साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना शुभ, सर्वोत्तम संधी; संचित धनात वाढ, अपार कृपा अन् लाभच लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 13:02 IST2024-12-08T12:57:36+5:302024-12-08T13:02:59+5:30

Weekly Horoscope: ०८ डिसेंबर २०२४ ते १४ डिसेंबर २०२४ हा काळ तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य…

Weekly Horoscope: या सप्ताहात १३ रोजी हर्षल वक्री मेष राशीत जात आहे. अन्य कोणताही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी- गुरु आणि हर्षल वृषभ राशीत असून, शुक्रवारी हर्षल मेषेत जाईल. मंगळ कर्क राशीत, केतु कन्या राशीत, रवी आणि बुध वृश्चिक राशीत, प्लूटो आणि शुक्र मकर राशीत, शनी कुंभ राशीत आहे राहु आणि नेपच्यून मीन राशीत आहे.

चंद्राचे भ्रमण कुंभ, मीन, मेष आणि वृषभ राशीतून राहील, रविवारी भानुसप्तमी, बुधवारी मोक्षदा एकादशी, गीता जयंती आहे, शुक्रवारी प्रदोष आहे. शनिवारी दत्त जयंती आहे. रविवार, सोमवार, मंगळवार हे तीन दिवस पूर्ण काळ पंचक आहे, तर बुधवारी दुपारी ११:४८ पर्यंत पंचक राहील.

मोक्षदा एकादशी, गीता जयंती, प्रदोष यांमुळे हरिहराची विशेष पूजन करण्याची आणि शुभाशिर्वाद प्राप्त करण्याची संधी निर्माण होऊ शकेल. तसेच दत्त जयंती असल्याने श्रीदत्तगुरुंची अपार कृपा लाभू शकेल. कोणत्या राशींना हा आठवडा शुभ लाभाचा, सर्वोत्तम वरदान काळ ठरू शकेल? जाणून घेऊया...

मेष: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. नियोजित कामे वेळेत पूर्ण झाल्याने यशस्वी झालो असे वाटेल. कारकिर्दीत व व्यवसायात अपेक्षित यश प्राप्त होण्याची संधी दिसेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ व कनिष्ठ ह्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आर्थिक बाबतीत सतर्क राहावे लागेल. व्यावसायिकांना कोणत्याही योजनेत किंवा व्यवसायात आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करावी लागेल. कठीण प्रसंगात कुटुंबियांसह उत्तम प्रकारे मिळून मिसळून राहाल. समस्यांना समजून घेण्यासाठी वैवाहिक जोडीदार पाठीशी खंबीरपणे उभा राहील.

वृषभ: हा आठवडा अत्यंत शुभ होऊ शकतो. जीवनात सुखाच्या व समृद्धीच्या संधी मिळतील. ऊर्जित होऊन प्रगती पथावर मार्गस्थ व्हाल. घरात मंगल कार्य सुरु झाल्याने कुटुंबियांचे व स्वजनांचे सहकार्य मिळेल, ज्यामुळे जीवन अधिक सुखद होऊ शकेल. स्वप्ने साकार करण्यासाठी पैसे खर्च करण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवनात सुखद क्षण घालविण्याची संधी मिळेल. उत्तरार्धात कठोर मेहनतीने दुसऱ्यांसमोर चांगली कामगिरी करून त्यांना प्रभावित कराल, जी आपली कारकीर्द अधिक उंचीवर घेऊन जाऊ शकेल. कामाची प्रशंसा करण्यासाठी संधी असेल. शुभ ग्रहांशी उत्तम योग साधला गेल्याने अनेक चांगले लाभ मिळू शकतात. आठवडा लक्षपूर्वक घालवून जीवन अधिक सुखद बनविण्याचा प्रयत्न करावा.

मिथुन: हा आठवडा शुभ फलदायी होण्याची संभावना आहे. जीवनाशी संबंधित प्रत्येक समस्येचे निराकरण करण्यात यशस्वी व्हाल. कारकिर्दीशी, व्यवसायाशी व जीवनाशी संबंधित एखादी मोठी मनोकामना पूर्ण होण्याची संभावना आहे. कुटुंबियांचे व इतरांचे पूर्ण सहकार्य मिळेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना एखादी मोठी संधी मिळण्याची संभावना आहे. समाजात प्रतिष्ठा उंचावेल. एखादी भेटवस्तू मिळण्याची संभावना आहे. दांपत्य जीवन सुखद होईल. सामंजस्य व प्रेम भावनेचे मिलन संबंध दृढ करेल. मुलांशी संबंधित एखादी चांगली बातमी ऐकिवात येण्याची संभावना असून त्यामुळे प्रतिष्ठा उंचावेल. ज्या योजना अनेक दिवसांपासून स्थगित झाल्या होत्या त्या मित्रांच्या मदतीने अचानकपणे सुरु होऊ शकतात. ह्या आठवड्याचा उपयोग आनंदित व समृद्ध करण्याचा प्रयत्न करावा.

कर्क: हा आठवडा यशस्वी होण्यासाठी कठोर मेहनत व वेळेचे योग्य नियोजन करण्याचा आहे. हा आठवडा आळस झटकून ध्येयाकडे मार्गस्थ होण्यासाठी प्रेरित करेल. कुटुंबात सकारात्मक बदल झाल्याचे दिसून येईल. वैवाहिक जोवनात सुखद क्षण घालविण्याची संधी मिळेल. ऋतुजन्य विकारांची शक्यता असल्याने प्रकृतीची काळजी घ्यावी. एखादा मित्र, हितचिंतक मदतीने एखाद्या मोठ्या समस्येचे निराकरण करण्यात यशस्वी व्हाल. हा आठवडा यशदायी व प्रगती कारक होऊ शकतो. परंतु, संबंधांवर लक्ष देण्याची व प्रकृतीस प्राधान्य देण्याची गरज भासेल. सर्वांसह सुखद व आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते.

सिंह: हा आठवडा शुभ फलदायी आहे. कारकिर्दीच्या किंवा व्यवसायाच्या क्षेत्रात केलेले प्रवास सुखद, यशस्वी व लाभदायी होतील. स्नेहीजनांशी झालेले गैरसमज दूर होतील. प्रेमिकेशी संबंध दृढ करण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवनात सुख-शांती नांदेल. कुटुंबाशी संबंधित एखादी मोठी जवाबदारी पडण्याची संभावना असल्याने योजनांवर लक्ष द्यावे. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. नियमित व्यायाम करणे व पुरेशी झोप घेणे हे प्रकृतीसाठी फायदेशीर होऊ शकते. कुटुंबातील वरिष्ठांचे आशीर्वाद पाठीशी राहतील. युवकांना मौज-मजा करण्याची संधी मिळेल. उत्तरार्धात थोड्या दगदगीमुळे थकवा येऊ शकतो. प्रयत्नांसह सकारात्मक ऊर्जेचा सामना करावा लागेल, जो यशाकडे घेऊन जाईल.

कन्या: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. कार्यक्षेत्री विरोधकांपासून सावध राहावे लागेल. विरोधक वरिष्ठ व कनिष्ठांना विरोधात भडकवण्याचा किंवा आपले लक्ष कामापासून विचलित करण्याचा प्रयत्न करू शकतात. या आव्हानातून मार्ग काढण्यासाठी एखाद्या अनुभवी किंवा वयस्कर व्यक्तीची मदत घेण्याची गरज भासू शकते. विविध बाजूंवर लक्ष ठेवून कामे पूर्ण करण्यासाठी जीवनशैलीत संयम व समतोल साधावा लागेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासावरील लक्ष विचलित होण्याची शक्यता असल्याने त्यांनी विशेष काळजी घ्यावी. विद्यार्थी जीवनात आनंद व समाधान मिळविण्याचा प्रयत्न करावा. वैवाहिक जीवन सुखद होईल. प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. दैनंदिन जीवनशैलीत पौष्टिक आहार, योग्य व्यायाम व ध्यान-धारणांचा समावेश करण्याचा प्रयत्न करावा. व्यापाऱ्यांसाठी व्यवसायाशी संबंधित कुशल व्यक्तींसह आव्हानात्मक स्थितींचा सामना करावा लागेल.

तूळ: हा आठवडा व्यावसायिक जीवनासाठी विशेष महत्वपूर्ण ठरेल. कार्यक्षेत्री मोजून-मापून बोलण्याची गरज भासू शकते, ज्यामुळे कामे यशस्वी होऊन व्यावसायिक उद्देशात पुढे जाऊ शकाल. प्रवासादरम्यान सामानाकडे व प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागणार असल्याने प्रवासाची योजना आखताना तयारीवर लक्ष ठेवावे. भावनांवर नियंत्रण ठेवावे. दांपत्य जीवन सुखद होईल. जोडीदार सहकार्य करेल. कार्यक्षेत्री एखाद्या प्रति जागरूक राहावे लागेल. प्रतिमा मलीन होऊ नये म्हणून कामे सावधपणे करून उद्दिष्ट गाठावे. सक्रियता व संवादाच्या दृष्टीने विशेष काळ महत्त्वाचा आहे. तेव्हा सामंजस्याने कामे करावी लागतील.

वृश्चिक: हा आठवडा सकारात्मक व उत्तेजनादायी आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी नवीन संभावित बदली किंवा पदोन्नतीची शक्यता आहे, जी त्यांच्या कारकिर्दीत प्रगती करू शकेल. आर्थिक बाजू मजबूत होऊ शकते. गुंतवणुकीच्या माध्यमातून फायदा होऊ शकतो. प्रियजनांच्या सहवासात वेळ घालविण्याची संधी मिळेल. त्यामुळे खुश होऊ शकाल. वैवाहिक जीवन सुखद होईल. मुलांशी संबंधित एखादी चिंता दूर झाल्याने दिलासा मिळेल. व्यवसायात प्रगती संभवते. उपक्रमाच्या व समृद्धीच्या मार्गात प्रगती करण्याची उत्तम संधी आहे. सार्वजनिक उपक्रमात यशस्वी होऊ शकता. वैयक्तिक संबंध दृढ करण्यावर लक्ष द्यावे लागेल. एकंदरीत हा आठवडा अनुकूल असणार आहे. अनेक सकारात्मक संधी प्रदान करू शकतो. उद्देशांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. तसेच कामात प्रतिबद्ध राहावे लागेल. असे केल्याने प्रगती पथावर जाऊ शकाल.

धनु: ह्या आठवड्यात प्रकृती व संबंधांवर विशेष लक्ष द्यावे लागेल. आहारातील बेफिकिरी किंवा जुने विकार उफाळून आल्याने शारीरिक त्रास होण्याची शक्यता असल्याने प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी नियमित व्यायाम करण्यावर व पौष्टिक आहार घेण्यावर लक्ष द्यावे. व्यस्त राहाल. परीक्षा - स्पर्धेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या परिश्रमाचे यथोचित फळ मिळेल. विद्यार्थ्यांना अध्ययनावर लक्ष केंद्रित करावे लागेल, तसेच ध्येयाप्रती समर्पित व्हावे लागेल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. वैवाहिक जीवन सुखद होईल. मान-सन्मानात वाढ होईल. आनंदित व्हाल. एखादी चांगली बातमी ऐकिवात येण्याची संभावना आहे. गृहिणींचा जास्तीत जास्त वेळ धार्मिक कार्यात व्यतीत होईल. कामे पूर्ण करण्यासाठी वेळेचे व ऊर्जेचे नियमन करावे लागेल. सकारात्मक व धैर्यशील राहा.

मकर: हा आठवडा यश व सन्मान घेऊन येत आहे. परिश्रम व प्रयत्न ह्यांचे फळ मिळत आहे. कार्यक्षेत्री सन्मानित केले जाऊ शकता. वरिष्ठ व कनिष्ठ प्रशंसा करतील व त्यांचे समर्थन मिळेल. संचित धनात वाढ होईल. प्रेम संबंध प्रगल्भ होतील. वैवाहिक जीवन सुखद होईल. वैवाहिक जोडीदारासह एखादा प्रवास करू शकाल. विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे. परीक्षेची - स्पर्धेची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना आनंददायी बातमी मिळेल. प्रियजनांना भेटू शकाल. त्यांच्या सहकार्याने कामे तेज गतीने पूर्ण होतील. संबंध सुखद होण्यासाठी वेळ व लक्ष द्यावे लागेल. निरोगी राहण्यासाठी आहारावर लक्ष ठेवावे. नियमित व्यायाम करावा. आनंद घेण्यासाठी कामात उत्साहित होऊन काम करावे लागेल.

कुंभ: आठवड्याची सुरुवात आव्हानाने होऊ शकते. परंतु, बुद्धी, विवेक व साहस आव्हानातून बाहेर पडण्यास मदतरूप होतील. मित्रांचे व स्वजनांचे सहकार्य समर्थन देईल. असे असले तरी कार्यक्षेत्री गुप्त शत्रूंपासून सावध राहावे लागेल व त्यामुळे निर्णय घेताना हितचिंतकांचा सल्ला घेणे महत्वाचे ठरेल. हा आठवडा व्यावसायिकांसाठी अत्यंत अनुकूल असून व्यवसायात ते अपेक्षित लाभ प्राप्त करू शकतील. व्यावसायिक क्षेत्रात बदल करण्याची योजना आखण्यास हा आठवडा अनुकूल आहे. उत्तम ऑफर मिळू शकते. वैवाहिक जीवन सुखद होईल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. अनेक दिवसांपासून आपल्या कार्यक्षेत्रात बदल करण्याचा विचार करत असाल तर ह्या आठवड्यात तसे करण्याची उत्तम संधी मिळू शकते. कामात निरंतर मेहनत करत असाल तर विशेष स्वरूपात यश प्राप्त करू शकता.

मीन: हा आठवडा अत्यंत शुभ फलदायी आहे. यश व आनंदाचे साम्राज्य असू शकते. व्यावसायिक बाबीत अनुकूलता असल्याचे दिसत आहे. त्यात संतोषजनक वृद्धी होऊ शकते. त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. मुलांशी संबंधित एखादी उपलब्धी मान-सन्मानास कारणीभूत होऊ शकते. कौटुंबिक वातावरणात आनंद पसरेल. वैवाहिक जीवन सुखद होईल. कौटुंबिक संबंध दृढ होतील. मन धार्मिक व सामाजिक कार्यात गुंतलेले राहील. एकांतात बसून शांततेत वेळ घालविण्याची इच्छा होईल. मानसिक शांती व सामर्थ्य वृद्धिंगत होऊ शकेल. मन धर्म, अध्यात्म व सामाजिक कार्यासाठी प्रवृत्त होईल. त्यामुळे जीवनाचे अजून सार्थक करू शकाल.