Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 09:14 AM2024-05-26T09:14:26+5:302024-05-26T09:17:06+5:30

Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज पश्चिम बंगालमध्ये धडकण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. याबाबत राज्य प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे. एनडीआरएफच्या पथकांनाही सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.

Cyclone Remal will hit Bengal today, NDRF team on alert; Maharashtra will be affected? | Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?

Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?

Cyclone Remal ( Marathi News ) :  बंगालच्या उपसागरात 'रेमल' चक्रीवादळ आज रविवारी रात्री धडकण्याची शक्यता आहे, याबाबत हवामान विभागाने माहिती दिली आहे. 'चक्रीवादळ ताशी ११०-१२० किलोमीटर वेगाने किनारपट्टीवर धडकू शकते. या काळात समुद्रात १.५ मीटर उंच लाटा येण्याची शक्यता आहे, त्यामुळे किनारपट्टीवरील पश्चिम बंगाल आणि बांगलादेशातील सखल भाग पाण्याखाली जाऊ शकतो. हवामान खात्याने मच्छिमारांना २७ 'मे'च्या सकाळपर्यंत बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागात जाऊ नये अशा सूचना दिल्या आहेत. 'रेमल'च्या प्रभावामुळे पश्चिम बंगाल, ओडिशा, मिझोराम ते बिहारपर्यंत पावसाची शक्यता आहे.

दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी

'रेमल' चक्रीवादळामुळे, कोलकाता विमानतळावरील विमानसेवा रविवारी दुपारी १२ ते सोमवारी सकाळी ९ वाजेपर्यंत २१ तासांसाठी बंद राहणार आहे. भारतीय तटरक्षक दलाने नऊ आपत्ती निवारण पथके समुद्रात तैनात केली आहेत. याशिवाय बंगालमध्ये एनडीआरएफच्या १२ तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत.

बंगाल सरकारने शनिवारी एक बैठक घेतली आणि चक्रीवादळाचा सामना करण्याच्या तयारीचा आढावा घेतला. केंद्रीय कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनीही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्य अधिकाऱ्यांसोबत तयारीचा आढावा घेतला. 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर ओडिशातील बालासोर, भद्रक आणि केंद्रपारा या किनारी जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या मुसळधार पाऊस पडेल.  त्याचबरोबर मयूरभंजमध्ये २७ मे रोजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच २६ मे रोजी मिझोराम, त्रिपुरा आणि दक्षिण मणिपूरमध्ये बहुतांश ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आसाम आणि मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोराम, मणिपूर आणि त्रिपुरामध्ये २७ आणि २८ मे रोजी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. बिहारमध्येही काही ठिकाणी पाऊस पडू शकतो. चक्रीवादळ 'रेमल'मुळे, रविवारी संध्याकाळी ६ वाजल्यापासून बंगालमधील श्यामा प्रसाद मुखर्जी बंदरातील सर्व मालवाहू कामे १२ तासांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

'रेमल'चक्रीवादळाचा महाराष्ट्रालाही धोका?

हवामान खात्याने २६-२७ मे रोजी दक्षिण २४ परगणामध्ये १०० ते ११० किमी प्रतितास आणि उत्तर २४ परगणामध्ये ताशी ९० ते १०० किमी प्रतितास ते ११० किमी प्रति तास वाऱ्याचा वेग वाहण्याचा इशारा दिला आहे. विभागाने कोलकाता, हावडा, नादिया आणि पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नाही, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. 

Web Title: Cyclone Remal will hit Bengal today, NDRF team on alert; Maharashtra will be affected?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.