्ज डॉलरसह नवव्या आणि कुमार बिर्ला २०.७ डॉलर्ससह १० क्रमांकावर विराजमान आहेत.