1 जुलैपासून 'या' गोष्टी बदलल्यामुळे सामान्यांच्या जीवनावर झाला परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 02:31 PM2019-07-01T14:31:39+5:302019-07-01T16:08:39+5:30

आज 1 जुलैपासून अनेक नियमात बदल होणार आहेत. ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर पडणार आहे. काही वस्तू महाग होतील तर काही स्वस्त होतील. आजपासून Paytm सेवेचा लाभ घेणे महागात पडणार आहे. कारण Paytm व्यवहार करणाऱ्यांवर 1 टक्के, 0.90 टक्के सरचार्ज लागणार आहे.

महिंद्राच्या कार खरेदी करत असाल तर आजपासून 36 हजार रुपये जास्तीचे मोजावे लागणार आहेत. कंपनीने कच्च्या मालाची किंमत वाढल्याने तसेच अत्याधुनिक सुविधांमध्ये वाढ केल्याने गाड्यांच्या किंमतीत वाढ केली आहे.

इंडिगोमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ऐनवेळी तिकीट रद्द केलं तर त्यांना फटका बसणार आहे. जर तुम्ही प्रवासाच्या तारखेपासून 3 दिवसांच्या आत तिकीट रद्द केलं तर 3 हजार 500 ते 3 हजार रुपये फी कॅन्सलेशन चार्ज द्यावा लागणार आहे.

आरबीआयकडून RTGF आणि NEFT मधून होणाऱ्या ऑनलाइन व्यवहारांवरील सर्व चार्ज हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे 2 लाखांपर्यंत व्यवहारात कोणताही टॅक्स लागणार नाही

आजपासून रेपो रेटमध्ये घट झाल्याने SBI चं गृहकर्ज स्वस्त होणार आहे. एसबीआयच्या स्टेटमेंटनुसार आरबीआयकडून 25 बीपीएसमध्ये घट केल्याने कॅश क्रेडिट अकाऊंट आणि ओवर ड्राफ्ट ग्राहकांना 1 लाखापेक्षा जास्त मर्यादेवर व्याजदर कमी होणार आहे.

आजपासून दिल्लीत विनाअनुदानित घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 100 रुपयांनी घट होणार आहे. त्यामुळे विनाअनुदानित गॅस सिलेंडर 637 रुपयांना मिळेल.

बेसिक सेविंग बॅंक अकाऊंट(BSBD)च्या नियमात बदल झाले आहेत. त्यामुळे सामान्य बँक ग्राहकांना चेक बूक आणि अन्य सुविधा मिळतील. ऑनलाइन बँकिंगवरही चार्ज आकारण्यात येणार नाही. सरकारी योजनांचे पैसे काढण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी चार्ज लागणार नाही.

टॅग्स :पैसाMONEY