Aadhaar Card हरवलंय, तरी टेन्शन घेऊ नका; करा केवळ 'इतकंच' काम, मिळेल नवं कार्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 12:48 PM2021-07-19T12:48:13+5:302021-07-19T13:08:40+5:30

Aadhaar Card Lost : आधार कार्ड हरवलं असलं तरी आता काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला पुन्हा आधार कार्ड तयार करता येऊ शकतं.

आधार कार्ड हरवलं असलं तरी आता काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला पुन्हा आधार कार्ड तयार करता येऊ शकतं.

जर तुमचं आधार कार्ड हरवलं असेल तरी तुम्हाला आता टेन्शन घेण्याची गरज नाही. तुम्ही तुमचं हरवलेलं आधार कार्ड नजीकच्या एनरॉलमेंट सेंटरवरून मिळवू शकता.

UIDAI नं ट्विटरद्वारे यासंदर्भातील माहिती दिली आहे. यानुसार तुमचा आधार तुमची कागदपत्रे जसं की ओळखपत्र, अॅड्रेल प्रुफ सादर करून आणि बायोमॅट्रिक्स ऑथेंटिकेशनद्वारे Aadhaar Enrolment Centre कडून मिळवू शकता.

परंतु पुन्हा आधार कार्ड घेण्यासाठी तुम्हाला त्यासाठी आवश्यक असलेलं शुल्क मात्र द्यावं लागणार आहे.

याशिवाय जर तुम्हाला एनरॉलमेंट आयडी माहित नसेल किंवा तुम्हाला डेमोग्राफिक माहितीबद्दल कल्पना नसेल तर मोबाईल / ईमेल आधारसोबत रजिस्टर नसेल तर तुम्ही नजीकच्या आधार केंद्राची मदत घेऊ शकता.

आधार कार्डावर नाव, पत्ता, जन्म तारीख, ईमेलसारख्या सुधारणा करण्यासाठी तुम्हाला शुल्क द्यावं लागतं. तसंच आधार कार्डवरील कोणत्याही बदलांसाठी ५० रुपये शुल्क घेतलं जातं.

बायोमॅट्रिक अपडेटसाठी ग्राहकांकडून १०० रूपये शुल्क घेतलं जातं. जर कोणीही यापेक्षा अधिक शुल्क आकारात असेल तर याविरोधात १९४७ या क्रमांकावर किंवा help@uidai.gov.in यावर तक्रार नोंदवावी लागेल.

जुन्या आधार कार्डात काही बदल करण्यासाठी शुल्क आकारलं जात असलं तरी नवं आधार कार्ड तयार करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलं जात नाही.

आधार कार्डावर पत्ता बदलण्यासाठी resident.uidai.gov.in या वेबसाईटवर जा. त्यानंतर Aadhaar Update Section मध्ये देण्यात आलेल्या 'Request Aadhaar Validation Letter' वर क्लिक करा. त्यानंतर सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टल ओपन होईल.

त्यानंतर तुमच्या १२ अंकी आधार कार्डाद्वारे लॉग इन करा. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे एक लिंक येईल.

ओटीपी आणि कॅप्चा टाकून व्हेरिफाय करा. त्यानंतर 'Proceed to Update Address' वर क्लिक करून Update Address via Secret Code चा पर्याय निवडावा लागेल.

सिक्रेट कोड एन्टर केल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या सबमिट या बटणावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला दिसणारा अपडेच रिक्वेस्ट नंबर सेव्ह करून ठेवा.

जर तुम्हाला आधार कार्डावर नावात काही बदल करायचा असेल तर तुम्हाला प्रथम ssup.uidai.gov.in या वेबसाईटवर जावं लागेल. त्यानंत त्या ठिकाणी असलेल्या प्रोसिड टू अपडेट या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल.

त्यानंतर ओपन झालेल्या पेजवर १२ अंकी आधार कार्ड क्रमांकानं लॉग इन करा. यानंतर स्क्रिनवर देण्यात आलेल्या कॅप्चा टाका आणि त्यानंतर सेंड ओटीपीवर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल.

ओटीपी एन्टर केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल. त्यामुळे तुमची वैयक्तिक माहिती तुम्हाला टाकावी लागेल. या ठिकाणी तुम्हाला नावापासून ईमेल आयडीपर्यंतचे पर्याय उपलब्ध आहेत.

त्यानंतर जर तुम्हाला नावात बदल करायचा असेल तर Name वर क्लिक करा. परंतु यासाठी तुमच्या एकडे एक अन्य आयडीप्रुफ असणं आवश्यक आहे. आयडी प्रुफ म्हणून पॅन कार्ड, लायसन्स, वोटर आयडी, रेशनकार्डाचा वापर करता येऊ शकतो.

सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला एक व्हेरिफिकेशन ओटीपी येईल त्यानंतर तो व्हेरिफाय करून सेव्ह चेंजवर क्लिक करा. अशाच प्रकारे तुम्हाला याच वेबसाईटवरून आपली जन्मतारीखही बदलता येईल.

यासाठीही सर्वप्रथम तुमचा आधार क्रमांक टाकून तो व्हेरिफाय करा. त्यानंतर ओटीपी आणि कॅप्चा कोड टाकून व्हेरिफिकेशन पूर्ण करा.

त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करून Date Of Birth निवडा. त्यानंतर त्यात आवश्यक ते बदल करून घ्या.

दरम्यान, ही प्रोसेस करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. आधार कार्डमध्ये सातत्यानं अपडेट करण्याची परवानगी देण्यात आली नाही. जन्म तारखेबद्दल नियम अतिशय कडक आहेत. ती तुम्ही केवळ एकदाच अपडेट करू शकता.