कंडोम बनवणाऱ्या कंपनीचा शेअर करतोय मालामाल, खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; 2 महिन्यातच दिला बंपर परतावा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 16:11 IST2025-10-31T16:00:19+5:302025-10-31T16:11:36+5:30

कंपनीचा शेअर १ सप्टेंबर २०२५ रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाला असून, आयपीओ किंमतीच्या तुलनेत तब्बल ३०० टक्क्यांहून अधिक वधारला आहे.

कंडोम उत्पादक कंपनी अनोंदिता मेडिकेअरच्या शेअर्समध्ये गेल्या काही दिवसांत जबरदस्त तेजी दिसत आहे. कंपनीचा शेअर शुक्रवारी एनएसईवर ५ टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह ५९५.७० रुपयांवर पोहोचला.

एनएसईवरील आकडेवारीनुसार, शुक्रवारी अनोंदिता मेडिकेअरच्या तब्बल २ लाख १९ हजार शेअर्स खरेदीच्या ऑर्डर प्रलंबित होत्या. कंपनीचा शेअर १ सप्टेंबर २०२५ रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाला असून, आयपीओ किंमतीच्या तुलनेत तब्बल ३०० टक्क्यांहून अधिक वधारला आहे.

केवळ दोन महिन्यांतच शेअर्सची किंमत १४५ वरून ६०० रुपयांपर्यंत वधारली - अनोंदिता मेडिकेअर (Anondita Medicare) च्या आयपीओमध्ये शेअरची किंमत १४५ रुपये होती. कंपनीचा शेअर १ सप्टेंबर २०२५ रोजी २७५.५० रुपयांव बाजारत लिस्ट झाला होता. याच दिवशी हा शेअर २८९.२५ रुपयांवर बंद झाला. यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने वाढ झाल आहे.

कंपनीचा शेअर ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी 595.70 रुपयांवर पोहोचला आहे. १४५ रुपयांच्या इश्यू प्राइसच्या तुलनेत कंपनीने ३०० टक्क्यांचा परतावा दिला आहे. अनोंदिता मेडिकेअरचा आयपीओ 22 ऑगस्ट 2025 ला खुला झाला होता. तो 26 ऑगस्टपर्यंत खुला होता.

अनोंदिता मेडिकेअरच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. एकूण सबस्क्रिप्शन ३००.८९ पट झाले होते. सामान्य गुंतवणूकदारांचा कोटा २८६.२० पट, तर नॉन-इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सचा कोटा तब्बल ५३१.८२ पट सबस्क्राइब झाला होता.

याशिवाय, क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्स विभागात १५३.०३ पट मागणी नोंदली गेली. आयपीओपूर्वी कंपनीत प्रवर्तकांची हिस्सेदारी ८३.९५ टक्के होती, जी आता ६१.७१ टक्क्यांवर आली आहे.

उत्तर प्रदेशातील नोएडा येथे उत्पादन युनिट असलेली अनोंदिता मेडिकेअर लिमिटेड पुरुषांसाठी आणि महिलांसाठी फ्लेवर्ड कंडोम बनवते आणि ते 'COBRA' या ब्रँड नावाने विकले जातात.

कंपनीची वार्षिक उत्पादन 562 मिलियन कंडोम्स एवढे आहे. ती दक्षिणपूर्व आशिया, आफ्रिका आणि मध्य पूर्व (Middle East) यांसारख्या अनेक आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये उत्पादनाची निर्यात करते.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)