साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना घवघवीत यश, मनसोक्त जगण्याचा काळ; नोकरीत प्रगती, इच्छापूर्ती!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 09:33 IST2025-11-16T09:08:28+5:302025-11-16T09:33:55+5:30
Weekly Horoscope: १६ नोव्हेंबर २०२५ ते २२ नोव्हेंबर २०२५ तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य…

Weekly Horoscope: सप्ताहाच्या सुरुवातीलाच रविवारी रवी तूळ राशीतून वृश्चिक राशीत जाईल. अन्य कुठलाही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी - हर्षल वृषभ राशीत, गुरू कर्क राशीत, केतु सिंह राशीत, शुक्र तूळ राशीत आहेत. रवी, मंगळ आणि बुध वृश्चिक राशीत आहे. प्लूटो मकर राशीत, तर राहु कुंभ राशीत आहेत. शनि आणि नेपच्यून मीन राशीत आहे.

चंद्राचे भ्रमण कन्या, तूळ, वृश्चिक आणि धनू या राशींमधून राहील. या सप्ताहात सोमवारी प्रदोष, बुधवारी दर्श अमावास्या आहे. शुक्रवारी देवदीपावली, खंडोबाचा षड्रात्रोत्सव सुरू होत आहे.

सूर्याच्या वृश्चिक राशीतील गोचरामुळे पुढील महिनाभराचा काळ वृश्चिक संक्रांत म्हणून ओळखला जाणार आहे. गुरू वक्री झालेला आहे. एकंदरीत ग्रहमान पाहता तुमच्यासाठी हा कालावधी कसा असेल, ते जाणून घेऊया...

मेष: हा आठवडा ठीक आहे. हा आठवडा प्रेमीजनांच्या जीवनात आनंद घेऊन येणारा आहे. ह्या आठवड्यात आर्थिक बाबीत सावध राहावे लागेल. खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल. अगदी आवश्यक असलेले खर्चच करावेत. बचतीकडे लक्ष केंद्रित करावे. व्यापाऱ्यांना कामावर लक्ष ठेवावे लागेल. व्यवसायात अनुकूल असतील असे बदल करू शकता. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ कामगिरीने खुश होतील. पगारवाढ संभवते. कामामुळे त्रासून जाण्याची आवश्यकता नाही. विद्यार्थ्यांना एकाग्रतेचा अभाव जाणवेल. त्यामुळे अध्ययनात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कोणत्याही स्पर्धेकडे दुर्लक्ष करू नये.

वृषभ: हा आठवडा मध्यम फलदायी आहे. ह्या आठवड्यात विवाहेच्छुकांचा विवाह ठरण्याची संभावना आहे. जीवनात नावीन्य येईल. ह्या आठवड्यात स्वतःसाठी महागडे कपडे, दागिने इत्यादींची खरेदी करू शकता. त्यासाठी बराचसा पैसा खर्च कराल. एखाद्या चांगल्या योजनेत आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी सल्ला मसलत जरूर करावी, जेणेकरून चांगला लाभ होऊ शकेल. ह्या आठवड्यात व्यापाऱ्यांना काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. योजना कार्यान्वित होण्यास विलंब होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना कामावर लक्ष देण्याची आवश्यकता आहे. दुर्लक्ष झाल्यास एखादी मोठी चूक होऊन त्याचा त्रास होईल. विद्यार्थी एखाद्या स्पर्धेची तयारी करू शकतात. अध्ययनाकडे लक्ष द्यावे लागेल. मित्रांपासून थोडे दूर राहिल्यास हितावह होईल.

मिथुन: हा आठवडा आनंद घेऊन येत आहे. ह्या आठवड्यात प्रेमीजनांना नात्यात सुखद अनुभव येईल. ह्या आठवड्यात दिखाऊपणा करण्यात बराचसा पैसा खर्च करण्याची संभावना आहे. परंतु त्यामुळे समस्या वाढतील. तेव्हा आर्थिक बाबीत सतर्क राहावे. एखाद्या प्रॉपर्टीत गुंतवणूक केल्यास चांगला लाभ होण्याची संभावना आहे. व्यापारात एखादे स्थगित झालेले काम सुरु होऊ शकते. एखाद्या नवीन प्रकल्पाची सुरवात कराल, जो चांगला असेल. कोणाला वचन दिले असेल तर ते ह्या आठवड्यात पूर्ण करावे. विद्यार्थ्यांना भरपूर मेहनत करावी लागेल. असे केल्यास त्यांना एखाद्या नोकरीच्या स्पर्धेत यशस्वी होता येईल. ज्ञान वाढविण्यावर भर देतील.

कर्क: हा आठवडा चांगला आहे. प्रेमीजन हा आठवडा आनंदात व्यतीत करू शकतील. ह्या आठवड्यात कोणतेही असे काम करू नये किंवा प्रेमिकेच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये की ज्यामुळे प्रेमिकेची नाराजी वाढेल. ह्या आठवड्यात आर्थिक स्थिती उत्तम असेल. आर्थिक बचतीच्या एखाद्या योजनेत सहभागी होण्याचा विचार कराल. शेअर बाजाराशी संबंधित व्यक्ती चांगला पैसा कमवू शकेल. असे असले तरी एखाद्या प्रॉपर्टीत दीर्घकाळासाठी आर्थिक गुंतवणूक करणे आपल्या हिताचे होईल.

सिंह: हा आठवडा काहीसा त्रासदायी आहे. ह्या आठवड्यात पैसा धार्मिक कार्यात खर्च करू शकता. प्राप्ती चांगली होईल. व्यापारात जास्त आर्थिक गुंतवणूक करू नका. बाजारातील आर्थिक चढ-उतारांमुळे पैसा बुडण्याची संभावना आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्ती मेहनतीने चांगली स्थिती प्राप्त करू शकतील. कारकीर्द खुलून उठेल. कामगिरीने वरिष्ठ खुश होतील. विद्यार्थी आपले मित्र, समाज माध्यम इत्यादीस जास्त वेळ देतील. तसेच हिंडणे-फिरणे, पार्टीत सहभागी होणे ह्यास प्राधान्य देतील, त्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल. वेळेचा सदुपयोग करावा लागेल.

कन्या: हा आठवडा सामान्यच आहे. प्रेमीजन सुखद क्षण व्यतीत करतील. ह्या आठवड्यात प्राप्तीचा विचार करून मगच खर्च करावा. सढळ हस्ते खर्च केल्यास पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. भविष्यासाठी गुंतवणूक करण्याचा विचार अवश्य करावा. व्यावसायिकांचा व्यवसाय चांगला चालेल. योजना फलद्रुप होतील. त्यांना काही नवीन लोकांचे सहकार्य मिळेल. इच्छेनुसार अनेक कामे होतील. नोकरी करणाऱ्यांना संघर्षास समोर जावे लागू शकते. कोणाचे ऐकून कोणतेही काम करू नये. हा आठवडा मेहनत करण्याचा आहे. एखादे काम स्थगित झाले असल्यास ते ह्या आठवड्यात पूर्ण होऊ शकेल. निष्काळजीपणामुळे टेन्शन वाढू शकते. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल.

तूळ: हा आठवडा चांगला आहे. व्यावसायिकांना एखादा मोठा प्रकल्प मिळू शकतो. सहकारी कामात सहकार्य करतील. ह्या आठवड्यात दिखाऊपणा करू नये. नोकरी करणाऱ्यांना अपेक्षित पदोन्नती मिळण्याची संभावना आहे. ह्या आठवड्यात विद्यार्थी जास्त मेहनत करतील. त्यांना त्याचे यथायोग्य फळ मिळेल. ते एखाद्या नवीन अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात. एखादा प्रकल्प जर अपूर्ण राहिला असेल तर तो ते पूर्ण करू शकतील. उच्च शिक्षणास आठवडा अनुकूल आहे.

वृश्चिक: हा आठवडा काहीसा त्रासदायी आहे. विवाहितांचे जीवन सुखद होईल. ह्या आठवड्यात खर्चांवर लक्ष ठेवावे लागेल. ह्या आठवड्यात काही महागड्या वस्तू, कपडे ह्यांची खरेदी करण्याची संभावना आहे. प्राप्तीचे स्रोत वाढतील. हा आठवडा रिअल इस्टेटशी संबंधित लोकांसाठी चांगला आहे. व्यावसायिक काही नवीन गुंतवणूक करून एखाद्या चांगल्या योजनेचा प्रारंभ करतील, जी त्यांच्यासाठी लाभदायी ठरेल. परदेशात व्यवसायाचा विस्तार करण्याचा प्रयत्न कराल. व्यवसायाची वृद्धी होईल. कारकिर्दीत उसळी आलेली दिसेल. नोकरीच्या ठिकाणी सतर्क राहावे लागेल. सहकारी त्रास देण्याचा प्रयत्न करतील. विद्यार्थी मित्रांच्या सहवासात मौज-मस्ती करण्यात गर्क राहतील. एकमेकांचा सहवास त्यांना खूप आवडेल. आत्मविश्वास टिकवून ठेवल्यास ते स्पर्धेत यशस्वी होऊ शकतील.

धनु: हा आठवडा काही गोंधळ घेऊन येत आहे. ह्या आठवड्यात खर्चांबरोबर प्राप्तीकडे लक्ष द्यावे लागेल. एखाद्या योजनेत दीर्घ काळासाठी आर्थिक गुंतवणूक केली तर ती हितावह होईल. कुटुंबीय पूर्ण सहकार्य करतील. ह्या आठवड्यात व्यवसायात काही चढ-उतार होत असल्याचे दिसून आले तरी चांगला लाभ मिळविण्यात यशस्वी व्हाल. बुद्धिचातुर्याच्या जोरावर अवघड समस्येतून सहजपणे बाहेर पडू शकाल. नोकरी करणाऱ्यांना चांगली उसळी बघावयास मिळेल. पदोन्नती झाल्यामुळे ते खुश होतील. त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावे लागू शकते. विद्यार्थ्यांनी अनुकूलतेचा लाभ घ्यावयास हवा. ते एखादा नवीन अभ्यासक्रम सुरू करू शकतात. हा आठवडा उच्च शिक्षणास चांगला आहे. कोणाच्या सांगण्या वरून आपले विषय बदलू नये.

मकर: हा आठवडा समस्याग्रस्त आहे. ह्या आठवड्यात आर्थिक स्थिती काहीशी नाजूक राहील. अचानकपणे काही खर्च करावे लागू शकतात, ज्यामुळे आर्थिक समस्या निर्माण होऊ शकते. अशा वेळी समंजसपणा दाखवावा. ह्या आठवड्यात व्यापाऱ्यांनी कोणतीही जोखीम घेऊ नये, अन्यथा समस्या निर्माण होऊ शकते. ह्या आठवड्यात काही प्रवास करू शकता, जे हिताचे असतील. नोकरीत पदोन्नती झाल्याने खुश व्हाल. ह्या आठवड्यात निव्वळ कामाचे कौतुक करत राहाल. विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील. एखादा विषय शिकण्यात त्यांना काही समस्या असू शकतात. ह्या आठवड्यात अनुकूलतेचा लाभ घेण्याचा पूर्ण प्रयत्न करावा. ज्ञान वाढविल्याने चांगला लाभ होईल.

कुंभ: हा आठवडा सामान्य फलदायी आहे. विवाहितांना जोडीदारावर विश्वास ठेवावा लागेल. ह्या आठवड्यात शेअर्स बाजारात गुंतवणूक केल्यास ती हिताची होईल. खर्च वाढवून समस्यांना निमंत्रित कराल. काही नवीन गुंतवणूक कराल जी भविष्यात लाभदायी ठरेल. विद्यार्थ्यांनी इतरत्र वेळ घालविल्याने ह्या आठवड्यात एखाद्या स्पर्धेत त्यांच्या पदरी निराशा येईल. ह्या आठवड्यात त्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. अभ्यासात जर काही समस्या असली तर गुरुजनांचा सल्ला घेऊ शकता.

मीन: हा आठवडा चांगला आहे. ह्या आठवड्यात वैवाहिक जीवन सुखद होईल. ह्या आठवड्यात काही खर्च करावेच लागतील. एखाद्या कायदेशीर बाबीसाठी भरपूर खर्च करावा लागेल. व्यापाऱ्यांना विचारपूर्वक वाटचाल करावी लागेल. घाईघाईत त्यांच्या हातून एखादी मोठी चूक होण्याची संभावना असून, मोठे नुकसान सोसावे लागेल. नोकरी करणाऱ्यांना सामंजस्याने कामे करावी लागतील. अन्यथा सहकारी त्रास देण्याचा प्रयत्न करतील. विद्यार्थ्यांना एखाद्या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळेल. इतर कामे सोडून अभ्यासास प्राधान्य द्यावे लागेल. असे केल्यासच ते परीक्षेत यशस्वी होऊ शकतील.

















