फेस्टिव्हल सिझनमध्ये Jioच्या ग्राहकांची बल्ले बल्ले, मिळतोय ४५०० चा लाभ, असा घ्या फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 05:36 PM2022-10-03T17:36:18+5:302022-10-03T17:38:27+5:30

Jio fiber: सध्याच्या फेस्टिव्ह सिझनला खास बनवण्यासाठी जियोकडून जियोफायबर प्लॅनवर जबरदरस्त ऑफर दिली जात आहे. या ऑफरअंतर्गत कंपनी युझर्सना ४५०० रुपयांचे लाभ देत आहे.

जियो कंपनी जियोफायबर प्लॅनवर एक शानदार ऑफर घेऊन आली आहे. त्यामधून कंपनी साडेचार हजारांपर्यंतचा फायदा देत आहे. या ऑफरचा लाभ कसा घ्यावा, तसेच ही ऑफर कधीपर्यंत आहे, याची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.

जियोफायबर ऑफरचा लाभ ९ ऑक्टोबरपर्यंत घेता येणार आहे. ही ऑपर १ ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे.

या ऑफरचा फायदा जियोफायबरच्या दोन प्लॅन्ससह दिला जात आहे. त्यांची किंमत ही ५९९ रुपये आणि ८९९ रुपये आहे. या किमतीचं रिचार्ज केल्यासच या ऑफरचा लाभ घेता येईल. त्याशिवाय नवे कनेक्शन घेतल्यास ४५०० रुपयांच्या बेनिफिट्सचा लाभ घेता येणार आहे.

५९९ रुपयांच्या प्लॅनवरून रिचार्ज केल्यास रिलायन्स डिजिटलवर १००० रुपयांची सूट, मिंत्रावर १००० रुपयांची सूट, Ajio वर १००० रुपयांची सूट आणि Ixigo वर १५०० रुपयांची सूट मिळणार आहे. तर ८९९ रुपयांच्या प्लॅनवरून रिचार्ज केल्यास रिलायन्स डिजिटलवर ५००, मिंत्रावर ५००, Ajio वर १००० आणि Ixigo १५०० रुपयांची सवलत मिळणार आहे.

५९९ रुपयांच्या प्लॅनसोबत ३० एमबी प्रतिसेकंदच्या स्पीडसह ३.३ टीबी मासिक डेटा आणि १५ पेक्षा अधिक ओटीटी अॅप्सचा अॅक्सेस दिला जाईल. त्याशिवाय ५५० पेक्षा अधिक ऑन डिमांड टीव्ही चॅनल्सचा फायदा मिळेल. जियो साइट्सवरील माहितीनुसार १४ ओटीटी अॅप्सची किंमत २०० रुपये आहे. फायनल प्राईजवर जीएसटी लावला जाईल. ८९९ रुपयांच्या प्लॅनसोबत तुम्हाला ५९९ वालेच लाभ मिळतील. त्याबरोबरच १०० एमबी प्रतिसेकंदचा वेग मिळेल.