Business Idea: नव्या वर्षात फक्त 50000 रुपयांत सुरू करा हा खास बिझनेस; होईल धडाक्यात कमाई, बाजारातही मोठी मागणी!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 04:37 PM2022-12-12T16:37:36+5:302022-12-12T16:48:29+5:30

खरे तर, सध्य स्थितीत चिप्स बनविण्याचा आणि विकण्याचा व्यवसाय हा अत्यंत चांगला आहे. महत्वाचे म्हणजे, अगदी कमी गुंतवणुकीत या व्यवसायाला सुरुवात करून तुम्ही चांगली कमाई करू शकता.

उन्हाळा असो वा हिवाळा, वर्षातील 12 ही महिने बटाट्याच्या चिप्सना नेहमीच जबरदस्त मागणी असते. बटाट्याच्या चिप्सचे पाकीट बाजारात अगदी 5 रुपयांपासून ते 100 रुपयांपर्यंतही उपलब्ध आहे. खरे तर, सध्य स्थितीत चिप्स बनविण्याचा आणि विकण्याचा व्यवसाय हा अत्यंत चांगला आहे. महत्वाचे म्हणजे, अगदी कमी गुंतवणुकीत या व्यवसायाला सुरुवात करून तुम्ही चांगली कमाई करू शकता.

चिप्स मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक कार्यरत आहेत. मात्र, तरीही चिप्सची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. उत्पादकही ही मागणी पूर्ण करण्यास असमर्थ ठरत आहेत. यामुळे तुम्ही हा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला गुणवत्तेवरही अधिक विचार करावा लागेल.

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी फार मोठ्या गुंतवणुकीची आवश्यकता नाही. आपल्याला चिप्स बनवण्यासाठी लागणारे मशील केवळ 30 ते 35 हजार रुपयांपर्यंत मिळून जाईल. याशिवाय आपल्याला एक पॅकिंग मशीनही घ्यावे लागे.

हे मशीन न घेताही आपण साधारणपणे 50 हजार रुपये अथवा याहूनही समी पैशांत उद्योग सुरू करू शकता. मात्र, दोन्ही मशीन घेतल्यानंतर आपली गुंतवणूक वाढेल. आपण सुरूवातीला ट्रायल म्हणून मशीन न घेताही काम सुरू करू शकता.

आपण हा व्यवसाय आपल्या घरात एखाद्या छोट्या खोलीतही सुरू करू शकता. कच्चा माल म्हणून आपल्याला चांगल्या क्वालिटीचे बटाटे, मीठ, चाट मसाला, म‍िर्ची पावडर, तेल आणि बेक‍िंग सोडा आद‍ींची आवश्यकता असेल. आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांचीही मदत घेऊ शकता. अथवा स्‍टॉफही हायर करू शकता.

आपल्याला आपले प्रोडक्ट बाजारात आण्यासाठी त्याचे रज‍िस्‍ट्रेशन करावे लागेल. आपण सर्वप्रथम एमएसएमई अंतर्गत रजिस्ट्रेशन करू शकता. यानंतर ट्रेड लायसन्स घेण्याची आवश्यकता असेल. याशिवाय आपल्याला फर्म अथवा कंपनीच्या नावाने बँक अकाउंट, पॅन कार्ड, जीएसटीनंबरही घ्यावा लागेल. खाद्य व‍िभागाकडून उत्‍पादनाचे परीक्षण करून घेतल्यानंतर, आपण FSSAI चे लायसन्स मिळवू शकता.

आपण सुरुवातील आपले प्रोडक्ट बाजारात उतरवून सोशल मीड‍िया आदीच्या माध्यमाने प्रमोश करू शकता. मागणी वाढल्यानंतर, आपण हळू-हळू व्यवसाय वाढवूही शसकता. आणि मागणी वाढल्यानंतर आपण मशीनही घेऊ शकता.