“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 09:36 AM2024-05-26T09:36:29+5:302024-05-26T09:37:38+5:30

Congress Rahul Gandhi News: राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर पुन्हा एकदा टीका केली आहे.

congress rahul gandhi criticized pm narendra modi and bjp after sixth phase of lok sabha election 2024 voting | “पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी

“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी

Congress Rahul Gandhi News: लोकसभा निवडणुकीत देशभरात झालेल्या सर्वच टप्प्यात ७० टक्क्यांहून अधिक मतदान होण्याची कामगिरी पश्चिम बंगालने सहाव्या टप्प्यातही कायम ठेवली. २५ मे रोजी लोकसभा निवडणुकीचे सहाव्या टप्प्यातील मतदान झाले. दिल्लीतील ७ जागांवरही मतदान झाले. यातच काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका केली आहे. 

दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केंद्रीय मंत्र्यांसह अनेक व्हीआयपींनी मतदान केले. दिल्लीत सरासरी ५७.६७ टक्के मतदान झाले. उत्तर पूर्व दिल्लीमध्ये सर्वाधिक ६२.८७ टक्के, तर नवी दिल्लीत सर्वात कमी ५२.९३ टक्के मतदान झाले. यानंतर राहुल गांधी यांनी एक्सवर एक पोस्ट करत पंतप्रधान मोदी आणि भाजपावर निशाणा साधला.

पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालले आहे

पंतप्रधानांच्या भाषेची प्रतिष्ठा आणि भाजपाचा जागा या दोन्ही गोष्टी सातत्याने घसरत चालल्या आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी एक्सवरील पोस्टमधून केली आहे. तर दुसऱ्या एका पोस्टमध्ये राहुल गांधी म्हणतात की, देशवासियो, मतदानाच्या पहिल्या पाच टप्प्यात तुम्ही खोटेपणा, द्वेष आणि अपप्रचार यांना नाकारून तुमच्या जीवनाशी संबंधित तळागाळातील समस्यांना प्राधान्य दिले आहे. ३० लाख रिक्त सरकारी पदांवर भरती आणि तरुणांसाठी वर्षाला १ लाख रुपयांची पहिली रोजगार हमी योजना सुरू व्हावी. गरीब कुटुंबातील महिलांच्या खात्यात महिन्याला ८,५०० रुपये येऊ लागतील. शेतकरी कर्जमुक्त झाला होईल आणि त्यांना त्यांच्या पिकांवर योग्य एमएसपी मिळेल. मजुरांना ४०० रुपये रोजंदारी मिळेल. तुमचे जीवन तर सुधारेलच पण लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करेल, यासाठी मतदार म्हणून योगदान दिले, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार बिहारमधील लोकसभेच्या ८ जागांवर ५३.३० टक्के मतदान झाले. उत्तर प्रदेशमधील १४ जागांवर ५४.०३ टक्के मतदान झाले. जम्मूमधील एका जागेवर ५२.२८ टक्के मतदान झाले. पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या ८ जागांसाठी ७८.१९ टक्के मतदान झाले. हरयाणामधील सर्व १० जागांसाठी ५८.३७ टक्के एवढ्या मतदानाची नोंद झाली. राजधानी दिल्लीतील लोकसभेच्या ७ जागांसाठी ५४.४८ टक्के मतदान झाले. झारखंडमधील लोकसभेच्या ४ जागांसाठी ६२.७४ टक्के मतदान झाले. ओदिशामधील लोकसभेच्या ६ जागांसाठी ६०.०७ टक्के एवढे मतदान झाले.  


 

Web Title: congress rahul gandhi criticized pm narendra modi and bjp after sixth phase of lok sabha election 2024 voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.