तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 13:22 IST2024-11-20T13:15:42+5:302024-11-20T13:22:37+5:30
E Buses Manufacturers in India: भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढला आहे. सार्वजनिक वाहतुकीसाठी सरकारकडून याला चालना दिली जात आहे. त्यामुळे रस्त्यांवर धावणाऱ्या बसेसची संख्याही वाढली आहे.

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे लोक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. इलेक्ट्रिक कार, बाईक तसेच रिक्षाही बाजारात उपलब्ध आहेत.
केंद्र तसेच राज्यातील सरकारांनाही सार्वजनिक वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक बसेसचा वापर वाढवला आहे. भारतात सध्याच्या घडीला टाटा मोटर्सच्या सर्वाधिक इलेक्ट्रिक बसेस रस्त्यांवर धावत आहेत. बाजारात या कंपनीचा वाटा सर्वाधिक आहे.
रस्त्यावर धावणाऱ्या इलेक्ट्रिक बसेस सर्वाधिक टाटा मोटर्सच्या आहेत. टाटा मोटर्सचा बाजारातील हिस्सा ४८ टक्के इतका आहे.
टाटा मोटर्सनंतर दुसरी कंपनी आहे जेबीएम ऑटो. जेबीएम ऑटोची बाजारातील हिस्सा १४.१६ टक्के आहे.
ऑलेक्ट्रा ग्रीन टच या कंपनीचा बाजारातील हिस्सा १४.०८ टक्के आहे.
पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी या कंपनीचा इलेक्ट्रिक बसमधील हिस्सेदारी १०.३० टक्के आहे.
इतर कंपन्यांची बाजारातील हिस्सेदारी ८.०१ टक्के इतकी असून, मित्राह मोबिलिटी या कंपनीचा हिस्सा ५.४५ टक्के आहे.