तरुण वयातच करा Financial Planning अन् मिळवा उत्तम रिटर्न्स, कसं ते वाचा सोप्या शब्दात...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 04:16 PM2022-10-10T16:16:17+5:302022-10-10T16:24:15+5:30

वयाची १८ वर्ष पूर्ण झाली की नागरिकाला मतदानाचा अधिकार मिळतो. वयाच्या या टप्प्यावर तुम्ही पॅन कार्डसाठी अर्ज करू शकता. ड्रायव्हिंग लायसन्स, क्रेडिट किंवा डेबिट कार्डसह जीवनाशी संबंधित सर्व निर्णय घेण्यास सक्षम होता. असे असूनही, जो निर्णय आधी घ्यावा, तो घेण्यास बहुतांश तरुण कचरतात.

खरं तर मतदानाचा हक्क मिळाल्यानंतर तरुणांनीही लहान वयातच आर्थिक नियोजन करायला हवं. कारण जितक्या लवकर तुम्ही इक्विटीशी संबंधित मार्केटमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात कराल तितके भविष्यात चांगलं रिटर्न्स मिळतात. असं केल्यानं तुम्हाला दीर्घ कालावधीनंतर मार्केटमधून चांगले रिटर्न्स मिळवता येतात.

तुम्ही आतापासून नियमित मासिक आधारावर ३ हजार रुपया म्युच्युअल फंड SIP मध्ये गुंतवणूक केल्यास, ३० वर्षांनंतर १२% वार्षिक अंदाज व्याजदरानं तुम्ही परतावा म्हणून १ कोटी ५ लाख रुपये मिळवू शकता. जर तुम्ही ५ वर्षांनी तीच गुंतवणूक करायला सुरुवात केली तर २५ वर्षांनंतर त्याच वार्षिक व्याजदराने तुम्हाला सुमारे ५६ लाख ३७ हजार रुपयांचा परतावा मिळू शकेल. त्यामुळे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यास वेळ वाया घालवू नये असं अर्थतज्ज्ञ सांगतात.

तरुण गुंतवणूकदारांनी नेहमी दीर्घकालीन परतावा असलेल्या योजनांमध्ये गुंतवणूक करावी. कारण वयाच्या या टप्प्यावर बाजाराचा धोका आणि त्यातून सावरण्याची क्षमता जास्त असते. इक्विटी मार्केट समजून घेण्यासाठी, तुम्ही थोड्या प्रमाणात गुंतवणूक करून सुरुवात करू शकता.

तुम्ही तुमची स्वतःची खास गुंतवणूक प्रोफाइल तयार करू शकता. ५ ते ६ वर्षात तुम्हाला इक्विटी मार्केटचे चांगले आकलन झाल्यानंतर तुम्ही त्यात गुंतवणुकीला सुरुवात करू शकता. जर तुम्ही आर्थिक शिक्षणाच्या बाबतीत कमकुवत असाल, तर पैशाच्या सुरक्षिततेबाबत तुमची प्राथमिकता खूप महत्त्वाची आहे.

या वयात तुम्हाला सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय निवडायचा असेल, तर म्युच्युअल फंडातील एसआयपी, स्मॉल तिकीट साइज वेल्थ आणि ब्लू चिप स्टॉक्स तुमच्यासाठी अधिक चांगले ठरू शकतात. तिन्ही पर्याय ३ ते ५ वर्षात चांगला परतावा देतात. बाजारातील अस्थिरता आणि दीर्घ कालावधीसह वाजवी परतावा देणाऱ्या योजनांपेक्षा या तिन्हींमध्ये गुंतवणूक केल्यास जास्तीत जास्त परतावा मिळतो. बँकेची आवर्ती ठेव (RDs) योजना लहान गुंतवणूकदारांसाठी सर्वोत्तम आहे. येथे अशा गुंतवणूकदारांना खात्रीशीर परतावाही मिळतो.

बाजारातील जोखीम टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणू शकता. म्हणजेच, तुमची सर्व बचत एकाच योजनेत ठेवण्याऐवजी, तुम्ही ती अनेक योजनांमध्ये थोड्या-थोड्या प्रमाणात गुंतवू शकता. जेणेकरून तुमची एक योजना चांगला परतावा देत नाही, तर दुसरी योजना तुमचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरेल. असे केल्याने तुम्ही बाजारातील धोका सहज टाळू शकता. क्रिप्टो चलनात गुंतवणूक करण्यापूर्वी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांची वाट पाहिलेली उत्तम.