IPL पूर्वीच Jio चा धमाका! लॉन्च केले 6 नवे प्लॅन, मोफत मिळेल डेटा व्हाउचर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 11:32 AM2023-03-24T11:32:06+5:302023-03-24T11:41:19+5:30

जिओ क्रिकेट प्लॅन्सच्या सहाय्याने यूजर्सना लाइव्ह सामने पाहता येतील. महत्वाचे म्हणजे, यात यूजर्सना कॅमेराचे वेगवेगळे अँगल सेट करण्याची सुविधाही मिळेल.

आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीगच्या नव्या सिझनला या महिन्याच्या अखेरीस सुरूवात होत आहे. आपण या लीगचे सामने जिओ सिनेमावर लाईव्ह पाहू शकता. हा आयपीएल सिझन सुरू होण्यापूर्वीच कंपनीने काही नव्या प्लॅन्सची घोषणा केली आहे. जिओच्या या नव्या ऑफर सध्याच्या आणि नव्या, अशा दोन्ही ग्राहकांसाठी आहेत.

जिओ क्रिकेट प्लॅन्सच्या सहाय्याने यूजर्सना लाइव्ह सामने पाहता येतील. महत्वाचे म्हणजे, यात यूजर्सना कॅमेराचे वेगवेगळे अँगल सेट करण्याची सुविधाही मिळेल. आपण अशा प्रकारे मल्टीपल कॅमेऱ्याच्या अँगलने 4K क्वालिटी मध्ये कंटेंट बघू शकता. Jio ने प्रेस रिलीज जारी करून या नवीन प्लॅन्स संदर्भात माहिती दिली आहे. तर जाणून घेऊयात सविस्तर

Jio नं लॉन्च केले तीन नवे रिचार्ज प्लॅन्स - जिओने तीन नवे क्रिकेट प्लॅन लॉन्च केले आहेत, यात युजर्सना रोज 3GB डेटा आणि अॅडिशनल फ्री डेटा व्हाउचरची सुविधा मिळत आहे. 31 मार्चपासून आयपीएलला सुरुवात होत आहे.

सर्वप्रथम जाणून घेऊयात 999 रुपयांच्या प्लॅनसंदर्भात, या प्लॅनमध्ये यूजर्सना रोज 3GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळेल. याच बरोबर ग्राहकांना 241 रुपयांचे व्हाउचर मोफत मिळेल. यात युजर्सना 40GB डेटा फ्री मिळेल. या प्लॅनची व्हॅलिडिटी 84 दिवसांची आहे.

399 रुपये आणि 219 रुपयांचा प्लॅन - याच बरोबर 399 रुपये आणि 219 रुपयांच्या प्लॅनवर यूजर्सना डेली 3GB डेटा आणि अनलिमिडेट व्हॉईस कॉलिंग मिळते. हे दोन्ही प्लॅन व्हॅलिडिटी आणि व्हाउचर ऑफरच्या बाबतीत एकमेकांपेक्षा वेगळे आहेत. 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्सना 61 रुपयांचे व्हाउचर मोफत मिळेल. जे 6GB अॅडिशनल डेटासह असेल.

या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे. 219 रुपयांच्या प्लॅनसंदर्भात बोलायचे झाल्यास, यात यूजर्सना 14 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. याच बरोबर यूजर्सना 2GB फ्री डेटा मिळेल. याशिवाय, कंपनीने तीन नवे डेटा अॅड-ऑन्स देखील इंट्रोड्यूस केले आहेत.

तीन डेटा व्हाउचरही झाले लॉन्च - Jio 222 रुपयांत 50GB डेटा देत आहे. याची व्हॅलिडिटी चालू प्लॅनच्या व्हॅलिडिटीपर्यंत असेल. 444 रुपयांच्या डेटा व्हाउचरमध्ये यूजर्सना 100GB डेटा मिळेल. याची व्हॅलिडिटी 60 दिवसांची आहे. तिसरा प्लॅन आहे 667 रुपयांचा यात युजर्सना 150GB डेटा मिळेल. याची व्हॅलिडिटी 90 दिवसांची आहे.