संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 11:12 AM2024-05-26T11:12:33+5:302024-05-26T11:13:03+5:30

Loksabha Election - राज्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी संपल्यानंतर आता सर्वांनाच ४ जूनच्या निकालाची प्रतिक्षा लागली आहे. त्यात संजय राऊतांनी नितीन गडकरींबाबत वेगळाच दावा केला आहे. त्याला भाजपानेही प्रत्युत्तर दिलं आहे.

Lok Sabha Elections - Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis Tried To Defeat Nitin Gadkari - Sanjay Raut | संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न

संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न

नागपूर -  Sanjay Raut on Nitin Gadkari ( Marathi News ) ४ जूननंतर भाजपात मोदी-शाह यांना पाठिंबा राहणार नाही. नितीन गडकरींचा नागपूरात पराभव व्हावा यासाठी मोदी-शाह आणि फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले असा खळबळजनक दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊतांच्या त्यांच्या रोखठोक सदरातून हे भाष्य केले आहे. 

संजय राऊत यांनी म्हटलंय की, नितीन गडकरींचा नागपूरात पराभव व्हावा यासाठी नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र प्रयत्न केले. गडकरींचा पराभव होत नाही याची खात्री पटल्यावर फडणवीस हे नाइलाजाने नागपूरात प्रचारात उतरले. गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस यांनीच पुरवली हे संघाचेच लोक नागपूरात उघडपणे बोलताना दिसतात असं त्यांनी सांगितले.

तसेच जे गडकरींच्या बाबतीत तेच योगींचे, अमित शाहांच्या हाती पुन्हा सत्ता आली तर ते उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना घरी पाठवतील. त्यामुळे योगी को बचाना है, तो मोदी को जाना है हा संदेश योगी समर्थकांनी फिरवला. उत्तर प्रदेशात भाजपाच्या ३० जागांचा फटका त्यामुळे सहज पडेल. आधी मोदी-शाह यांना घालवा असं उत्तरेकडील योगी आणि त्यांच्या लोकांनी ठरवलं. त्याचाही परिणाम ४ जूनला दिसेल असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. 

भाजपानं संजय राऊतांना फटकारलं

नितीन गडकरी हे देशातील सर्वमान्य नेतृत्व आहे. कुठल्याही पक्षाचा खासदार असेल तर त्यांनी गडकरींच्या कामाचं कौतुक संसदेत केले आहे. गडकरींच्या पाठीशी मोदी-शाह आहेत म्हणून तर ते देशात पायाभूत सुविधा रस्ते विकास करू शकले. त्यामुळे रोज उठायचं आणि खोटं बोलायचं असं राऊतांचे आहे. त्यांनी केलेला आरोप निराधार आहे. एकदा जर तुम्हाला टीव्ही चॅनेलवर रोज दिसायची सवय लागली, वर्तमानपत्रात रोज आपली बातमी, फोटो यावा हे व्यसन जडलं तर अशाप्रकारे आरोप होत असतात. या आरोपात काहीही तथ्य नाही असं सांगत भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी संजय राऊतांना फटकारलं आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी प्रचारासाठी इंडिया आघाडीचे नेते राज्यात बोलावले. परंतु एकाही इंडिया आघाडीच्या पक्षांनी उद्धव ठाकरेंना प्रचाराला बाहेर बोलावलं नाही. उद्धव ठाकरेंनी आयुष्यातील फार मोठी चूक केली. त्यामुळे पुढच्या जन्मात तरी एवढी चूक होऊ नये ही प्रार्थना आहे असा खोचक टोलाही सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरेंना लगावला. 
 

Web Title: Lok Sabha Elections - Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis Tried To Defeat Nitin Gadkari - Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.