LPG बुक करण्यासाठी 'भारत गॅस'ची नवीन सुविधा, इंटरनेट नसलेल्या फोनवरूनही UPI ​​पेमेंट!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 04:21 PM2022-03-20T16:21:10+5:302022-03-20T16:32:11+5:30

भारत गॅसने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे. ही सुविधा एलपीजी सिलिंडरचे बुकिंग आणि पेमेंटसाठी आहे. जाणून घेऊयात सविस्तर...

भारत गॅसने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे. ही सुविधा एलपीजी सिलिंडरचे बुकिंग आणि पेमेंटसाठी आहे. त्याला 'व्हॉइस बेस्ड पेमेंट फॅसिलिटी' असे नाव देण्यात आले आहे. या नवीन सुविधेत आयव्हीआर सुविधेवर बोलूनही पेमेंट करता येणार आहे. या नवीन सुविधेचा फायदा अशा एलपीजी ग्राहकांना होणार आहे ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही किंवा ज्यांच्याकडे इंटरनेटसह फोन नाही.

फोन असेल तर त्यात इंटरनेटची गरज भासणार नाही. सरकारी गॅस कंपनी भारत गॅसने यासाठी अल्ट्रा कॅश टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडशी करार केला आहे. यामध्ये ग्राहकांना संपूर्ण सुविधा केवळ बोलून मिळवता येणार आहे. व्हॉइस आधारित डिजिटल पेमेंटमध्ये ग्राहकाला IVR वर बोलायचे असते. गॅसचे बुकिंग आणि पेमेंट बोलूनच करता येते. भारत गॅसच्या ग्राहकांसाठी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.

ज्या ग्राहकांकडे स्मार्टफोन नाही किंवा फोनमध्ये इंटरनेट नाही, ते आयव्हीआरद्वारे एलपीजी सिलिंडर बुक करू शकतील. तसेच, तुम्ही UPI 123pay द्वारे LPG सिलेंडरचे पैसे भरू शकरणार आहात. भारत गॅसने एका निवेदनात म्हटले आहे की IVR ची सुविधा देशातील 40 दशलक्षाहून अधिक ग्राहकांना उपलब्ध होईल. ग्रामीण भागातील ग्राहकांना याचा जास्तीत जास्त लाभ घेता येणार आहे.

गेल्या आठवड्यात, RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी UPI 123pay ची सुविधा सुरू केली. सुविधा सुरू झाल्यामुळे, भारत गॅस ही देशातील पहिली कंपनी आहे जिने 123pay पासून गॅसचे पेमेंट करण्याचे काम सुरू केले आहे. भारत गॅसने आपल्या ग्राहकांसाठी ०८०-४५१६-३५५४ हा क्रमांक जारी केला आहे, ज्यावर ते स्वतःसाठी किंवा त्यांच्या नातेवाईक-मित्रांसाठी कॉल करून एलपीजी सिलिंडर बुक करू शकतात. या क्रमांकावरून गॅसचे पैसेही भरता येतात.

UPI 123pay फक्त तीन टप्प्यांमध्ये काम करते. हे तीन टप्पे पूर्ण केल्यानंतर, व्यवहार ऑफलाइन मोडमध्ये केला जातो. तीन पायऱ्या अशा आहेत - कॉल, सिलेक्ट आणि पे. UPI 123Pay ही एक झटपट पेमेंट प्रणाली आहे ज्यामध्ये झटपट पैशाचे व्यवहार केले जातात. ही प्रणाली पूर्णपणे फीचर फोनवर चालते ज्यास इंटरनेटची आवश्यकता नसते. तुम्ही UPI देखील चालवू शकता आणि फीचर फोनमध्ये पेमेंट करू शकता. भारत गॅसनेही अशीच सुविधा सुरू केली आहे.

वापरकर्ता त्याच्या फीचर फोनवरून IVR नंबर डायल करतो. भारत गॅसने यासाठी ०८०-४५१६-३५५४ हा क्रमांक दिला आहे. जर वापरकर्त्यानं ही सुविधा प्रथमच वापरली असेल, तर तो कॉलवर प्रक्रिया करत असताना, त्याचे प्रोफाइल एकाच वेळी तयार केले जाईल.

यूझरला लिस्ट अकाऊंट अॅक्टिव्हिटीसाठी बँक खात्याचा तपशील द्यावा लागतो. यासह, युझरला एक UPI आयडी दिला जातो जो mobile.voice@psp फॉरमॅटमध्ये असतो.

जर युझरनं आधीच UPI पिन सेट केला नसेल, तर त्याला पिन सेट करण्यास सांगितले जाते. तो डेबिट कार्डचा तपशील टाकतो ज्यानंतर मोबाईलवर पासवर्ड तयार होतो. यानंतर, IVR वर युझरला UPI क्रमांक तयार करण्यास सांगितले जाते, ज्याच्या आधारे पैसे प्राप्त किंवा पाठवले जाऊ शकतात.

युझर आता फीचर फोन वापरून UPI ​​व्यवहार करू शकणार आहे. याद्वारे गॅसचे बुकिंग आणि त्याचे पैसे भरता येतील.