साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 08:45 IST2025-07-20T08:33:00+5:302025-07-20T08:45:59+5:30
Weekly Horoscope: २० जुलै २०२५ ते २६ जुलै २०२५ तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य…

Weekly Horoscope: या सप्ताहाच्या शेवटी शनिवारी शुक्र मिथुन राशीत जाईल. अन्य कुठलाही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी- शुक्र आणि हर्षल वृषभ राशीत असून, २६ रोजी शुक्र मिथुन राशीत जाईल. तेथे त्याची युती गुरूशी होईल. रवि आणि बुध कर्क राशीत, मंगळ आणि केतु सिंह राशीत, प्लूटो मकर राशीत, राहु कुंभ राशीत, तर शनि आणि नेपच्यून मीन राशीत आहेत.
चंद्राचे भ्रमण वृषभ, मिथुन, कर्क आणि सिंह या राशींमधून राहील. सोमवारी कामिका एकादशी, मंगळवारी प्रदोष, गुरुवारी दर्श अमावास्या, दीपपूजन आहे, दुपारी ४:४४ पर्यंत गुरुपुष्यामृत आहे. २५ जुलैपासून श्रावण महिना सुरू होत आहे.
यंदा श्रावण महिन्याची सुरुवात शुक्रवारी होत आहे. श्रावणी शुक्रवारी जिवतीची पूजा केली जाते. कर्क राशीत बुधादित्य राजयोग आहे. वृषभ राशीत मालव्य राजयोग आहे. एकंदरीत ग्रहस्थिती पाहता कोणत्या राशींवर कसा प्रभाव असेल? तुमची रास कोणती? तुमच्यासाठी हा आठवडा कसा असेल? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घेऊया...
मेष: ह्या आठवड्यात अत्यंत व्यस्त राहणार आहात. विवाहित व्यक्ती त्यांच्या जोडीदारास खुश करण्याचा प्रयत्न करतील. त्यासाठी त्यांना कुटुंबियांच्या सहकाराची गरज भासेल. ह्या आठवड्यात धनलाभ होईल. पैसा जर कोठे अडकला असेल तर तो ह्या आठवड्यात मिळण्याची संभावना आहे. शेअर्स बाजार किंवा लॉटरी इत्यादीत गुंतवणूक करून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांनी मात्र ह्या आठवड्यात कोणत्याही प्रकारे मोठी आर्थिक गुंतवणूक करू नये. तसेच कोणाबरोबर भागीदारीत व्यवसाय करू नये. नोकरी करणाऱ्या व्यक्ती खुश होतील. पदोन्नतीची बोलणी होऊ शकतात. मित्राकडून एखाद्या नवीन नोकरीची माहिती मिळू शकते. विद्यार्थ्यांना मेहनतीचे यथोचित फळ मिळेल. एखाद्या संशोधनाची तयारी जर करत असतील तर त्यात यशस्वी होतील. एखाद्या परीक्षेत त्यांना अपेक्षित परिणाम मिळेल.
वृषभ: हा आठवडा चांगले परिणाम घेऊन येणारा आहे. विवाहितांना जोडीदाराच्या बोलण्याकडे लक्ष द्यावे लागेल. एखादा जुना वाद दूर करण्यासाठी मुलांची मदत होऊ शकते. प्राप्ती कमी झाल्याने आर्थिक टंचाईचा सामना करावा लागेल. असे असून छंद पूर्ण होतील. एखाद्या कामातून पैसे मिळण्याची अपेक्षा असली तरी त्यात पैसे थोडे कमी मिळतील. व्यापाऱ्यांनी जर एखाद्या वस्तूवर सूट दिली तर ती त्यांच्या समस्या वाढण्यास कारणीभूत ठरेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना अंतर्गत राजकारणामुळे त्रास होऊ शकतो. इतरांपासून थोडे दूर राहावे. विद्यार्थी अध्ययनात कोणत्याही प्रकारे घाई करणार नाहीत. एखादे टेन्शन असले तरी त्याचा विपरीत प्रभाव परीक्षेच्या परिणामांवर होणार नाही.
मिथुन: ह्या आठवड्यात काही कामामुळे गोंधळून जाल. विवाहितांना त्यांच्या जीवनात सावध राहावे लागेल. मुलांच्या कारकिर्दीत एखादी समस्या असू शकते, जी चर्चा करून दूर करावी लागेल. ह्या आठवड्यात आर्थिक बाबीची काळजी करावी लागणार नाही. मजेत राहाल. भविष्यासाठी एखादी मोठी योजना आखू शकता. शेअर्स बाजाराशी संबंधित लोकांसाठी हा आठवडा चांगला आहे. ह्या आठवड्यात व्यापाऱ्यांची नवीन लोकांशी ओळख होईल, जी लाभदायी ठरेल. मार्केटिंग किंवा ऑटोमोबाईल व्यवसायाशी संबंधित लोकांना ह्या आठवड्यात चांगला लाभ होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना एखाद्या दुसऱ्या नोकरीच्या ऑफेरवर लक्ष ठेवावे लागेल, जी प्रगतीस कारणीभूत होऊ शकेल. विद्यार्थ्यांना बाहेरगावी जाऊन अभ्यास करण्याचा लाभ होईल. कुटुंबीय त्यांना पूर्ण सहकार्य करतील. कोणत्याही प्रकारच्या टेन्शनचा परिणाम अभ्यासावर होणार नाही ह्याची काळजी घ्यावी. आहारावर नियंत्रण ठेवावे.
कर्क: हा आठवडा चांगला आहे. विवाहित व्यक्ती नात्यातील दोष दूर करून वाटचाल करण्याचा प्रयत्न करतील. ह्या दरम्यान कोणाच्या सांगण्यावरून इतरांच्या भांडणात मध्यस्थी करू नये. हा आठवडा आर्थिकदृष्ट्या चांगला आहे. एखादे नवीन वाहन, घर इत्यादींची खरेदी करू शकता. बराचसा पैसा खर्च कराल. इतका खर्च करून आर्थिक स्थिती मजबूतच राहील. व्यापाऱ्यांना विचारपूर्वक वाटचाल करावी लागेल. कोणतेही काम भागीदारीत केल्यास ते नुकसानदायी होईल. भागीदारीत व्यवसाय करण्याचा सौदा कोणा बरोबरही करू नये. नोकरी करणाऱ्यांना मेहनतीचे फळ मिळेल. वरिष्ठ कामगिरीने खुश होऊन पदोन्नतीचा विचार करू शकतील. विद्यार्थ्यांना मेहनत वाढवावी लागेल. असे करूनही अपेक्षित परिणाम मिळू शकणार नाही. मात्र लक्ष अभ्यासावर केंद्रित करावे. दुसऱ्या कॉलेजात प्रवेश घेण्याचा विचार करू शकता.
सिंह: हा आठवडा सामान्यच आहे. विवाहित व्यक्ती जोडीदाराच्या विचित्रपणामुळे समस्याग्रस्त होतील. कोणताही निर्णय घेणे जड जाईल. खर्चाच्या बाबतीत सतर्क राहावे लागेल. जेणेकरून भविष्यासाठी चांगली गुंतवणूक करण्याची तयारी करता येईल. एखाद्या प्रॉपर्टीत दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणे हिताचे होईल. वेब डिझाईन मार्केटिंगशी संबंधित लोकांना चांगल्या ऑर्डर्स मिळतील. त्यात चांगले यशस्वी होण्याची संभावना आहे. व्यापारात मनाप्रमाणे लाभ होईल. नोकरी करणाऱ्यांना एखादी खुशखबर मिळू शकते. तेव्हा कामे चोख करावीत. कोणालाही गुप्त माहिती देऊ नये. विद्यार्थ्यांनी अति आत्मविश्वासात राहू नये. असे झाल्यास स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यात समस्या निर्माण होऊन प्रगती खुंटू शकते.
कन्या: हा आठवडा प्रेमीजनांच्या नात्यात काही कमीपणा घेऊन येणारा आहे. प्रेमिकेस महत्त्व द्यावे लागेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात जर काही गोंधळ झाला असेल तर तो दूर करण्यासाठी कुटुंबीयांची मदत घेऊ शकतात. हा आठवडा काही आर्थिक चिंता घेऊन येणारा आहे. पैसे खर्च करताना आर्थिक समस्यांकडे दुर्लक्ष होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. दुसऱ्या नोकरीची ऑफर येऊ शकते. ह्या आठवड्यात फिरावयास जाऊ शकता. व्यापाऱ्यांचे त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित नसल्याने काही समस्या उद्भवू शकतात. परंतु काही नवीन संपर्क व्यवसायास चांगला लाभ देऊ शकतील. विद्यार्थी अभ्यासात थोडी सूट घेतील त्यामुळे एखाद्या स्पर्धेत यशस्वी होण्यास अडथळा येऊ शकतो. आहारावर थोडे नियंत्रण ठेवावे लागेल.
तूळ: हा आठवडा सामान्य आहे. विवाहितांना समन्वय साधावा लागेल. जेणेकरून त्यांचे नाते दृढ होऊ शकेल. ह्या आठवड्यात जरी पूर्वीपेक्षा आर्थिक स्थिती चांगली राहिली तरी विचारपूर्वक खर्च करावा. भविष्यासाठी आर्थिक नियोजन केल्यास चांगला लाभ मिळण्याची संभावना आहे. व्यापाऱ्यांना मेहनीतचे फळ मिळेल. तेव्हा मेहनत चालूच ठेवावी. नोकरीत मोठा बदल करणे हितावह होईल. एखाद्या ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केला तर ती मिळण्याची संभावना आहे. विद्यार्थी अभ्यासासाठी आवश्यक तितका वेळ काढतील. एखादे टेन्शन असल्यास मनावर न घेता अभ्यासास प्राधान्य दिल्यास यशाची पायरी ते चढू शकतील.
वृश्चिक: हा आठवडा काही परिणाम घेऊन येणारा आहे. विवाहितांनी नात्यात एखादे महत्त्वाचे पाऊल उचलू नये. काही समस्या असेल तर ती दूर करण्यासाठी कुटुंबीयांची मदत ते घेऊ शकतात. हा आठवडा आर्थिकदृष्ट्या चांगला आहे. दीर्घ कालावधीसाठी आर्थिक गुंतवणूक कराल, जी उपयुक्त ठरेल. एखाद्या प्रॉपर्टीत गुंतवणूक केल्याने चांगला लाभ होईल. व्यापाऱ्यांना व्यवसायात कोणाशी भागीदारी करण्याची गरज भासणार नाही. भागीदारानी व्यवसायास नवीन दिशा जरी दिली तरी ते आर्थिक धोका देण्याची संभावना आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींवर कामाचे आधिक्य राहील. त्यामुळे ते त्रासून जातील. असे असूनही कामे वेळेवर पूर्ण करतील. विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या बाबतीत सतर्क राहावे लागेल. कोणी सल्ला दिला तर विचारपूर्वक अंमलबजावणी करावी. एखाद्या स्पर्धेत सहभागी होणे हिताचे होईल.
धनु: हा आठवडा प्रेमीजनांच्या जीवनात गोंधळ उडवणारा आहे. ह्या आठवड्यात प्रेमिकेस प्राधान्य द्यावे लागेल. अन्यथा नात्यात भांडण होऊ शकते. विवाहितांनी कौटुंबिक नात्यात भांडण वाढू देऊ नये. ते वाढल्यास नात्यात दुरावा येऊ शकतो. सुख-सोयींवर लक्ष केंद्रित कराल. त्यासाठी भरपूर पैसा खर्च कराल. परंतु, बचतीकडे लक्ष द्यावे लागेल, जेणेकरून भविष्यात आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. व्यापारी भागीदारीत एखादे काम करण्याचा निर्णय घाईघाईत घेतील व त्यामुळे एखादी मोठी ऑर्डर हातून जाऊन व्यवसायात नवीन समस्या निर्मण होईल. नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठांच्या चुकीला पाठिंबा देऊ नये. विद्यार्थ्यांनी लक्ष अभ्यासावर केंद्रित केल्यास अपेक्षित अभ्यासक्रमात प्रवेश मिळविण्यात यश प्राप्त होऊ शकेल.
मकर: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. विवाहितांनी ह्या आठवड्यात तणाव निवळण्याचा प्रयत्न करावा. हा आठवडा आर्थिकदृष्ट्या उत्तम आहे. ह्या आठवड्यात एखाद्या मोठ्या योजनेत आर्थिक गुंतवणूक करू शकता. भविष्यात चांगला लाभ होईल. ह्या आठवड्यात कोणालाही पैसे उसने देऊ नये. व्यापाऱ्यांना जर एखादे नवीन काम सुरू करावयाचे असेल तर हा आठवडा प्रतिकूल आहे. तेव्हा कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नये. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना समस्यांना सामोरे जावे लागले तरी ते वरिष्ठांना खुश करण्याचा प्रयत्न करतील. कामात कनिष्ठांचे सहकार्य मिळेल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे. एखाद्या स्पर्धेत भाग घेतला तर यशस्वी होण्याची संभावना आहे. एखाद्या विषयात समस्या येत असेल तर तो बदलण्यासाठी अध्यापकांशी बोलू शकतात.
कुंभ: हा आठवडा प्रगती करणारा आहे. विवाहितांना समस्येस सामोरे जावे लागेल. ह्या आठवड्यात आर्थिक बाबींसाठी सावध राहावे लागेल. लोकांना प्रभावित करण्यासाठी भरपूर पैसा खर्च कराल. प्राप्तीचे नवीन स्रोत शोधून आर्थिक स्थिती मजबूत करावी. व्यापाऱ्यांना ह्या आठवड्यात भरपूर मेहनत करावी लागेल. असे केल्यासच त्यांना यश प्राप्त होऊ शकेल. नोकरी करणाऱ्यांनी कार्यक्षेत्री असलेल्या राजकारणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा पदोन्नतीवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. वरिष्ठांनी दिलेले काम वेळेवर पूर्ण करावे लागेल. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांची एकाग्रता न झाल्याने ते त्रासून जातील. मन स्थिर नसल्याने अभ्यासात मोठा अडथळा येईल. ह्या आठवड्यात आपण कोणताही मोठा निर्णय घेऊ नये.
मीन: हा आठवडा चांगला आहे. वैवाहिक जीवनात काही भांडणामुळे तणाव तर असेलच परंतु तितकेसे महत्व देणार नाहीत. ह्या आठवड्यात आर्थिक चणचण भासणार नसली तरी वायफळ खर्चांमुळे समस्यांना सामोरे जावे लागेल. आर्थिक स्थिती डळमळीत होऊ शकते. भविष्यासाठी काही आर्थिक गुंतवणूक करा. व्यापाऱ्यांना घाई केल्याने एखादे नवीन टेन्शन येऊ शकते. कामे धीराने करावीत. नोकरी करणाऱ्यांनी कामात कोणताही सैलपणा ठेवू नये. विद्यार्थ्यांना टेन्शन अभ्यासापासून दूर ठेवावे लागेल, जेणेकरून अभ्यासावर लक्ष केंद्रित होऊ शकेल. नोकरीसाठी एखादे प्रशिक्षण घेत असाल तर त्यात यशस्वी व्हाल.