ढासू परतावा...! : या SME स्टॉकनं ३ महिन्यांत दिला २२५% हून अधिक परतावा, लोकांना केलं मालामाल; केडियालांकडे तब्बल ३९३१०० शेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 14:16 IST2025-12-24T13:55:04+5:302025-12-24T14:16:39+5:30
आता बुधवारी नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये (NSE) कंपनीचा शेअर ६३१.६० रुपयांवर पोहोचला असून, केवळ ३ महिन्यांत आयपीओ (IPO) किमतीच्या तुलनेत हा शेअर तब्बल २२५ टक्क्यांहून अधिक वधारला आहे.

शेअर बाजारातील 'टेक-डी सायबरसिक्युरिटी' (TechD Cybersecurity) या SME कंपनीने अवघ्या तीनच महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. याच वर्षी २२ सप्टेंबर रोजी कंपनीची शेअर बाजारात लिस्ट झाले होते. आयपीओमध्ये एका शेअरची किंमत १९३ रुपये निश्चित करण्यात आली होती.

आता बुधवारी नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये (NSE) कंपनीचा शेअर ६३१.६० रुपयांवर पोहोचला असून, केवळ ३ महिन्यांत आयपीओ (IPO) किमतीच्या तुलनेत हा शेअर तब्बल २२५ टक्क्यांहून अधिक वधारला आहे. दिग्गज इनव्हेस्टर विजय किशनलाल केडिया यांचीही या कंपनीत मोठी गुंतवणूक आहे.

सप्टेंबर २०२५ च्या तिमाही आकडेवारीनुसार, केडिया यांच्याकडे कंपनीचे तब्बल ३,९३,१०० शेअर्स आहेत. अर्थात त्यांची हिस्सेदारी ५.२६ टक्के एवढी आहे.

कंपनीचा आयपीओ ३९ कोटी रुपयांचा होता, जो ७१८.३० पट एवढा सबस्क्रिप्शन मिळाले होते. यात सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा वाटा ७२६.०६ पट होता.

महत्वाचे म्हणजे, पहिल्याच दिवशी कंपनीचा शेअर ९० टक्क्यांच्या वाढीसह ३६६.७० रुपयांवर लिस्ट झाला आणि थोड्याच वेळात तो १०० टक्क्यांच्या वाढीसह ३८५ रुपयांवर पोहोचला होता. गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी मिळालेला हा दुप्पट परतावा आजही कायम असल्याचे दिसून येते.

काय करते ही कंपनी? - 'टेक-डी सायबरसिक्युरिटी' ही प्रामुख्याने ग्राहक केंद्रित सायबर सुरक्षा उपाय (Cybersecurity Solutions) पुरवणारी कंपनी आहे. B2B क्षेत्रात जागतिक स्तरावर कार्यरत असलेली ही कंपनी MSSP सोल्यूशन्स, सायबर प्रोग्राम मॅनेजमेंट, VAPT आणि कंप्लायन्स सर्व्हिसेस यांसारख्या सेवा पुरवते.

कंपनीमधील हिस्सेदारीचा विचार करता, प्रमोटर्सची हिस्सेदारी ६३.२२ टक्के एवढी आहे. तर पब्लिक शेयरहोल्डिंग 36.78 टक्के एवढी आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)




















