Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य : २६ मार्च ते १ एप्रिल २०२३: धनलक्ष्मी प्रसन्न राहिल, वरिष्ठांकडूनही कौतुक होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 09:14 AM2023-03-26T09:14:26+5:302023-03-26T09:21:10+5:30

Weekly Horoscope: जाणून घ्या कसा असेल हा आठवडा?

या सप्ताहात ३१ मार्च रोजी बुध मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करेल. अन्य ग्रहस्थिती अशी- राहू, हर्षल आणि शुक्र मेषेत आहेत. ३१ रोजी बुध मेषेत येत आहे. मंगळ मिथुनेत, केतू तुळेत, प्लूटो मकरेत, शनी कुंभेत आहे. रवी, गुरु, नेपच्यून व बुध मीन राशीत आहेत.

बुध ३१ नंतर राश्यांतर करेल. चंद्राचे भ्रमण वृषभ, मिथुन, कर्क व सिंह राशीतून राहील. रविवार, दि. २६ मार्च २०२३ रोजी चैत्र शुक्ल पंचमी (दुपारी ४.३३ पर्यंत) आहे. दुपारी २.०१ पर्यंत कृत्तिका तर त्यानंतर रोहिणी नक्षत्र राहील. रास वृषभ राहील. दिवस सामान्य राहील. राहू काळ सायंकाळी ४.३० ते ६ या वेळेत राहील.

मेष- यश मिळेल. सप्ताहाच्या सुरुवातीपासून उत्साही वातावरण राहील. मनात आनंदी विचार राहतील. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. जवळच्या लोकांच्या सहवासात याल. खाण्यापिण्याची चंगळ राहील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. मौजमजा करण्यासाठी वेळ द्याल. व्यवसायात भरभराट होईल. चांगल्या बातम्या कळतील. नोकरीत अनुकूल घटना घडतील. कामात नवीन बदल होतील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील.

वृषभ- धनलाभ होईल. नोकरीत अनुकूल घटना घडतील. काहींना मोठी संधी मिळेल. जबाबदारी योग्य रीतीने पार पाडाल. वरिष्ठांकडून शाबासकीची थाप पाठीवर पडेल. मनात आनंदी विचार राहतील. धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. एखाद्या उलाढालीत मोठा फायदा होऊ शकतो. ज्येष्ठ मंडळींकडून योग्य मार्गदर्शन मिळेल. काही फायदे होतील. आवडत्या खाद्यपदार्थाचा आस्वाद घेता येईल. भावंडांशी सख्य राहील. जवळच्या प्रवासाचा योग येईल. चैनीवर खर्च करण्याकडे कल राहील. विविध प्रकारचे लाभ होतील.

मिथुन- प्रगती होईल. ग्रहमानाची अनुकूलता या सप्ताहात राहील. कार्यक्षेत्रात तुमच्या हातून चांगली कामे होतील. प्रगतीला पूरक वातावरण राहील. विविध प्रकारचे लाभ होतील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. मनात उत्साही विचार राहतील. नवीन काही तरी करून दाखवण्याची ऊर्मी राहील. विवाहेच्छूसाठी अनुकूल काळ आहे. चांगल्या स्थळांचे प्रस्ताव समोर येतील.. प्रेमात सफलता मिळेल. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. आर्थिक आवक चांगली राहील. आवडत्या छंदासाठी वेळ काढा.

कर्क- लोकांची साथ राहील. सप्ताहाच्या सुरुवातीलाच आर्थिक लाभ होतील. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. लोकांची चांगली साथ राहील. विविध प्रकारचे लाभ होतील. खर्च करण्याकडे कल राहील. जीवनसाथीची चांगली साथ राहील. प्रेमात यश मिळेल. आपण नवीन नोकरीच्या शोधात असाल तर त्या कामात सफलता मिळेल. काही अडून राहिलेली कामे गती घेतील. अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळेल. आपण हाती घेतलेल्या कामात मदत करण्यासाठी परिचयातील व्यक्ती पुढाकार घेतील.

सिंह - ओळखीतून फायदा होईल : मनात आनंदी विचार राहतील. विविध प्रकारचे लाभ होतील. सोप्या रीतीने कामे पूर्ण होतील. नोकरीत अनुकूल घटना घडतील. नवीन ओळखी होतील. त्यातून फायदा होईल. घरी पाहुणे येतील. घराकडे लक्ष देण्यास वेळ मिळेल. अचानक मोठी संधी मिळेल. धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. मोठे आर्थिक लाभ होतील. मित्र मंडळींचे सहकार्य मिळेल. अनावश्यक खर्च होईल. चांगल्या बातम्या कानावर पडतील. एखादे आवडते पुस्तक वाचून काढा.

कन्या - भाग्याची चांगली साथ तुम्हाला मिळेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. समाजात तुमचा गौरव होईल. नोकरीत अनुकूल घटना घडतील. नवीन संधी चालून येतील. घरात मंगलकार्य ठरु शकते. पाहुण्यांची ये जा चालू राहील. मित्र मंडळींचे सहकार्य मिळेल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. हाती घेतलेले प्रकल्प यशस्वी कराल. जीवनसाथीची चांगली साथ राहील. वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. जीवनसाथीला भेटवस्तू देण्यास हरकत नाही.

तूळ - सप्ताहाच्या सुरुवातीला आपल्याला काही अडचणी जाणवतील. मात्र, अनेकांचे सहकार्य मिळेल. त्यामुळे अडचणीतून मार्ग काढण्यात यश मिळेल. नोकरीत वरिष्ठांना नाराज करू नका. आपले काम चोखपणे करत राहा. सहकारी वर्गाशी वाद होणार नाहीत, याची काळजी घ्या. काहींना बदलीला सामोरे जावे लागेल. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. प्रसिद्धी, मानसन्मान मिळेल. मुलांच्या यशाच्या वार्ता कानी पडतील.

वृश्चिक- या सप्ताहात अचानक धनलाभ होऊ शकतो. लॉटरीचे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. एखाद्या उलाढालीत मोठा फायदा होईल. जीवनसाथीची चांगली साथ राहील. व्यवसायात भरभराट होईल. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. पर्यटनाच्या निमित्ताने फिरणे होईल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे. मुलांची प्रगती होईल. त्यांना योग्य संधी मिळेल. चांगल्या मित्रांच्या संगतीत राहा. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. सकस आहार आणि आराम याकडे लक्ष द्या.

धनु- ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. काही चांगल्या बातम्या कळतील. वेगवान घटना घडामोडींचा काळ आहे. मुलांची काळजी मिटेल. त्यांना चांगल्या संधी मिळतील. महत्त्वाचा निरोप येईल. नोकरीत कामाचा ताण कमी होईल. तुमचे महत्त्व वाढेल. काहींना बढती, पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. भेटवस्तू मिळतील. वाहन जपून चालवा. रहदारीचे नियम पाळा. आरोग्याची काळजी घ्या. टीप- मंगळवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस.

मकर- व्यवसायात भरभराट होईल : सतत कार्यरत राहावे लागेल. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल. नवीन नोकरीच्या मुलाखती देत असाल तर काम होईल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे. मुलांचे कौतुक होईल. तब्येतीची काळजी घ्या. वेळच्या वेळी औषधोपचार करणे आवश्यक आहे. जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल. तरुण वर्गाला प्रेमात अनुकूल प्रतिसाद मिळेल. भावंडांची साथ राहील. काहींना प्रवास घडून येईल.

कुंभ- नवीन संधी मिळेल : संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. व्यवसायात यशस्वी वाटचाल सुरु राहील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ होईल. भावंडांशी काही कारणाने गैरसमज होऊ शकतात. वडीलधाऱ्या मंडळींचा मान राखा. नोकरीत बदलीची शक्यता आहे. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल, मानसन्मान प्राप्त होईल. मुलांची प्रगती होईल. चांगल्या लोकांच्या सहवासात राहा. काही लोक तुम्हाला गोत्यात आणण्याचा प्रयत्न करतील. थोडे सावध राहा.

मीन- व्यापार उद्योगात यशस्वी वाटचाल कराल. तुमचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. घरात आनंदी वातावरण राहील. मंगलकार्य, एखाद्या समारंभाचे आयोजन केले जाईल. नोकरीत अचानक मोठी संधी मिळेल. मानसन्मान मिळेल. पगारवाढ मिळू शकते. नवीन जबाबदारी अंगावर पडेल. मुलांना योग्य संधी मिळेल. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. मोठी गुंतवणूक करताना काळजी घ्या.