साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 08:23 IST2026-04-05T08:12:20+5:302026-04-05T08:23:22+5:30

Weekly Horoscope: ०५ एप्रिल २०२६ ते ११ एप्रिल २०२६ तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य…

Weekly Horoscope: या सप्ताहात दि. १० रोजी बुध मीन राशीत प्रवेश करील. अन्य कुठलाही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी की, हर्षल वृषभ राशीत, गुरू मिथुन राशीत, केतु सिंह राशीत, तर प्लूटो मकर राशीत आहे. बुध आणि राहु कुंभ राशीत आहेत. शुक्रवारी बुध मीन राशीत जाईल. तेथे त्याची युती रवी, मंगळ, शनि आणि नेपच्यून यांच्याशी होईल.

चंद्राचे भ्रमण तूळ, वृश्चिक, धनू आणि मकर या राशींमधून राहील. या सप्ताहात रविवारी संकष्टी चतुर्थी, शुक्रवारी कालाष्टमी आहे. बुध ग्रहाने मीन राशीत प्रवेश केल्यानंतर अनेक शुभ योग, राजयोग जुळून येत आहेत.

आताच्या घडीला मीन राशीत सूर्य, शनि, मंगळ ग्रह विराजमान आहेत. बुध ग्रहाने प्रवेश केल्यानंतर या राशीत चतुर्ग्रही योग जुळून येईल. तसेच बुधादित्य, आदित्य मंगल असे राजयोग जुळून येतील. एकंदरीत ग्रहमान पाहता तुमच्यासाठी कसा असेल हा कालावधी? जाणून घ्या, तुमचे साप्ताहिक राशीभविष्य...

मेष: हा काळ सामान्य राहील. कोणावरही अतिराग करू नका. आर्थिक स्थिती चांगली असेल, मात्र धार्मिक कार्यांवर अधिक धन खर्च होऊ शकते. व्यवसायाबाबत काही तणावाचा सामना करावा लागू शकतो. नोकरी करणाऱ्या जातकांनी कामाच्या ठिकाणी अतिआत्मविश्वास टाळावा, अन्यथा अडचणी येऊ शकतात. प्रेमसंबंधांत काही गैरसमज असतील तर ते दूर होतील. वैवाहिक नात्यात तिसऱ्या व्यक्तीमुळे तणाव निर्माण होऊ शकतो. जे विद्यार्थी परदेशात जाऊन शिक्षण घेऊ इच्छितात, त्यांना यश मिळू शकते.

वृषभ: हा काळ ठीक राहील. कोणत्याही प्रकारचा मानसिक तणाव घेऊ नका. बँक बॅलन्समध्ये मोठी वाढ होऊ शकते. आर्थिक स्थिती उत्तम राहील. व्यावसायिकांना आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. विवाहित व्यक्तींना जोडीदारासोबत काही कारणास्तव तणाव जाणवेल. प्रेमसंबंधांसाठी हा आठवडा चांगला असून, लग्नाविषयी बोलणी करू शकता. विद्यार्थ्यांना शिक्षणात चांगले परिणाम मिळतील, मात्र स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना थोडी प्रतीक्षा करावी लागेल.

मिथुन: हा आठवडा मध्यम राहील. आवडीचे भोजन मिळेल, मात्र डाएटिंगवर लक्ष द्या. उत्पन्नात वाढ झाल्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत राहील. व्यापाऱ्यांना नवीन लोकांशी जोडले जाण्याची संधी मिळेल, ज्यामुळे व्यवसाय वृद्धिंगत होईल. नोकरीत वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मूड बघूनच संवाद साधावा. प्रेमसंबंधात ताळमेळ बसवणे आवश्यक आहे; एकमेकांवरील विश्वास कायम ठेवा. वैवाहिक जीवनासाठी वेळ चांगला असून जोडीदारासोबत सहलीला जाऊ शकता. विद्यार्थ्यांनी चुकीच्या संगतीपासून दूर राहावे.

कर्क: हा आठवडा मध्यम राहील. आर्थिक आघाडीवर, लग्नकार्यामुळे मोठा खर्च करावा लागू शकतो. व्यवसाय वाढवण्यासाठी व्यापाऱ्यांना कठोर परिश्रम करावे लागतील, तरच यश मिळेल. नोकरी करणाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी वादांपासून दूर राहावे. प्रेमसंबंध मधुर राहतील, जोडीदाराला आनंदी ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल. विद्यार्थ्यांनी संपूर्ण ऊर्जा अभ्यासात लावली तर त्यांना नक्कीच यश मिळेल.

सिंह: हा आठवडा चांगला राहील. आर्थिक स्थिती ठीक राहील; पैसा येईल तसा खर्चही होईल. व्यापाऱ्यांना सरकारी परवानग्या मिळवताना अडचणी येऊ शकतात. नोकरीत कष्टाचे फळ मिळेल. प्रेमसंबंधांत नवीन ऊर्जेचा संचार होईल. एखादा नवीन जोडीदार मिळू शकतो. वैवाहिक जीवनातील जुना तणाव दूर होईल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ थोडा कमकुवत असून त्यांचे लक्ष अभ्यासावरून विचलित होऊ शकते.

कन्या: हा काळ चांगला असला तरी आरोग्यासाठी मात्र चिंताजनक आहे. आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा शुभ असून गुप्त धन किंवा अचानक लाभ मिळू शकतो. व्यापाऱ्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होईल. नोकरीत कामाच्या पद्धतीत सुधारणा दिसेल. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन सुखद राहील; जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. विद्यार्थी अभ्यासाबाबत अत्यंत गंभीर आणि वचनबद्ध राहतील.

तूळ: आठवडा संमिश्र राहील. काही आर्थिक अडचणी जाणवू शकतात, मात्र उत्पन्न सामान्य राहील. व्यापाऱ्यांना काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला आहे. प्रेमसंबंधात संतुलन राखण्याचा प्रयत्न करा. कौटुंबिक किंवा गृहस्थ जीवनात काही अडचणी येऊ शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासात कुटुंब आणि मित्रांचे पूर्ण सहकार्य लाभेल.

वृश्चिक: हा आठवडा अत्यंत लाभदायक ठरेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील.मेहनतीचे योग्य फळ मिळेल. व्यापाऱ्यांना कामात थोडा अडथळा जाणवू शकतो, ज्यामुळे व्यवसाय मंदावल्यासारखे वाटेल. नोकरीत पदोन्नतीची दाट शक्यता आहे. प्रेमसंबंधांतील सर्व गैरसमज दूर होतील. वैवाहिक जीवनात इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहाल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल.

धनु: हा आठवडा संमिश्र राहील. व्यापाऱ्यांना व्यवसायात महिलांचे उत्तम सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती ठीक राहील, परंतु गुंतवणुकीपूर्वी बाजारपेठेचा अंदाज नक्की घ्या. नोकरीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. प्रेमसंबंधात समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे जोडीदाराच्या मनातील शंका दूर करण्याचा प्रयत्न करा. वैवाहिक नात्यात प्रेम टिकून राहील. विद्यार्थी वैयक्तिक आणि कौटुंबिक कारणांमुळे अभ्यासात पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकणार नाहीत.

मकर: हा आठवडा चांगला राहील. आरोग्याबाबत कोणताही निष्काळजीपणा करू नका. आर्थिक स्थिती मजबूत राहील. धनागमनाचे मार्ग मोकळे राहतील. व्यापाऱ्यांनी नवीन योजना लागू करताना घाई करू नये. नोकरी करणाऱ्यांचे कामात मन थोडे कमी लागेल. प्रेमसंबंधात मनातील गोष्टी जोडीदाराला स्पष्टपणे सांगा. वैवाहिक जीवनात जोडीदारासोबतचा ताळमेळ अतिशय उत्तम राहील. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवावा आणि गरज पडल्यास मित्रांची मदत घ्यावी.

कुंभ: हा आठवडा उत्तम राहील. उत्पन्न वाढू शकते. पैशांची कमतरता भासणार नाही. व्यवसायासाठी हा काळ अनुकूल असून नवीन लोकांच्या पाठिंब्यामुळे प्रगती होईल. नोकरीत सहकाऱ्यांसोबत किरकोळ वाद होऊ शकतात. प्रेमसंबंधांबाबत अभिमान वाटेल. वैवाहिक नात्यात कौटुंबिक दबावामुळे एखाद्या चांगल्या कामात अडथळा येऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा काळ यशाचा असून मेहनतीचे मोठे फळ मिळेल.

मीन: हा काळ मध्यम स्वरूपाचा राहील. आर्थिक स्थिती अतिशय उत्तम राहील. व्यापारी व्यवसाय वाढवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतील. कामाच्या ठिकाणी अहंकार बाळगू नका. प्रेमसंबंधात तणावाची शक्यता असल्याने सावध राहा. वैवाहिक जीवन सुखाचे असेल आणि कुटुंबात एखादे मंगल कार्य किंवा विवाह सोहळा पार पडू शकतो. अभ्यासात लक्ष कमी लागल्यामुळे विद्यार्थी काहीसे चिंतेत राहू शकतात.