पेट्रोल-डिझेल होम डिलीवरी करण्याचा व्यवसाय; १२ लाखांची गुंतवणूक अन् वर्षभरात १०० कोटींचे मालक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 09:17 AM2021-04-08T09:17:28+5:302021-04-08T09:21:26+5:30

Online Petrol-Diesel Delivery Business: उत्तर प्रदेशातील ३ तरूणांनी एकत्र येत नवीन स्टार्टअप करण्याचा विचार केला. त्याला PMO ने आणि इंडियन ऑयल कंपनीने साथ दिली.

जर तुम्हाला कोणता बिझनेस सुरु करायचा असेल तर ऑनलाईन फ्यूल विकून कोट्यवधीची कमाई करू शकता. त्यासाठी तुम्हाला भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन, पेट्रोलियम प्रोसेस इंजिनिअरींग सर्व्हिससारख्या तेल कंपन्या मदत करतील.

त्याशिवाय तुम्ही सरकारचीही मदत घेऊ शकता. यासाठी स्टार्टअप कंपनी पेपफ्यूल डॉट कॉम कंपनीने सांगितल्याप्रमाणे कसं तुम्ही डोर टू डोर फ्यूल विकण्याचा व्यवसाय करू शकता हे पुढे जाणून घेऊया

पेपफ्यूल डॉट कॉम(pepfuel.com) सरकारद्वारे मान्यता प्राप्त स्टार्टअप आहे. पेपफ्यूल्सचं इंडियन ऑयल कंपनीसोबत थर्ड पार्टी करार आहे. हे डोर-टू-डोर फ्यूल डिलीवरी(Online Diesel Delivery) करण्याचं काम करतात.

यावर तुम्ही ऑनलाईन मेसेज करून ऑर्डर करू शकता. नोएडाच्या टिकेंद्र, प्रतीक आणि संदीप या तीन तरूणांनी मिळून अशाप्रकारे स्टार्टअप सुरू केला आहे. व्यवसाय सुरु केल्यानंतर काही वर्षातच यांच्या कंपनीचा टर्नओवर १०० कोटींच्या आसपास पोहचला आहे.

स्टार्टअपचे संस्थापक टीकेंद्रने सांगितले की, हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी खूप काळ अभ्यास केला. घरी घरी जाऊन लोकांशी संवाद साधला तसेच ऑनलाईन फिडबॅक घेतला. सध्या ५० शहरात ही सुविधा उपलब्ध आहे. दिल्ली, नोएडा, गाजियाबाद, गुरूग्राम, मानेसह, हरियाणा, मुरादाबाद इथे ही सुविधा आहे.

फिडबॅकमध्ये असा रिस्पॉन्स आला की, पेट्रोल-डिझेलचं ऑनलाईन अँप असायला हवं. परंतु पेट्रोल-डिझेलची ऑनलाईन डिलीवरीचा व्यवसाय करणं धोकादायक आहे. २०१६ पर्यंत भारतात पेट्रोल डिलीवरी करण्याचा परवानगी नव्हती.

अलीकडेच सरकारने यासाठी मान्यता दिली आहे. अशावेळी आमच्याकडे फक्त डिझेल डिलीवरी करण्याचा पर्याय होता. आम्ही डिझेलची डिलीवरी करण्याचं काम सूरू केलं असं टीकेंद्रने सांगितले.

कंपनीचे अन्य संस्थापक संदीपने सांगितले की, आम्ही इंडियन ऑयल कोर्पोरेशन(Indian Oil), भारत पेट्रोलियम (BPCL), पेट्रोलियम प्रोसेस इंजिनिअरिंग सर्व्हिससारख्या तेल कंपन्यांसमोर आमचा प्रस्ताव ठेवला. त्याचसोबत स्टार्टअपची आयडिया PMO लादेखील पाठवली होती.

काही दिवसांनी PMO कार्यालयातून उत्तर आलं. दुसरीकडे फरिदाबाद येथील इंडियन ऑयलकडून आम्हाला आमच्या व्यवसायाचा आराखडा सादर करून DPR ला सोपवण्याचा रिप्लाय आला होता.

त्यानंतर आम्ही व्यवसायाचा आराखडा तयार केला. तो इंडियन ऑयलकडे पाठवला त्यांच्याकडून परवानगी मिळाल्यानंतर आम्ही व्यवसायाला सुरूवात केली. व्यवसाय सुरू करण्यासाठी आम्हाला १२ लाख रुपये खर्च आल्याचं संदीपने सांगितले.

या १२ लाखात अँप डेवलेप, Browser Devlop, डिस्पेंसिंग मशीन, जेरी कैनसह अन्य अनेक साहित्यांचा समावेश आहे. या अँपवर ग्राहकांची ऑर्डर रियल टाईम घेतली जाते. ती डिलीवरीसाठी संबंधित MDU ला पाठवली जाते. २-३ तासांत आम्ही हे काम करतो. ग्राहक डिलीवरीवेळी रियल टाईम नजर ठेवली जाते कारण डिलीवरीनंतर कन्फर्मेशन मिळू शकतं. MDU आयओटी आधारित आरएफआयडी तंत्रज्ञानावर काम करते. ही पेपफ्यूल्सचं पेटेंट आहे. यात चोरी होऊ शकत नाही.