UAN नंबर विसरला असाल तरी आता नो टेन्शन; जाणून घ्या, कसा चेक करायचा EPF Balance?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 09:22 AM2021-03-13T09:22:05+5:302021-03-13T09:40:57+5:30

How To Check EPF Balance Without UAN : खासगी नोकर्‍या करणाऱ्या लोकांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी हे भारत सरकारने केले आहे.

खासगी नोकरी करणार्‍या लोकांच्या पगाराचा काही भाग ईपीएफ (EPF) खात्यात जमा केला जातो. जेणेकरून सेवानिवृत्तीनंतर लोकांना एक मोठी रक्कम दिली जाऊ शकेल. दरम्यान खासगी नोकर्‍या करणाऱ्या लोकांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी हे भारत सरकारने केले आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ग्राहकांना युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (UAN) वापरून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) शिल्लक तपासण्याची परवानगी देते. मात्र जर ग्राहक UAN नंबर विसरला असलात तरी पैसे काढण्याची चिंता करू नका.

भविष्य निर्वाह निधीतील शिल्लक रक्कम साधारणत: चार वेगवेगळ्या मार्गांनी चेक करता येते. UMANG App, Missed Call, SMS आणि ईपीएफओ द्वारे पाहणं सहज शक्य आहे.

बहुतेकांना यूएएन क्रमांक सक्रिय करण्याची आवश्यकता आहे, जे केवळ अधिकृत पोर्टलद्वारे केले जाऊ शकते. कसं ते जाणून घेऊया...

जर युजर्स यूएएन विसरले तर ते नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून 011-229014016 वर मिस्ड कॉल देऊन पीएफ शिल्लक तपासू शकतात. यासाठी युजर्सना यूएएन नंबर देण्याची आवश्यकता नाही.

यूएएन पोर्टलवर तुम्ही नोंदणीकृत असला पाहिजेत आणि तुमच्या खात्यात केवायसी तपशील असणं अत्यंत आवश्यक आहे. ज्या युजर्सकडे यूएएन नंबर आहे ते काही स्टेप्स फॉलो करून ईपीएफओ वेबसाईटवर यूएएन सक्रिय करू शकतात.

सर्वप्रथम ईपीएफओच्या अधिकृत वेबसाईटवर जा आणि खाली देण्यात आलेल्या उजव्या कोपऱ्यातील एक्टिव यूएएन असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

क्लिक केल्यानंतर काही माहिती विचारली जाईल. ती भरून सबमिटवर क्लिक करा. ईपीएफओ पृष्ठावरील सर्व तपशील पडताळून पाहा आणि सबमिट करा.

सबमिट केल्यानंतर मोबाईल नंबरवर एक ओटीपी प्राप्त होईल. फोनवर आलेला ओटीपी नंबर टाका त्यानंतर यूएएन सक्रिय होईल.

यूएएन सक्रिय झाल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक पासवर्ड पाठविला जाईल. त्यानंतर EPFO च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन लॉग इन करून आपल्या खात्याबाबत अधिक माहिती मिळवू शकता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.