शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

वडील शेतकरी, बिझनेसशी दूर-दूर पर्यंत संबंध नाही; मुलानं उभं केलं ६७,५०० कोटींचं साम्राज्य

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 8:42 AM

1 / 8
जिद्द असेल आणि तुमची मेहनत करण्याची तयारी असेल तर तुम्ही नक्कीच यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकता. पीपी रेड्डी हे त्यापैकीच एक. पीपी रेड्डी हे इंजिनिअरिंग आणि कंस्ट्रक्शन क्षेत्रातील दिग्गज आहेत. देशातील श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांचं नाव गणलं जातं. फोर्ब्सनुसार त्यांची एकूण नेटवर्थ १६,५९१ कोटी रुपये आहे.
2 / 8
जिद्द असेल आणि तुमची मेहनत करण्याची तयारी असेल तर तुम्ही नक्कीच यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकता. पीपी रेड्डी हे त्यापैकीच एक. पीपी रेड्डी हे इंजिनिअरिंग आणि कंस्ट्रक्शन क्षेत्रातील दिग्गज आहेत. देशातील श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांचं नाव गणलं जातं. फोर्ब्सनुसार त्यांची एकूण नेटवर्थ १६,५९१ कोटी रुपये आहे.
3 / 8
इंजिनिअरिंग आणि कन्स्ट्रक्शन उद्योगातील ३६० वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२३ मध्ये त्यांने अव्वल स्थान पटकावलं. पीपी रेड्डी यांना त्यांच्या व्यवसायाचा वारस्यानं मिळालेला नाही. ते एका सामान्य शेतकरी कुटुंबातील आहेत. ते त्यांच्या आई-वडिलांचा पाचवा मुलगा आहे. चला तर मग जाणून घेऊया त्यांचा प्रवास.
4 / 8
पीपी रेड्डी यांच्या आधी त्यांच्या कुटुंबातील कोणीही व्यवसाय केला नव्हता. १९८९ मध्ये रेड्डी यांनी स्वबळावर मोठी झेप घेतली. अवघ्या दोन कर्मचाऱ्यांसह त्यांनी मेघा इंजिनिअरिंग एंटरप्रायझेसचा पाया रचला. गेल्या ३४ वर्षांत त्यांच्या कंपनीनं यशाचं शिखर गाठलं आहे.
5 / 8
दरम्यान, यामुळे पीपी रेड्डी यांची गणना आता देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींमध्ये केली जाते. १३ फेब्रुवारी २०२४ पर्यंत, मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चरचं (MEIL) बाजार मूल्य ६७,५०० कोटी रुपये होतं. यात २०२३ मध्ये २२.१% वाढ नोंदवली गेली.
6 / 8
पीपी रेड्डी यांचा जन्म १९५३ मध्ये तेलंगणातील शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी १९७६ मध्ये अभियांत्रिकीची पदवी मिळवली. यानंतर ते एका बांधकाम कंपनीत काम करू लागले. १९८९ मध्ये त्यांनी MEIL ची स्थापना केली. तेव्हापासून कंपनीनं झपाट्यानं प्रगती केली. आता ती भारतातील सर्वात मोठ्या इंजिनिअरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांपैकी एक बनली आहे.
7 / 8
छोट्या पाईप्सपासून सुरुवात करून कंपनीनं हळूहळू आपली व्याप्ती वाढवली. भारतातील सर्वात मोठ्या उपसा सिंचन प्रकल्पासारखे प्रकल्प सुरू केले. रस्ते, धरणं आणि नैसर्गिक वायू वितरण नेटवर्क बांधण्याव्यतिरिक्त, कंपनी मोठे पायाभूत सुविधा प्रकल्प उभारण्यात एक प्रमुख प्लेयर बनली आहे.
8 / 8
पीपी रेड्डी यांच्या कंपनीनं तेलंगणातील कलेश्वरम उपसा सिंचन प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केला. त्याची किंमत १४ अब्ज डॉलर्स आहे. 'नदीचं रुंदीकरण' म्हणून ओळखला जाणारा हा प्रकल्प गोदावरी नदीवर आहे. यातून १३ जिल्ह्यांतील १८.२६ लाख एकर जमीन सिंचनाखाली आली. रेड्डी हैदराबादमधील डायमंड हाऊस नावाच्या आलिशान घरात राहतात. त्यात प्रत्येक चैनीच्या वस्तू आहेत असून त्यांचा खासगी गोल्फ कोर्सही आहे.
टॅग्स :businessव्यवसायFarmerशेतकरीInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी