डिजिटल पेमेंटला चालना देणार e-RUPI; 'हे' आहेत याचे महत्त्वाचे फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 03:01 PM2021-08-02T15:01:53+5:302021-08-02T15:07:41+5:30

e-RUPI हे एक प्रकारचं प्रीपेड ई व्हाऊचर आहे. हे NCPI द्वारे विकसित करण्यात आलं आहे.

डिजिटल पेमेंटला चालना देण्यासाठी e-RUPI चा वापर करण्यात येणार आहे. हे एक प्रकारचे ई व्हाऊचर बेस्ड डिजिटल पेमेंट सोल्युशन आहे.

e-RUPI हे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NCPI नं विकसित केलं आहे. e-RUPI हे एक प्रकारचं कॉन्टॅक्टलेस आणि कॅशलेस साधन आहे. हे एक QR कोड अथवा SMS स्ट्रिंग बेस्ड ई व्हाऊचर आहे, जे लाभार्थींना मोबाईलवर पाठवलं जातं.

हे सर्व्हिस प्रोव्हायडरला कोणत्याही मध्यस्थीशिवाय आणि कोणत्याही भागीदारीच्या वेळी पेमेंट करेल. पाहूया याचे कोणते आहेत फायदे.

e-RUPI एक कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस डिजिटल सेवा आहे. सेवा देणाऱ्यांना आणि लाभार्थींना डिजिटलीच पैसे पाठवण्याची सुविधा याद्वारे मिळते.

यामध्ये निरनिराळ्या योजनांची लिंकप्रुफ डिलिव्हरीही करता येते. तसंच हे एक क्युआर कोड एसएमएस स्ट्रिंग आधारीत ई व्हाऊचर आहे, जे लाभार्थींच्या मोबाईलवर पोहोचवता येतं.

याद्वारे वापरकर्त्यांना कार्ड, डिजिटल पेमेंट अॅप किंवा इंटरनेट बँकिंग अॅक्सेसशिवाय व्हाऊद्वारे पैसे भरण्याची सुविधा देण्यात आली आहे.

e-RUPI कोणत्याही भौतिक इंटरफेसशिवाय डिजिटल पद्धतीने लाभार्थी आणि सेवा प्रदात्यांसह सेवांच्या प्रायोजकांना जोडते.

हे देखील सुनिश्चित करते की व्यवहार पूर्ण झाल्यानंतरच सेवा प्रदात्याला पैसे दिले जातील. ही प्रीपेड सेवा असल्यानं कोणत्याही मध्यस्थांशिवाय वेळेवर पैसे पोहोचवण्यात येतात.

नियमित पैशांच्या देवाणघेवाणीशिलाय याचा वापर आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना, सब्सिडीसारख्या योजना, मातृत्व आणि बालकल्याण योजना, औषधं आणि रुग्णांचा तपास आदी सेवांसाठीही याचा वापर केला जाऊ शकतो.

या व्हाऊचरचा उपयोद खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्याद्वारे कल्याण आणि कॉर्पोरेट जबाबदारीशी निगडीत कामकाजांमध्येही केला जाऊ शकतो.