साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 09:19 IST2025-05-04T09:09:14+5:302025-05-04T09:19:55+5:30

Weekly Horoscope: ०४ मे २०२५ ते १० मे २०२५ तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य…

Weekly Horoscope: या सप्ताहात ६ मे रोजी बुध मेष राशीत जाईल. अन्य कुठलाही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी- रवी मेष राशीत, गुरू व हर्षल वृषभ राशीत, मंगळ कर्क राशीत, केतु कन्या राशीत, तर प्लूटो मकर राशीत आहे. शुक्र, शनि, राहु, नेपच्यून आणि बुध मीन राशीत आहेत.

मंगळवारी बुध मेष राशीत रवीशी युती करेल. चंद्राचे भ्रमण कर्क, सिंह, कन्या आणि तूळ या राशींमधून राहील. गुरुवारी मोहिनी एकादशी, तर शुक्रवारी प्रदोष आहे.

एकंदरीत ग्रहस्थिती पाहता नोकरी, व्यवसाय, व्यापार, कुटुंब, शिक्षण, आर्थिक आघाडीवर आपणासाठी हा आठवडा कसा असेल? कोणत्या राशींना शुभ फले, यश मिळू शकेल? जाणून घेऊया...

मेष: हा आठवडा सामान्य फलदायी असण्याची शक्यता आहे. प्रेमीजनांसाठी आठवडा सामान्य आहे. नाते टिकवून ठेवण्याचा प्रयत्न कराल. वैवाहिक जीवनात काही समस्या निर्माण झाल्याने नात्यात कटुता येण्याची संभावना आहे. आर्थिकदृष्ट्या आठवडा अनुकूल आहे. खर्चांवर कात्री लावून आपल्या बचतीवर लक्ष द्याल. ह्या आठवड्यात कोणाला उसने पैसे दिल्यास त्याची परतफेड होण्यात अडचण येईल. नोकरी करणाऱ्यांनी व्यवहारात संयमित राहावे. असे केल्यानेच इतरांकडून कामे सुलभतेने करवून घेऊ शकाल. विद्यार्थ्यांना अध्ययनात मेहनत वाढवावी लागेल. असे केल्यानेच ते ध्येय गाठू शकतील. ह्या आठवड्यात प्रकृतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, अन्यथा आरोग्य विषयक समस्येत वाढ होईल. त्यासाठी वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल.

वृषभ: हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. वैवाहिक जीवनातील प्रेम टिकून राहील. एकमेकांना समजून घ्याल. एकमेकांशी चर्चा करून कौटुंबिक समस्यांचे निराकरण कराल. वैवाहिक जीवनातील सौख्य जाणवेल. ह्या आठवड्यात आर्थिक बाबीत चांगले परिणाम मिळतील. अडकलेला पैसा मिळण्याची संभावना आहे. व्यापाऱ्यांना अचानक धनलाभ संभवतो. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. भागीदारी व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी आठवडा काहीसा प्रतिकूल असल्याने त्यांनी थोडे सावध राहावे. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांचे लक्ष इतर प्रवृत्तीत गुंतल्याने अभ्यासाकडे त्यांचे दुर्लक्ष होऊ शकते. त्यांनी जर एखाद्या स्पर्धेत भाग घेतला तर त्यात यश प्राप्तीची संभावना आहे. प्रकृती बिघडल्याने कामात आपले लक्ष लागणार नाही. निष्कारण तणावात राहिल्याने एखादी समस्या होऊ शकते.

मिथुन: हा आठवडा मध्यम फलदायी आहे. विवाहितांसाठी आठवडा चांगला आहे. जोडीदारासह वेळ घालविण्याची संधी मिळाल्याने त्यांचे नाते अधिक दृढ होईल. काही कारणाने नात्यात दुरावा आला असल्यास तो आता कमी होईल. आर्थिक दृष्ट्या आठवडा चांगला आहे. व्यावसायिक योजनांचा लाभ होईल. नोकरीत पदोन्नती संभवते. प्राप्तीचे काही नवीन स्रोत मिळाल्याने चांगला लाभ होईल. कारकिर्दीत मोठी उसळी आल्याचे जाणवेल. जास्त मेहनत करावी लागली तरी एक विशिष्ट उंची गाठू शकाल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना ह्या आठवड्यात नवीन नोकरी लागण्याची संभावना आहे. विद्यार्थ्यांसाठी आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. त्यांना काही समस्यांना सामोरे जावे लागेल. त्यांच्या अध्ययनात विघ्न येईल, जे दूर करण्यासाठी त्यांना वरिष्ठांना सांगावे लागेल.

कर्क: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. प्रेमीजनांसाठी आठवडा सामान्य फलदायी आहे. काही कौटुंबिक समस्यांमुळे विवाहित व्यक्ती त्यांच्या जोडीदारास वेळ देऊ न शकल्याने त्यांच्या नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो. आर्थिक दृष्ट्या आठवडा सामान्य आहे. ह्या आठवड्यात प्राप्तीवर लक्ष द्यावे लागेल. प्राप्तीत वाढ करण्यासाठी नवीन स्रोत शोधून काढावे लागतील. असे केल्यास आर्थिक स्थिती मजबूत होईल. ह्या आठवड्यात लॉटरीत गुंतवणूक करण्याची योजना आखू शकता. व्यापाऱ्यांसाठी आठवडा मिश्र फलदायी आहे. जर व्यवसायात काही बदल करावयाचा असेल तर तो विचारपूर्वक करावा. विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला आहे. परीक्षेत त्यांना मनासारखे परिणाम मिळतील. ह्या दरम्यान ते एखाद्या नवीन अभ्यासक्रमासाठी अर्ज करू शकतात. योगासने व ध्यान-धारणेवर लक्ष केंद्रित करावे.

सिंह: हा आठवडा यश देणारा आहे. प्रेमीजनांना नाते टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल, अन्यथा एखाद्या तिसऱ्या व्यक्तीमुळे नात्यात समस्या निर्माण होऊ शकते. विवाहित व्यक्ती जोडीदारासह बसून समस्यांवर बोलणी करतील व त्यामुळे त्यांना समस्येवर तोडगा काढता येईल. वैवाहिक जीवनात काही तणाव असला तर तो निवळण्याची संभावना आहे. आर्थिक दृष्ट्या हा आठवडा सामान्य फलदायी आहे. एखादी गुंतवणूक करण्याची योजना आखाल. शेअर्स बाजाराशी संबंधित व्यक्तींनी एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊन गुंतवणूक करणे हितावह होईल. कारकिर्दीत नशिबाची साथ मिळेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीसह बदली मिळाल्याने एखाद्या दुसऱ्या ठिकाणी जावे लागू शकते. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणावर लक्ष द्यावे लागेल. जर आपला एखादा अभ्यासक्रम अपूर्ण राहिला असेल तर तो पुन्हा सुरु करू शकता.

कन्या: हा आठवडा मध्यम फलदायी आहे. विवाहितांसाठी आठवडा चांगला आहे. ते एकमेकांचा आदर करतील. त्यांना एकमेकांना समजून घेण्याची संधी मिळाल्याने नात्यातील कटुता दूर होऊ लागेल. एकटेपणा जाणवत असेल तर तो दूर करण्यासाठी जोडीदाराशी बोलून एखाद्या रमणीय ठिकाणी फिरावयास जाऊ शकता. आर्थिक आघाडीवर प्राप्तीत वाढ करण्याची संधी मिळेल. ह्या दरम्यान खर्च वाढल्याने काहीसे त्रस्त असाल, परंतु चांगली अर्थ प्राप्ती झाल्याने प्रसन्न व्हाल. ह्या आठवड्यात व्यापार मोठी उसळी घेईल व त्यामुळे प्राप्तीत वाढ होईल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना नुकसान होण्याची संभावना आहे. मेहनतीवर विश्वास ठेवावा.

तूळ: ह्या आठवड्यात क्षमतेचा विचार करावा लागेल. काही गैरसमजांमुळे विवाहित व्यक्तींना तणाव जाणवेल. जोडीदार समजून घेण्यास असमर्थ असल्याने नात्यात दुरावा येऊ शकतो. प्रेमीजन समस्यांविषयी प्रेमिकेशी बोलू शकतात. वाणीवर संयम ठेवावा लागेल, जेणेकरून नाते दृढ होण्यास मदत होईल. आर्थिकदृष्ट्या आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. अनेक ठिकाणी पैसा अडकून राहिल्याने नुकसान होण्याची संभावना आहे. व्यापारी सौद्यांना अंतिम स्वरूप देण्यात काही अडचणी येतील. एखाद्या प्रॉपर्टीत जर गुंतवणूक केली तर ती फायदेशीर ठरेल. व्यापाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. भागीदारामुळे आपणास मोठा लाभ होईल. निर्णयाची प्रशंसा केली जाईल. नोकरीत बदल करू शकता. विद्यार्थी वायफळ गोष्टींकडे दुर्लक्ष करून अध्ययनावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतील. परंतु मित्र त्यांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतील.

वृश्चिक: हा आठवडा चांगला आहे. प्रेमीजनांना चांगला वेळ मिळेल. त्यांच्यात रोमांस होईल. एकमेकांशी भविष्याबाबत ते विचार-विमर्श करतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन तणावग्रस्त असेल. तेव्हा शांत राहावे. नोकरी करणाऱ्या व्यक्ती नवीन काहीतरी काम करतील. त्यांना कामाच्या बाबतीत चांगले परिणाम मिळतील. प्रखर बुद्धिमत्ता व कार्यकौशल्यता आघाडीवर ठेवेल. एखादे मोठे पद मिळू शकते. व्यापाऱ्यांना थोडे सावध राहावे लागेल. त्यांच्या समस्या वाढू शकतात. खर्चात वाढ होईल. विद्यार्थी अभ्यासाचा आनंद घेऊ शकतील.

धनु: हा आठवडा मध्यम फलदायी असण्याची संभावना आहे. प्रेमीजन त्यांच्या प्रेमात गर्क राहतील. ते कोणाचीही पर्वा न करता त्यांच्या नात्यास पुढे घेऊन जातील. गैरसमजामुळे विवाहितांच्या जीवनात दुरावा येऊ शकतो, जो दूर करण्याचा प्रयत्न करावा लागेल. आर्थिक दृष्ट्या आठवडा सामान्य फलदायी आहे. खर्चात वाढ होईल. जर कमिशन घेऊन काम करत असाल तर ह्या आठवड्यात मोठा लाभ होण्याची संभावना आहे. व्यापाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. ह्या आठवड्यात त्यांच्या व्यापारास एक नवीन दिशा मिळेल. त्यांचा व्यापार परदेशा पर्यंत पसरू शकतो. नोकरी करणाऱ्यांची कामगिरी उत्तम होईल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा काहीसा प्रतिकूल आहे.

मकर: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. प्रेमीजनांना मिश्र फले मिळतील. प्रेमिकेशी समन्वय साधाल व त्यामुळे आपले नाते दृढ होईल. विवाहितांच्या जीवनात काही नावीन्य येईल. दोघेही एकमेकांना समजून घेऊन नाते दृढ करण्याचा प्रयत्न करतील. हा आठवडा आर्थिक दृष्ट्या काही समस्या घेऊन येत आहे. खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल. नोकरी करणाऱ्यांना आठवड्याच्या सुरवातीस कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल. अन्यथा वरिष्ठांशी त्यांचे वाद होण्याची संभावना आहे. विद्यार्थ्यांसाठी आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. त्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ न मिळाल्याने ते थोडे त्रस्त होतील. हा आठवडा प्रकृतीच्या दृष्टीने प्रतिकूल आहे. तेव्हा पौष्टिक आहार घ्यावा.

कुंभ: हा आठवडा काही आनंद घेऊन येत आहे. प्रेमीजनांसाठी आठवडा प्रसन्नतेचा आहे. नात्यात आलेली कटुता आता दूर होऊ लागेल. एकमेकांच्या सहवासात वेळ घालवू शकाल. काही समस्यांमुळे विवाहित व्यक्ती आपल्या जोडीदारास थोडा कमी वेळ देऊ शकतील. हा आठवडा आर्थिक दृष्ट्या चांगला आहे. व्यापारी नवीन काम करण्यास उत्सुक राहतील. त्यांना नवीन लोकांशी ओळख करण्याची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा अत्यंत चांगला आहे. वरिष्ठ कामावर प्रभावित होतील. विद्यार्थी भटकण्यात आपला वेळ वाया घालवतील व त्यामुळे त्यांच्या अभ्यासात समस्या येतील.

मीन: हा आठवडा मध्यम फलदायी आहे. प्रेमीजन त्यांच्या प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालवू शकतील. त्यांना प्रेमिकेवर विश्वास ठेवावा लागेल. विवाह ठरू शकतो. लोक नाते दृढ करण्याचा प्रयत्न करतील. त्यासाठी ते एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ देतील. ह्या आठवड्यात खूप खर्च करावा लागेल. ह्या दरम्यान खर्चां व्यतिरिक्त गुंतवणुकीवर सुद्धा लक्ष द्यावे लागेल. इतरांचे ऐकू नका. नोकरीत वरिष्ठांच्या बोलण्यावर लक्ष द्यावे लागेल, अन्यथा त्रास होऊ शकतो. व्यापारात एखादी नवीन योजना सुरु करू शकाल. विद्यार्थ्यांना एखाद्या संशोधनाची गोडी लागू शकते. ह्या आठवड्यात बाहेरील पदार्थ खाणे टाळावे लागेल.