सरकारची एकच ऑर्डर अन् शेअर बनला रॉकेट! घेतली 33 टक्यांची उसळी, गुंतवणूकदारांची लागली लॉटरी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 07:13 PM2023-07-11T19:13:39+5:302023-07-11T19:24:37+5:30

...यानंतर, या स्टॉकने रॉकेट स्पीड घेतला आहे. आजही कंपनीच्या शेअरमध्ये वाढ दिसून आली.

सध्या शेअर बाजारात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. आजही सेन्सेक्स-निफ्टी हिरव्या निशाणावर बंद झाला. यातच, एका शेअरमध्ये जबरदस्त वाढ दिसून येत आहे. या कंपनीचे नाव आहे ओलेक्ट्रा ग्रीनटेक.

इलेक्ट्रिक बस तयार करणारी कंपनी ओलेक्ट्रा ग्रीनटेकला (Olectra Greentech Ltd) महाराष्ट्र सरकारकडून (maharashtra government) 10,000 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली होती. यानंतर, या स्टॉकने रॉकेट स्पीड घेतला आहे. आजही कंपनीच्या शेअरमध्ये वाढ दिसून आली.

सोमवारी 12 टक्क्यांची तेजी - ओलेक्ट्रा ग्रीनटेकच्या शेअरमध्ये सोमवारी 12 टक्क्यांची तेजी दिसून आली. यानंतर, हा स्टॉक आपल्या 52 आठवड्यांतील उच्चांकावर जाऊन पोहोचला. आज या कंपनीचा शेअर 2.41 टक्क्यांच्या तेजीसह बंद झाला. या शेअरची 52 आठवड्यांतील उच्चांकी पातळी 1,408.70 रुपये एवढी आहे.

5 दिवसांत स्टॉकमध्ये 33 टक्क्यांची तेजी - गेल्या 5 व्यवहाराच्या दिवसांत कंपनीचा शेअर 33.91 टक्के अर्थात 334.00 रुपयांपर्यंत वधारला. तसेच, गेल्या एका महिन्यात कंपनीचा शेअर 55.98 टक्यांनी वधारला.

6 महिन्यांत 167 टक्क्यांची उसळी - 6 महिन्यांपूर्वी 12 जानेवारीला कंपनीचा शेअर 493 रुपयांवर होता. जानेवारीपासून जुलैपर्यंत या स्टॉकमध्ये 167.03 टक्के अर्थात 825.05 रुपयांची तेजी आली आहे. आजच्या तेजीनंतर, हा स्टॉक 1,319 रुपयांवर बंद झाला.

मिळाली 10,000 कोटींची ऑर्डर महाराष्ट्र स्टेट रोड ट्रांसपोर्ट कॉर्पोरेशन अर्थात MSRTC कडून Olectra Greentech ला 5150 इलेक्ट्रिक (EV) बसेसची ऑर्डर मिळाली आहे. ऑर्डर व्हॅल्यू जवळपास 10000 कोटी रुपये एवढी आहे. कंपनी आगामी 2 वर्षांच्या काळात या बसची डिलिव्हरी करेल.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)