Budget 2021: करदात्यांना धक्का! इन्कम टॅक्सच्या बाबतीत सरकार मोठा निर्णय घेणार?
By मोरेश्वर येरम | Updated: January 22, 2021 14:08 IST2021-01-21T21:22:54+5:302021-01-22T14:08:07+5:30
अर्थसंकल्पातून करदात्यांची निराशा होण्याची शक्यता

केंद्र सरकारकडून १ फेब्रवारी २०२१ रोजी सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर केला जाईल. यावेळीच्या अर्थसंकल्पातून करदात्यांची निराशा होण्याची शक्यता आहे. यामागची कारणं जाणून घेऊयात...
अर्थमंत्री निर्मला सितारामण १ फेब्रुवारी २०२१ रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावेळीच्या अर्थसंकल्पातून करदात्यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
केंद्राकडून आयकराच्या (income tax) दरात आणि टॅक्स स्लॅबमध्ये दिल्या जाणाऱ्या सवलतीची सर्वजण वाट पाहात असतात.
पण यावेळीच्या अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅबमध्ये कोणतेही बदल केले जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
केंद्र सरकारने जर असं केलं तर देशातील मध्यमवर्गीय कुटुंबियांना धक्का बसू शकतो.
आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी यावेळीच्या अर्थसंकल्पात वैयक्तिक टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केला जाणार नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
केंद्राकडून टॅक्स स्लॅबमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. तरी इतर पर्यायांच्या माध्यमातून करदात्यांना सवलत देण्यात येऊ शकते.
आयकराच्या कायद्यात ८०-सी अंतर्गत देण्यात येणारी सूट वाढवण्याचा विचार केंद्रीय अर्थमंत्रालयाचा विचार सुरू आहे. पण त्याबाबत अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेले नाही.
सध्या सेक्शन ८०-सी अंतर्गत करदात्यांना वैयक्तिक आयकरात १.५० लाखांपर्यंतची सूट दिली जाते. यात वाढ करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
यंदाच्या अर्थसंकल्पात सेक्शन ८०-सी अंतर्गत दिल्या जाणाऱ्या १.५० लाखांच्या सवलतीत वाढ करुन ती २ लाख रुपये इतकी केली जाण्याची शक्यता आहे.