२०२५चे पहिले नवरात्र: ९ राशींवर शाकंभरी कृपा, उधारी मिळू शकेल; समस्या सुटेल, चांगलेच होईल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 08:51 IST2025-01-06T08:35:52+5:302025-01-06T08:51:32+5:30
Weekly Horoscope: तुमच्यासाठी कसा असेल कालावधी? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य…

Weekly Horoscope: या कालावधीत कुठलाही ग्रहपालट नाही. ग्रहास्थिती अशी की, हर्षल मेष राशीत, गुरु वृषभ राशीत, मंगळ कर्क राशीत, केतु कन्या राशीत, रवी आणि बुध धनु राशीत, प्लूटो मकर राशीत, शुक्र आणि शनि कुंभ राशीत तर राहु आणि नेपच्यून मीन राशीत आहे.
चंद्राचे भ्रमण कुंभ, मीन, मेष, वृषभ आणि मिथुन राशीतून राहील. मंगळवारी पौष मासातील दुर्गाष्टमी असून, शाकंभरीदेवी नवरात्रोत्सवारंभ होत आहे. शुक्रवारी पुत्रदा एकादशी आहे. शनिवारी प्रदोष आहे. रविवार व सोमवार हे दोन दिवस पूर्ण काळ पंचक आहे. तर मंगळवारी सायंकाळी ५:५० पर्यंत पंचक आहे. पौष शुक्ल अष्टमी ते पौर्णिमा शाकंभरी देवीचा नवरात्रोत्सव साजरा केला जातो. सन २०२५मध्ये ७ ते १३ जानेवारी शाकंभरी नवरात्रीचा उत्सव आहे.
एकूणच ग्रहस्थिती पाहता कोणत्या राशींना आगामी कालावधी चांगला जाऊ शकतो, समस्येतून दिलासा आणि अडचणीतून मार्ग मिळू शकतो, कुटुंब, शिक्षण, व्यवसाय, नोकरी, व्यापार, प्रेमसंबंध, आर्थिक आघाडीवर हा काळ कसा ठरू शकतो, ते जाणून घेऊया...
मेष: वैवाहिक जीवनात थोडा तणाव असू शकतो. परंतु परिपक्वतेमुळे निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण सहजपणे करू शकाल. वायफळ खर्च होण्याची शक्यता असल्याने त्यावर आपण नियंत्रण ठेवावे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना जर नोकरीत बदल करावयाची इच्छा असेल तर त्यांनी तो बदल करू नये. विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करावा, अन्यथा परिणाम त्यांच्या अपेक्षेनुसार येणार नाही. कोणत्याही प्रकारचा मानसिक ताण घेऊ नये, अन्यथा प्रकृतीवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. थंड पदार्थ खाणे टाळावे, अन्यथा खोकला, सर्दी, ताप इत्यादींचा त्रास आपणास होऊ शकतो.
वृषभ: प्रेमीजनांसाठी खूपच चांगला काळ आहे. प्रेमिकेच्या सहवासात रोमँटिक क्षण घालवू शकाल. वैवाहिक जीवनातील परिस्थिती काहीशी प्रतिकूल असू शकते. आर्थिकदृष्ट्या मजबूत राहू शकाल. पूर्वी काही आर्थिक गुतंवणूक केली असेल तर त्याचा लाभ प्राप्त होऊ शकतो. व्यापाऱ्यांना थोडे सावध राहावे लागेल. व्यवसायात चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. नोकरी करणाऱ्यांना कामानिमित्त प्रवास करावे लागू शकतात. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी मेहनत केली तर त्यांना यश प्राप्ती होऊ शकते. पोटाचे किंवा इतर विकारांचे त्रास होता असले तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.
मिथुन: वैवाहिक जोडीदार वेळ देऊ शकणार नसल्याने त्यांची व्यस्तता समजून घ्यावी. एखादे आर्थिक नुकसान होण्याची संभावना असल्याने सावध राहावे. नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत, त्या त्यात पुढे जाऊ शकतात. स्पर्धेची तयारी करत असाल तर श्रम वाढवावे लागतील. यश प्राप्ती होऊ शकते. एखादा जुना विकार उफाळून येण्याची संभावना आहे. एखाद्या चांगल्या डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावा, म्हणजे बरे वाटू शकेल.
कर्क: हा काळ चांगला आहे. ज्या व्यक्तीस पसंत करत होता अशी एखादी जुन्या मैत्रीतील व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे. विवाहित व्यक्ती त्यांच्या जीवनात काही वेगळे व नवीन करण्याचा प्रयत्न करतील. आर्थिक मदत हवी असेल तर मित्र पूर्ण सहकार्य करू शकतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी कार्यक्षेत्री राजकारण करण्यापासून दूर राहावे, अन्यथा नोकरीत त्याचा त्रास होऊ शकतो. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काळ अनुकूल आहे. त्यांनी फक्त अध्ययनात कोणतीही कसर करू नये, मग यश त्यांचेच आहे. आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल. विशेषतः सकाळचे चालणे, व्यायाम व योगासनांसाठी वेळ अवश्य काढावा.
सिंह: सकारात्मक काळ असू शकतो. एखाद्या तिसऱ्या व्यक्तीमुळे प्रेमिकेवर शंका घेऊ नका. वैवाहिक संबंधात माधुर्य येण्यासाठी रागावर नियंत्रण ठेवा. जमीन किंवा एखादी प्रॉपर्टी खरेदी करू शकता. काही प्रतिष्ठित व्यक्तींशी आपली भेट होऊ शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी नोकरीत बदल करू नये. जेथे आहात तेथेच राहावे. इथेच आपणास प्रगतीची संधी प्राप्त होऊ शकते. एखाद्या स्पर्धेची किंवा उच्च शिक्षणाची तयारी करत असाल तर पूर्ण मन लावून अभ्यास करावा.
कन्या: मिश्र फलदायी काळ आहे. ज्या व्यक्तीवर प्रेम करता त्या व्यक्तीशी काही गैरसमज झाल्याने दोघात तणाव निर्माण होऊ शकतो. प्रेमिकेशी मोकळेपणाने बोलणे हितावह होईल. प्राप्तीत वृद्धी होण्याची संभावना असली तरी खर्च वाढण्याची संभावना आहे. अशा एखाद्या अनुभवी व्यक्तीशी ओळख होईल की जी व्यापार वृद्धीत खूपच चांगली मदत करू शकेल. ऋतुजन्य विकारांच्या त्रासाने आपण त्रस्त होऊ शकता. तंदुरुस्ती टिकविण्यासाठी नियमितपणे योगासने करावीत.
तूळ: चांगला काळ आहे. प्रणयी जीवनात विचारपूर्वक बोलावे लागेल. असे केल्याने कटुता न येता, प्रेम वृद्धिंगत होईल. भरपूर पैसा कमवाल, परंतु खर्चात वाढ होणार आहे, याची जाणीव ठेवावी. अशा वेळी विचारपूर्वक पैसा खर्च करावा, नाही तर पैसा कोठे गेला हे समजणार नाही. नोकरीत बदल करायचा असेल तर योग्य वेळेची प्रतीक्षा करा. जेथे नोकरी करत आहात तेथेच सध्या नोकरीत राहावे. नोकरीत बदल करू नये. आहारावर विशेष लक्ष द्यावे.
वृश्चिक: अतिशय व्यस्त राहाल. त्यामुळे जोडीदारास योग्य तितका वेळ देऊ शकणार नाही. असे झाल्याने जोडीदारादरम्यान दुरावा निर्माण होऊ शकतो. थकबाकी मिळण्याची संभावना असून कालावधी आनंदात घालवू शकाल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कालावधी खूपच चांगला आहे. स्पर्धेची तयारी करत असणाऱ्यांना यश प्राप्ती संभवते.
धनु: प्रेमीजनांनी सावध राहावे. पैशांच्या बाबतीत काहीसे त्रस्त राहाल. भरपूर खर्च होण्याची शक्यता असल्याने त्यावर नियंत्रण ठेवावे. एखादी परदेशी संस्था एखादा मोठा व्यावसायिक करार करण्याची संभावना असून मोठे कंत्राट मिळू शकते. विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित झाल्यामुळे त्यांना अध्ययनात त्रास होऊ शकतो. असे असले तरी स्पर्धा परीक्षेत ते यशस्वी होऊ शकतात. प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी लागेल.
मकर: कालावधी अनुकूल आहे. पूर्वीची प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. धनलाभ होऊ शकतो. व्यापारी पूर्वीचा व्यवसाय जो खंडित झाला होता, तो पुन्हा सुरु करू शकतील. फायदा होऊ शकेल. विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासाऐवजी इतर बाबीत जास्त गुंतलेले असेल, व त्यामुळे ते एकाग्रतेने अभ्यास करू शकणार नाहीत. प्रकृती बिघडण्याची संभावना आहे.
कुंभ: प्रेमीजनांना अपेक्षित समाधान मिळणार नसल्याने एखाद्या गोष्टीने त्यांचे प्रेमिकेशी भांडण होण्याची संभावना आहे. वैवाहिक जीवनात समन्वय साधण्यासाठी सामंजस्य दाखवावे लागेल. एखाद्या प्रॉपर्टीत गुंतवणूक करावयाची असेल तर एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेणे उपयुक्त ठरेल. नोकरी करणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे. कार्यक्षेत्री उत्तम प्रगती करू शकाल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी एकाग्रतेने अभ्यास करावा लागेल. दिनचर्येत थोडा बदल करण्याचा प्रयत्न करावा.
मीन: प्रेमीजनांसाठी अनुकूल कालावधी आहे. प्रेमिकेच्या सहवासात अत्यंत खुश राहाल. उत्तम सामंजस्य असल्याने वैवाहिक जीवन अधिक दृढ होईल. व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायातून चांगला लाभ होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी काळ अत्यंत चांगला आहे. नोकरीत बदल करायचा असेल तर सकारात्मक फळ देणारा काळ आहे. एखादी सरकारी परीक्षा देणार असाल तर त्यासाठी हा कालावधी सकारात्मक परिणाम देणारा होऊ शकेल. आहारावर विशेष नियंत्रण ठेवावे लागेल.