शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

खूशखबर! शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील 4,000 रुपये! फक्त 30 सप्टेंबरपूर्वी करावे लागेल 'हे' काम...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 4:14 PM

1 / 10
पीएम किसान सन्मान निधी (PM kisan Samman Nidhi) योजनेअंतर्गत लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत 2000 रुपयांऐवजी 4000 रुपयांचे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ शकतात. दरम्यान, जे शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेत नाहीत, ते आता नोंदणी करू शकतात.
2 / 10
नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2021 आहे. जर तुमचा अर्ज स्वीकारला गेला तर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात खात्यात 2000 रुपये येतील. यानंतर, डिसेंबर महिन्यात तुमच्या बँक खात्यात 2000 रुपयांचा हप्ता येईल. म्हणजेच, जर तुम्हाला 4000 रुपये मिळवायचे असतील, तर तुम्हाला 30 सप्टेंबरपर्यंत मोठी संधी आहे.
3 / 10
मीडिया रिपोर्टनुसार, केंद्र सरकार (Central Government) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाची (PM KISAN) रक्कम दुप्पट करण्याचा विचार करत आहे. असे झाल्यास, शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांऐवजी तीन हप्त्यांमध्ये (PM Kisan installment) 12000 रुपये मिळू शकतात. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 12.14 कोटी शेतकरी कुटुंबे जोडली गेली आहेत.
4 / 10
पंतप्रधान किसान सन्मान निधीचा हप्ता मिळवण्यासाठी तुमच्याकडे बँक खाते क्रमांक असणे आवश्यक आहे. आपले बँक खाते आधारशी लिंक करणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2000 रुपयांच्या हप्त्यावरून अनेक बदल करण्यात आले आहेत.
5 / 10
ज्यावेळी पहिला हप्ता देण्यात आला, त्यावेळी आधार क्रमांक आवश्यक नव्हता, दुसर्‍या हप्त्यापासून आधार क्रमांक अनिवार्य करण्यात आला. मात्र आसाम, मेघालय, जम्मू-काश्मीरला यातून सूट देण्यात आली आहे.
6 / 10
तुम्ही आपली कागदपत्रे pmkisan.gov.in या वेबसाइटवर अपलोड करू शकता. या वेबसाइटवर तुम्ही फार्मर कॉर्नरच्या पर्यायावर जा आणि तुम्हाला आधार कार्ड जोडायचा असेल तर त्यासाठी तुम्ही Edit Aadhaar Detailच्या ऑप्शनवर क्लिक करुन अपडेट करू शकता.
7 / 10
असे तपासा तुमचे नाव : १) सर्वात आधी तुम्हाला पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in ला भेट द्यावी लागेल. २) वेबसाइटच्या होम पेजवर तुम्हाला Farmers Corner चा ऑप्शन दिसेल.
8 / 10
३) Farmers Corner सेक्शनमध्ये तुम्हाला Beneficiaries List च्या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. ४) त्यानंतर तुम्हाला ड्रॉपडाऊन लिस्टमधून राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडावे लागेल.
9 / 10
५) यानंतर, तुम्हाला Get Report वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर, लाभार्थ्यांची संपूर्ण यादी दिसून येईल, ज्यामध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.
10 / 10
दरवर्षी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत मोदी सरकार शेतकऱ्यांना 2000-2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये देते. त्याअंतर्गत दर वर्षाचा पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै, दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर या कालावधीत आणि तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च या कालावधीत दिला जातो.
टॅग्स :FarmerशेतकरीPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना