1 / 15Weekly Horoscope: या सप्ताहात कुठलाही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी शुक्र आणि हर्षल वृषभ राशीत, रवि आणि गुरू मिथुन राशीत, बुध कर्क राशीत, मंगळ आणि केतु सिंह राशीत, प्लूटो मकर राशीत, राहु कुंभ राशीत, तर शनि आणि नेपच्यून मीन राशीत आहेत. 2 / 15चंद्राचे भ्रमण तूळ, वृश्चिक, धनू आणि मकर राशींमधून राहील. या सप्ताहात रविवारी आषाढी एकादशी (मोठी एकादशी) आहे. सोमवारी वामन पूजन, मंगळवारी प्रदोष, तर गुरुवारी गुरुपौर्णिमा आहे.3 / 15चातुर्मास सुरू झाला असून, ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनेही अनेक शुभ योग जुळून येत आहेत. या शुभ योगांचा कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल? आगामी आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमची रास कोणती? जाणून घ्या, तुमचे साप्ताहिक राशीभविष्य...4 / 15मेष: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. कुटुंबियांसाठी थोडा वेळ काढून जबाबदाऱ्या समजून घ्या. ह्या आठवड्यात विविध ठिकाणी आर्थिक गुंतवणूक करण्याची योजना आखाल, ज्या फलद्रुप होऊ शकतील. घराच्या नूतनीकरणासाठी भरपूर पैसा खर्च करू शकता. व्यवसायात चांगला आर्थिक फायदा झाल्याने प्रसन्न व्हाल. एखाद्या सहकार्याच्या मदतीने व्यवसाय वृद्धी करू शकाल. नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठांच्या एखाद्या चुकीवर वाद घालत बसू नये. अन्यथा नाते बिघडू शकते. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात काही समस्या निर्माण होतील. उच्च शिक्षणासाठी आठवडा उत्तम आहे. एखाद्या अभ्यासक्रमाची तयारी करण्याची संधी मिळू शकते. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. वेळेवर औषधोपचार घ्यावेत.5 / 15वृषभ: हा आठवडा चांगले परिणाम देणारा आहे. ह्या आठवड्यात सहकारी जे काही सांगतील ते करावे लागेल. वैवाहिक जीवन सुखद होईल. प्राप्तीत वाढ झाल्याने खुश व्हाल. एखाद्या गरजवंतास मदत करू शकता. नोकरी करणाऱ्यांची पदोन्नती सहजपणे होईल. वरिष्ठ त्यांच्यावर प्रसन्न होतील. व्यापाऱ्यांना त्यांची मेहनतच चांगला लाभ मिळवून देईल. एखादा सौदा जर स्थगित झाला असेल तर तो ह्या आठवड्यात पूर्णत्वास जाण्याची संभावना आहे. विद्यार्थ्यांना एखाद्या नवीन अभ्यासक्रमात प्रवेश मिळण्याच्या शक्यतेने ते प्रसन्न होतील. मित्र अभ्यासात गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याची संभावना असल्याने त्यांच्या पासून काही दिवस दूर राहणे हितावह होईल. एखाद्या नवीन संशोधनाचा लाभ होईल. ह्या आठवड्यात आपणास योगासन, व्यायाम इत्यादींवर लक्ष द्यावे लागेल. दिनचर्या सुधारण्याचा प्रयत्न करावा लागेल.6 / 15मिथुन: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. अहंकारामुळे प्रेमीजनांच्या नात्यात समस्या निर्माण होतील. प्रेमिकेवर विश्वास ठेवावा लागेल. विवाहित व्यक्तीनी जोडीदाराची विचारपूस करून त्यांच्या गरजांवर लक्ष द्यावे. आवश्यक तितका खर्च करणे हितावह होईल. इतरांना प्रभावित करण्यासाठी खर्च केल्यास आर्थिक स्थिती नाजूक होईल. पैशांची चणचण जाणवू शकते. व्यापाऱ्यांना ह्या आठवड्यात खुशखबर ऐकण्यास मिळेल. योजना गती घेतील. आर्थिक समस्येतून त्यांना दिलासा मिळेल. नोकरी करणाऱ्यांनी सध्याची नोकरी सोडू नये. ह्या आठवड्यात मनाचा गोंधळ उडाल्याने आपण त्रस्त व्हाल. विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित झाल्याने परीक्षेत त्यांचे नुकसान होण्याची संभावना आहे. अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. 7 / 15कर्क: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. ह्या आठवड्यात वैवाहिक जीवनातील काही जुन्या गोष्टी उफाळून आल्याने समस्या वाढून नात्यात कटुता येऊ शकते. अडकलेला पैसा ह्या आठवड्यात मिळाल्याने चांगला लाभ होईल. प्रॉपर्टीत गुंतवणूक करून चांगला पैसा कमावू शकाल. भविष्यासाठी काही आर्थिक गुंतवणूक कराल. ह्या आठवड्यात व्यापाऱ्यांना चांगला आर्थिक फायदा झाल्याने ते योजनांना एक उंची देऊन व्यवसाय वृद्धी करतील. नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठांना विरोध करू नये. त्यामुळे त्यांची नोकरी चालूच राहील. पदोन्नती संभवते. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांना अभ्यासाची विशेष काळजी करावी लागणार नाही. त्यांना त्यांच्या मेहनतीचे यथायोग्य फळ मिळेल. थोड्या विश्रांतीची गरज आहे. प्रकृतीस प्राधान्य द्यावे. जास्त विचार करू नये.8 / 15सिंह: हा आठवडा आनंददायी ठरू शकेल. प्रेमीजनांच्या जीवनात लहान-सहान गोष्टींवरून वाद झाल्याने नात्यात दुरावा येण्याची संभावना आहे. वाद वाढणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी. विवाहितांना कुटुंबियांचे पूर्ण सहकार्य मिळेल. ह्या आठवड्यात आर्थिक गोष्टीत सावध राहावे लागेल. घाई गडबडीत एखाद्या समस्येस आमंत्रण द्याल. काळजी घ्यावी. आर्थिक नियोजन करूनच वाटचाल करावी लागेल. ह्या आठवड्यात कोणालाही उसने पैसे देऊ नका. व्यापारी योजनांवर लक्ष ठेवतील. त्यामुळे त्यांना एखाद्या मोठ्या सौद्यावर शिक्कामोर्तब करण्याची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्यांनी कोणालाही मनातील योजना सांगू नये. अन्यथा ती व्यक्ती त्याचा गैरफायदा घेऊ शकेल. एखाद्या गोष्टीने वाद होण्याची संभावना आहे. आहारावर लक्ष ठेवावे लागेल. प्राणायाम इत्यादीसाठी थोडा वेळ द्यावा लागेल.9 / 15कन्या: हा आठवडा सामान्य फलदायी आहे. ह्या आठवड्यात विवाहितांना नाते टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. एखाद्या गैरसमजामुळे नात्यात समस्या निर्माण होऊ शकते. प्राप्तीत वाढ झाल्याने आनंदी व्हाल. मुलांच्या कारकिर्दीसाठी काही पैशांचा संचय सहजपणे करू शकाल. योजना अपेक्षित लाभ देतील. ह्या आठवड्यात थकबाकी मिळू शकते. आर्थिक चिंता संपुष्टात येतील. ह्या आठवड्यात व्यापाऱ्यांनी घाई करू नये. काही गैरसमजामुळे त्यांची निर्णय क्षमता चुकीची होऊ शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्ती काहीसे त्रस्त राहतील. मन कामात रमणार नाही. नोकरीतील बदल नुकसान करण्याची संभावना आहे. त्यासाठी कुटुंबियांचा सल्ला घेऊन बदल करण्याचा विचार केल्यास तो हितावह होईल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी काहीसा प्रतिकूल आहे. अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. ते जर एखाद्या विषयाने त्रस्त झाले असतील तर ह्या आठवड्यात ते विषय बदलू शकतात. ह्या आठवड्यात वाहन चालवताना काळजी घ्यावी लागेल. 10 / 15तूळ: हा आठवडा सकारात्मक परिणाम घेऊन येईल. पैसा असल्याने गरजा पूर्ण करू शकाल. एखाद्या प्रॉपर्टीत दीर्घ काळासाठी गुंतवणूक केल्यास ती भविष्यात चांगला लाभ मिळवून देईल. व्यापाऱ्यांना काही नवीन ओळखीचा व्यवसायात पूर्ण लाभ होऊ शकेल. एखादी मोठी ऑर्डर मिळण्याची संभावना आहे. त्यांचा व्यवसाय विदेशात पसरू शकेल. नोकरी करणाऱ्यांना जास्त मेहनत करावी लागेल. कनिष्ठांची मदत घ्यावी लागू शकते. ह्या आठवड्यात कामाच्या बाबतीत सतर्क राहावे लागेल. इतरांकडे लक्ष कमी करून कारकीर्दीस महत्व द्यावे. ह्या आठवड्यात एखाद्या नोकरीसाठी अर्ज करू शकता. उच्च शिक्षणाचे मार्ग प्रशस्त होतील. ह्या आठवड्यात आळसामुळे समस्या होऊ शकते. तंदुरुस्त राहण्यासाठी आरोग्यास प्राधान्य द्यावे लागेल. कामाबरोबरच आहाराने दिनचर्या चांगली करण्याचा प्रयत्न करावा.11 / 15वृश्चिक: हा आठवडा चांगला आहे. ह्या आठवड्यात प्रेमीजनांना एखादी चांगली बातमी मिळू शकते. एखाद्या नवीन नोकरीची प्राप्ती होऊ शकते. हा आठवडा आर्थिक दृष्ट्या उत्तम आहे. सासरच्यांकडून धनलाभ होण्याची संभावना आहे. पूर्वी एखाद्या प्रॉपर्टीत गुंतवणूक केली होती त्यातून दुप्पट लाभ होऊ शकतो. ह्या आठवड्यात एखादी पैतृक संपत्ती मिळण्याची संभावना आहे. व्यापाऱ्यांना काही नवीन लोकांवर विश्वास ठेवल्याचा फायदा होईल. त्यांचा सल्ला उपयुक्त ठरेल. नोकरी करणाऱ्यांना काहीसे सावध राहावे लागेल. कोणाशी विशेष चर्चा करू नये. विद्यार्थ्यांनी समाज माध्यम व मित्रांपासून थोडे दूर राहावे. अन्यथा त्यांची एकाग्रता भंग होऊन अभ्यासावर त्यांचे लक्ष केंद्रित होऊ शकणार नाही. मग पश्चाताप होऊ शकतो. एखाद्या शासकीय नोकरीच्या परीक्षेची तयारी करू शकता, मात्र त्यासाठी मेहनत वाढवावी लागेल. ह्या आठवड्यात प्रकृतीत चढ-उतार झाल्याने त्रस्त व्हाल. 12 / 15धनु: हा आठवडा प्रगती करणारा आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. कुटुंबीयांची साथ मिळेल. ह्या आठवड्यात काही अनावश्यक खर्च करावे लागल्याने त्रस्त व्हाल. काही आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागेल. मात्र त्याने घाबरून जाऊ नये. कामांसाठी विचारपूर्वक खर्च केल्यास आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यापाऱ्यांनी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेतल्यास त्यांना व्यापारात चांगला लाभ होऊ शकेल. नोकरी करणाऱ्यांना जर नोकरीत बदल करावयाचा असेल तर त्यासाठी आठवडा अनुकूल आहे. दुसऱ्या नोकरीसाठी प्रयत्न करू शकता. मात्र तेथे इतरांशी चांगले संबंध ठेवावे लागतील. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासावर केंद्रित होऊ शकणार नाही. ह्या आठवड्यात वेळेचा सदुपयोग करावा लागेल. प्रकृती नाजूक राहिल्याने काहीसे त्रासून जाल. आहारावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा.13 / 15मकर: हा आठवडा चांगले परिणाम घेऊन येणारा आहे. हा आठवडा विवाहितांसाठी आनंददायी असू शकेल. प्रेमीजनांच्या जीवनात समस्या असल्याने ह्या आठवड्यात गोंधळ उडेल. आर्थिक दृष्ट्या हा आठवडा सामान्य फलदायी राहील. ह्या आठवड्यात वायफळ खर्च झाल्याने आर्थिक समस्या वाढेल. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्यावा. वाहनावर खर्च करावा लागू शकतो. नोकरीच्या ठिकाणी त्रासलेल्या लोकांना एखादी आनंददायी बातमी मिळेल. पूर्वीच्या कार्यालयाकडून पुन्हा बोलावण्यात येऊ शकते. वरिष्ठांशी संबंध बिघडलेले असतील तर त्यात सुधारणा होऊ शकते. एखादी पार्टटाइम नोकरी करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी दिवस अनुकूल आहेत. व्यापारात अतिरिक्त गुंतवणूक विचार न करता केल्यास नुकसान सोसावे लागू शकते. ह्या आठवड्यात विद्यार्थी विषय बदलण्याचा प्रयत्न करतील. उच्च शिक्षणास आठवडा अनुकूल आहे. ह्या आठवड्यात प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. 14 / 15कुंभ: ह्या आठवड्यात इतरांशी तोलून-मापून बोलावे लागेल. वैवाहिक जीवनातील समस्या वाढतील. कुटुंबीयात समन्वय नसल्याचा परिणाम नात्यावर होईल. नोकरीच्या बाबतीत एखाद्या मित्राकडून आनंदाची बातमी ऐकण्यास मिळू शकते. कामे वेळेवर पूर्ण करून वरिष्ठांना खुश कराल. ते पदोन्नतीचा विचार करू शकतात. ह्या आठवड्यात विद्यार्थी ज्ञान वाढविण्याचा प्रयत्न करतील. त्यांना अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करावे लागेल. एखाद्या संशोधनाकडे त्यांचे लक्ष जाईल. ह्या आठवड्यात कोणतेही काम घाईघाईत करू नये. अन्यथा कामात गडबड होऊ शकते.15 / 15मीन: हा आठवडा मध्यम फलदायी आहे. विवाहितांना त्यांच्या नात्यातील समस्या दूर करण्यासाठी वेळ काढून जोडीदाराशी चर्चा करावी लागेल. त्यात कुटुंबीय मदत करतील. ह्या आठवड्यात कामाने त्रासून जाल. मनमानी करण्याचा स्वभाव आर्थिक समस्येत वाढ करेल. घराकडे लक्ष द्यावे लागेल. ह्या आठवड्यात कोणालाही उसने पैसे देऊ नये. ह्या आठवड्यात व्यापाऱ्यांना त्यांच्या योजनांवर लक्ष द्यावे लागेल. अन्यथा व्यवसायात नुकसान होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांनी काम चोख करावे. अन्यथा त्यांच्या समस्या वाढतील. तसेच वरिष्ठ त्यांच्यावर नाराज होतील. नोकरीत बदल करणे हितावह होईल. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांनी एखाद्या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना तो सहजपणे मिळून जाईल. त्यांचे शिक्षण पूर्वीपेक्षा उत्तम होईल. त्यांना ज्ञान वाढविण्याची संधी मिळेल. वाहन सावकाश चालवावे. ह्या आठवड्यात आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.