साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना हवे तसे यश, कामे होतील; उसनवारी परत मिळेल, कोणाला कठीण काळ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 11:16 IST2025-11-23T10:56:25+5:302025-11-23T11:16:05+5:30
Weekly Horoscope: २३ नोव्हेंबर २०२५ ते २९ नोव्हेंबर २०२५ तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य…

Weekly Horoscope: या सप्ताहात बुधाचे वृश्चिकेतून तूळ राशीत वक्री राश्यांतर आणि शुक्राचा तूळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश होत आहे. ग्रहस्थिती अशी- हर्षल वृषभ राशीत, गुरू कर्क राशीत, केतु सिंह राशीत आहे. रविवारी रात्री ८.०६ वाजता बुध वक्री तूळ राशीत येत आहे. शुक्र तूळ राशीत असून, बुधवारी तो वृश्चिक राशीत जाईल. तेथे त्याची युती रवी आणि मंगळ यांच्याशी होईल. प्लूटो मकर राशीत, राहु कुंभ राशीत आहे. शनि आणि नेपच्यून मीन राशीत आहेत.

चंद्राचे भ्रमण धनु, मकर, कुंभ आणि मीन या राशींमधून राहील. या सप्ताहात सोमवारी विनायकी चतुर्थी, मंगळवारी नागदिवे पूजन, बुधवारी चंपाषष्ठी आहे. गुरुवारी दुपारी २.०८ पासून पंचक सुरू होत आहे. शुक्रवार, शनिवार पंचक आहे.

शुक्राचा वृश्चिक राशीत प्रवेश आणि वक्री बुधाचे तूळ राशीत गोचर अनेकार्थाने महत्त्वाचे मानले जात आहे. शुक्राच्या प्रवेशाने वृश्चिक राशीत त्रिग्रही योग जुळून येत आहे. तसेच शुक्रादित्य, मंगल आदित्य असे राजयोगही जुळून येत आहेत. एकूणच ग्रहस्थितीचा कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घेऊया...

मेष: ह्या आठवड्यात सतर्क राहावे लागेल. व्यवसायात यशस्वी होण्यासाठी मेहनत वाढवावी लागू शकते. व्यावसायिक यश मिळण्यास विलंब होऊ शकतो. नोकरी बदलावयाची असल्यास थोडे थांबावे. दांपत्य जीवनात समस्यांना सामोरे जावे लागू शकते. क्रोध वाढल्याने तणाव निर्माण होऊ शकतो. जर कोणाला उसने पैसे दिले असतील तर ते ह्या आठवड्यात परत मिळण्याची संभावना आहे. खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल. हा आठवडा विद्यार्थ्यांना अनुकूल आहे. त्यांना जर एखादा विषय बदलावयाचा असेल तर ते ह्या आठवड्यात तो बदलू शकतात. त्यांना यशस्वी होण्यासाठी मित्रांच्या संगती पासून थोडे दूर राहावे लागेल इतकेच.

वृषभ: ह्या आठवड्यात आरोग्य विषयक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. व्यवसायात मेहनत वाढवावी लागेल. एखाद्या गोष्टीमुळे व्यावसायिक भागीदाराशी वाद होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांची पदोन्नती होण्यास विलंब होऊ शकतो. तेव्हा त्यांनी इमानदारीत आपले काम करत राहावे. ह्या आठवड्यात आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. चुकीच्या ठिकाणी खर्च करण्याची संभावना आहे. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात रमणार नाही. ते त्यांच्या मित्रांसह हिंडण्या-फिरण्यात वेळ वाया घालविण्याची शक्यता आहे. यशस्वी होण्यासाठी त्यांना मेहनत करावीच लागेल.

मिथुन: ह्या आठवड्यात आरोग्य विषयक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. हा आठवडा व्यापारास अनुकूल आहे. पूर्वी एखादा सौदा रद्द झाला असल्यास तो पुन्हा मिळू शकतो. नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. प्रसन्न व्हाल. सर्व काही सुरळीत होईल. ह्या आठवड्यात जास्त पैसा खर्च होऊ शकतो. विद्यार्थ्यांच्या हातून एखादी चांगली संधी निसटल्याने ते त्रासून जातील.

कर्क: मोबाईल किंवा लॅपटॉपवर काम करत असाल तर अधून-मधून डोळ्यांची तपासणी करून घ्यावी. व्यापाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. प्रगतीची संधी मिळेल. विदेशी व्यक्ती द्वारा त्यांच्या व्यवसायास प्रसिद्धी मिळेल. ह्या आठवड्यात नोकरी करणाऱ्यांची पदोन्नती संभवते. वैवाहिक जीवनात खूप दिवसांपासून एखाद्या समस्येने आपण त्रस्त असाल तर ती ह्या आठवड्यात दूर होऊ शकेल. हा आठवडा आर्थिक दृष्ट्या अनुकूल आहे. घरासाठी काही नवीन वस्तूंची खरेदी करण्यासाठी पैसा खर्च करू शकता. विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी सामाजिक माध्यमांपासून दूर राहावे.

सिंह: ह्या आठवड्यात प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. ह्या आठवड्यात व्यापारी एखाद्या नवीन कामाची सुरवात करू शकतात. काही प्रतिष्ठित व्यक्तींशी ओळख होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात सावध राहावे. विरोधक पदोन्नती स्थगित करू शकतात. वैवाहिक जोडीदारास एखादी नवीन नोकरी मिळू शकते. असे झाल्याने कौटुंबिक वातावरणात आनंद पसरेल. कोणालाही उसने पैसे देऊ नये. एखाद्या सरकारी योजनेत आर्थिक गुंतवणूक करू शकता. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. त्याकडे दुर्लक्ष केल्यास त्यांना त्रास होऊ शकतो.

कन्या: ह्या आठवड्यात प्रकृती उत्तम राहील. ह्या आठवड्यात आपल्या व्यापारवृद्धीसाठी परदेशी लोकांशी संपर्क साधू शकता, जे जास्तीत जास्त आर्थिक मदत करू शकतील. नोकरी करणाऱ्यांना त्यांनी पूर्वी सोडलेल्या ठिकाणाहून पुन्हा बोलावणे येऊ शकते. वैवाहिक जीवनात लहान-सहान गोष्टींमुळे भांडण होऊ शकते. मन त्रस्त होईल. पूर्वी केलेल्या आर्थिक गुंतणुकीतून ह्या आठवड्यात लाभ होऊ शकतो. असे असले तरी ह्या आठवड्यात खर्चात निष्कारण वाढ होईल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. समाज माध्यम व काही मित्रांपासून थोडे दूर राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित केले तर परीक्षेत ते यशस्वी होऊ शकतात.

तूळ: ह्या आठवड्यात आपली प्रकृती उत्तम राहील. शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी नियमितपणे योगासन व प्राणायाम करावा. कारकिर्दीत एखादे नवीन कार्य करावयाचे असेल तर त्यासाठी आठवडा अनुकूल आहे. व्यापाऱ्यांनी थोडे सतर्क राहावे. नोकरी करणाऱ्यांनी सावध राहून आपली कामे करावीत. सध्या नोकरी बदलण्याचा विचार करू नये. आर्थिक दृष्ट्या आठवडा चांगला आहे. एखाद्या प्रॉपर्टीत गुंतवणूक करू शकता. कुटुंबासाठी एखादी वस्तू खरेदी करावयाची असल्यास ती विचारपूर्वक करावी. विद्यार्थ्यांना अति आत्मविश्वासामुळे एखाद्या स्पर्धेत निराश व्हावे लागू शकते. प्रगतीसाठी एखाद्या नवीन अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ शकतात.

वृश्चिक: ह्या आठवड्यात प्रकृती काहीशी नाजूक राहील. ह्या आठवड्यात आहारावर नियंत्रण ठेवल्यास हितावहच होईल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी जास्त अनुकूल आहे. व्यवसायात एखाद्या नवीन प्रकल्पाची सुरवात करू शकतात. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्री काही नवीन शिकावयास मिळू शकते. कार्यालयीन राजकारणापासून थोडे दूर राहावे. हा आठवडा आर्थिकदृष्ट्या मिश्र फलदायी आहे. विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला आहे. एखादी नोकरी करावयाची असेल तर ती करू शकता. विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी जास्त मेहनत करावी लागेल.

धनु: ह्या आठवड्यात उर्जायुक्त असाल. आहारावर नियंत्रण ठेवावे. कारकिर्दीतील कामगिरीने अत्यंत खुश होऊ शकाल. व्यापारात एखादा मोठा प्रकल्प मिळण्याची संभावना आहे. नोकरीत यशस्वी होण्यासाठी अजून थोडे शिक्षण घ्यावे लागेल. नोकरीच्या ठिकाणी एखाद्या सहकाऱ्याशी कोणत्याही कारणाने दुरावा निर्माण झाला असल्यास तो ह्या आठवड्यात दूर होऊ शकेल. वैवाहिक जीवनास आठवडा अनुकूल आहे. अनेक दिवसांपासून असलेली एखादी समस्या ह्या आठवड्यात दूर होऊ शकते. ह्या आठवड्यात आर्थिक स्थिती थोडी नाजूक राहील. त्यामुळे त्रासून जाण्याची संभावना आहे. विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला आहे. त्यांना कुटुंबियांचे पूर्ण सहकार्य मिळेल.

मकर: हा आठवडा ठीक आहे. ह्या आठवड्यात व्यापाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. नोकरी करणाऱ्यांना विचारपूर्वक कामे करावी लागतील. सर्व समस्यांना धैर्याने सामोरे जावे लागेल. ह्या आठवड्यात कुटुंबीय कामानिमित्त बोलणी करण्याची शक्यता आहे. ह्या आठवड्यात अचानक धनलाभ होण्याची संभावना आहे. त्यामुळे खुश व्हाल. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांनी मित्रांपासून थोडे दूर राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.

कुंभ: ह्या आठवड्यात शारीरिक शक्ती जास्त नाजूक राहील. प्रॉपर्टी डिलर असाल तर मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना ह्या आठवड्यात जास्त मेहनत करावी लागू शकते. वैवाहिक जीवनात कटुतेची स्थिती निर्माण होऊ शकते. भांडण-तंटा होण्याची शक्यता आहे. ह्या आठवड्यात एखाद्या प्रॉपर्टीत आर्थिक गुंतवणूक करू शकता. लाभ प्राप्ती होईल. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांना एखादी मोठी सिद्धी प्राप्त होऊ शकते.

मीन: ह्या आठवड्यात प्रकृती त्रास देऊ शकते. निष्कारण क्रोधीत होऊन अति तणावात याल. व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यापारातील जुन्या कामामुळे चांगला लाभ प्राप्त होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांनी कार्यक्षेत्री अति सावध राहून कामे करावीत. त्यांना एखाद्या नवीन नोकरीची ऑफर आली तर त्यांनी आधी त्याची नीट चौकशी करावी. दांपत्य जीवन सुखद होईल. ह्या आठवड्यात निष्कारण काही खर्च झाल्याने जास्त पैसा खर्च होऊ शकतो. कुवत बघून खर्च करावा. कर्ज होऊ शकते. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांचे मन समस्यांमुळे त्रासून जाईल. ते आपले लक्ष अभ्यासावर केंद्रित करण्याचा प्रयत्न करतील, परंतु समस्यांमुळे त्यांचे लक्ष विचलित होऊ शकते.

















