शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

बँकिंग, कामगार नियम, सॅलरी अन् LPG ते रेल्वे तिकीट रिफंड...; आजपासून बरंच काही बदलणार, तुमच्या खिशावर थेट परिणाम होणार...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 09:36 IST

1 / 13
आजपासून अर्थात १ एप्रिलपासून, नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात होत आहे. दरवर्षीच एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला काही नवे आणि महत्त्वाचे आर्थिक बदल होत असतात अथवा नवे नियम लागू होत असतात. या वेळीही नवीन आर्थिक वर्षासोबत काही बदल होत आहेत. यांत सॅलरी, बँकिंग एलपीजी आणि रेल्वेशी संबंधित काही महत्वाच्या नियमांचा समावेश आहे. चला तर, जाणून घेऊयात या नव्या बदलांसंदर्भात...
2 / 13
बँकिंग क्षेत्रातील बदल - आता, एटीएमवर मर्यादित मोफत व्यवहार करता येतील, त्यानंतर शुल्क आकारले जाईल. उदाहरणार्थ, एचडीएफसी बँकेच्या एटीएममधून पाच मोफत व्यवहार केल्यानंतर, यूपीआयद्वारे रोख रक्कम काढण्यासाठी प्रति व्यवहार ₹२३ शुल्क आकारले जाईल.
3 / 13
क्रेडिट स्कोअर वेगाने अपडेट होईल - भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नवीन नियमांनुसार, बँकांना आता दर आठवड्याला कर्जाशी संबंधित माहिती अपडेट करणे बंधनकारक असेल. यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर अधिक वेगाने अपडेट होईल.
4 / 13
LPG दरवाढ - एलपीजीच्या दरातही वाढ झाली आहे. यानुसार, १९ किलोचा व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर आजपासून महाग होत आहे. दिल्लीमध्ये १९ किलोच्या सिलिंडरची किंमत १९५.५० रुपयांनी, तर कोलकातामध्ये २१८ रुपयांनी वाढली असून, ही दरवाढ १ एप्रिलपासून लागू करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये १९ किलोच्या सिलिंडरची अंतिम किंमत २०७८.५० रुपये असेल, तर ५ किलोच्या FTL सिलिंडरची किंमत ५४९ रुपये (रिफिलसाठी) असेल.
5 / 13
फास्टॅग महागणार - भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) फास्टॅग वार्षिक पासची किंमत वाढवली आहे. आता त्याची किंमत ₹३,००० ऐवजी ₹३,०७५ असेल. हा वार्षिक पास अव्यावसायिक वाहनांसाठी असेल, त्याचा वापर अंदाजे १,१५० टोल प्लाझांवर करता येतो.
6 / 13
करासंदर्भातील नियमांतील बदल - आज म्हणजेच १ एप्रिलपासून जुना १९६१ चा प्राप्तिकर कायदा इतिहासजमा होत आहे. आता त्याजागी 'इन्कम टॅक्स ॲक्ट २०२५' लागू होईल. नव्या कायद्यात 'असेसमेंट इयर' आणि 'फायनान्शियल' इयर ऐवजी आता 'टॅक्स इयर' हा सुटसुटीत शब्द वापरला जाईल. नव्या टॅक्स रिजीममध्ये आता १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही.
7 / 13
याशिवाय, टीडीएससाठी फॉर्म १६ आणि १६ ए ऐवजी आता फॉर्म १३० आणि १३१ चा वापर करावा लागेल. तसेच, पॅन कार्ड बनवण्यासाठी आता केवळ आधार पुरेसे नसून, १० वीची गुणपत्रिका किंवा पासपोर्ट अनिवार्य असेल.
8 / 13
आजपासून ४ नवे लेबर कोड - वेतन संहिता, सामाजिक सुरक्षा संहिता, औद्योगिक संबंध संहिता आणि व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या परिस्थितीची संहिता. या चार कोडमुळे आधीचे 44 वेगवेगळे कामगार कायदे एकत्र करून सोपे आणि पारदर्शक कायदे तयार करण्यात आले आहेत.
9 / 13
कर्मचाऱ्यांना फ्लेक्सिबल वर्किंग कल्चर - नवीन लेबर कोडअंतर्गत, कामाच्या तासांत काहीही बदल करण्यात आलेला नाही. ते रोज ८ तास आणि साप्ताहिक ४८ तास राहतील. नियोक्ता आता कर्मचाऱ्यांना फ्लेक्सिबल वर्किंग कल्चर देऊ शकतील. साप्ताहिक कामाच्या तासांच्या व्यवस्थापनाच्या आधारावर अतिरिक्त ओव्हरटाइमचे पर्यायही उपलब्ध असतील.
10 / 13
महिलांना अधिक संधी - महत्वाचे म्हणजे, नव्या नियमांनुसार महिलांना अधिक संधी देण्यात आल्या आहेत. सुरक्षिततेसह रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करण्याची परवानगी आणि समान कामासाठी समान वेतन द्यावे लागणार आहे. याशिवाय, ४० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या कामगारांना मोफत वार्षिक आरोग्य तपासणीचा अधिकार देण्यात आला आहे.
11 / 13
रेल्वे तिकीट रिफंड नियम - रेल्वे तिकीट रद्द करण्याच्या नियमात मोठा बदल करण्यात आला आहे. आता रेल्वे सुटण्यापूर्वी ८ तासांच्या आत तिकीट रद्द केल्यास एकही रुपया रिफंड मिळणार नाही, ही मर्यादा आधी ४ तास होती. ८ ते २४ तास आधी रद्द केल्यास ५० टक्के रक्कम परत मिळेल.
12 / 13
याशिवाय, २४ ते ७२ तास आधी रद्द केल्यास २५ टक्के रक्कम कपात केली जाईल. ७२ तासांपूर्वी रद्द केल्यावरच जास्तीत जास्त परतावा मिळू शकेल. महत्वाचे म्हणजे, अशा स्थितीतही पूर्ण परतावा मिळणार नाही.
13 / 13
याशिवाय, २४ ते ७२ तास आधी रद्द केल्यास २५ टक्के रक्कम कपात केली जाईल. ७२ तासांपूर्वी रद्द केल्यावरच जास्तीत जास्त परतावा मिळू शकेल. महत्वाचे म्हणजे, अशा स्थितीतही पूर्ण परतावा मिळणार नाही.
टॅग्स :TaxकरSalaryपगारFastagफास्टॅगBanking Sectorबँकिंग क्षेत्रatmएटीएमhdfc bankएचडीएफसीEmployeeकर्मचारीMONEYपैसा