साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल आठवडा, अनेकविध लाभ; प्राप्तीत वृद्धी, पदोन्नती योग!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 08:38 AM2023-09-03T08:38:02+5:302023-09-03T09:05:19+5:30

Weekly Horoscope: ०३ सप्टेंबर २०२३ ते ०९ सप्टेंबर २०२३ हा काळ तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य…

या सप्ताहात राशीपालट नाहीत. ग्रहस्थिती अशी गुरु, राहू आणि हर्षल मेषेत, शुक्र कर्केत, रवी आणि बुध सिंहेत, मंगळ कन्येत, केतू तुळेत, प्लूटो मकरेत, शनौ कुंभेत, तर नेपच्यून मीन राशीत आहे.

चंद्राचे भ्रमण मौन, मेष, वृषभ आणि मिथुन राशीतून राहील. रविवारी संकष्टी चतुर्थी आहे. ४ सप्टेंबर रोजी तिसरा श्रावणी सोमवार, तर ५ सप्टेंबर रोजी तिसरी मंगळागौर आहे. बुधवारी भगवान श्रीकृष्ण जयंती, कालाष्टमी, गुरुवारी गोपालकाला तसेच भगवान श्रीकृष्ण जयंती (वैष्णव) आहे.

३ सप्टेंबर २०२३ रोजी निज श्रावण कृष्ण चतुर्थी सायंकाळी ६:२५ पर्यंत आहे. सप्ताहाचे एकूण ग्रहमान, सण-उत्सव पाहता आपल्यासाठी आगामी आठवडा कसा असेल? कोणत्या राशींना लाभच लाभ मिळू शकतील? आर्थिक आघाडी, करिअर, शिक्षण, कुटुंब, नोकरी, व्यवसाय या आघाड्यांवर आगामी काळ कसा असू शकेल? जाणून घ्या...

हा आठवडा नवीन ऊर्जा देणारा असला तरी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सारासार विचार करून काम करावे. खर्च कमी होतील. प्राप्तीत वाढ झाल्याने आपल्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. नोकरीच्या ठिकाणी स्थिती अधिक चांगली होईल. एखादा नवीन पदभार सोपवला जाऊ शकतो. पदोन्नतीची संभावना असल्याने काम अधिक उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न करावा. व्यापारात काही नवीन संपर्कांचा लाभ होईल. शासन-प्रशासन यांचे सहकार्य मिळाल्याने कामात प्रगती होईल. विद्यार्थी बुद्धिमतेचा योग्य वापर करतील. स्मरणशक्ती वृद्धिंगत झाल्याने अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. घरात आनंद पसरेल. एखाद्या वाहनाची खरेदी करू शकाल.

हा आठवडा अनुकूल आहे. मित्रांच्या मदतीने एखादे नवीन काम हाती घेऊ शकता. प्राप्तीत वाढ झाल्याने मन आनंदून जाईल. नोकरीत पूर्ण उत्साहाने व जोशाने कामे कराल. असे असले तरी अधून - मधून राग येईल. हा राग सभोवतालच्या लोकांवर काढण्याची संभावना असल्याने त्यापासून दूर राहण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे. अन्यथा कार्यालयीन वातावरण बिघडून त्रास होईल. व्यापाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. व्यापारात नफा होईल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चढ - उतारांचा आहे. प्रकृतीची काळजी घ्या.

हा आठवडा चांगला आहे. कामात चांगली गती असल्याचे दिसून येईल, ज्यामुळे कार्य कौशल्याची ओळख निर्माण होईल. वरिष्ठ आपल्या कामाच्या पद्धतीने प्रभावित होतील. व्यापाऱ्यांना कामावर लक्ष द्यावे लागेल. काही लोक कामात बिघ्न आणण्याचा प्रयत्न करत असतील. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची कामगिरी उत्तम होईल. प्रकृतीची काळजी घ्या.

हा आठवडा अनुकूल आहे. विवाहितांना तर हा आठवडा अत्यंत चांगला आहे. कुटुंबीयांचा सहवास मिळेल व त्यांच्या आशीर्वादाने कोणतेही काम यशस्वीपणे करू शकाल. नोकरीच्या ठिकाणी तणाव निर्माण होण्याच्या शक्यतेमुळे सावध राहून कामे करावीत. कोणत्याही व्यक्तीस कामात निष्कारण सहभागी करू नये. अन्यथा नुकसान होईल. कामाचा अहवाल त्वरित वरिष्ठांना दिल्यास कामगिरी त्यांच्या नजरेस भरेल. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. सरकारी क्षेत्राकडून चांगला फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांना हा आठवडा अनुकूल आहे. त्यांना त्यांच्या परिश्रमाचे यथायोग्य फळ मिळेल. ह्या आठवड्यात आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.

हा आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. विवाहितांसाठी आठवडा बराचसा प्रतिकूलच आहे. परिश्रम यशस्वी होऊन सुखद परिणाम मिळतील. वरिष्ठांशी उत्तम समन्वय साधू शकाल. व्यापाऱ्यांना प्रतिभा दाखविण्याची संधी मिळेल. एखादा नवीन व्यापारी सौदा करू शकाल. त्याने मोठा लाभ होईल. ह्या आठवड्यात प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. मानसिक तणावामुळे आपल्या प्रकृती व्यतिरिक्त महत्वाच्या कामात त्रास होऊ शकतो. शारीरिक तंदुरुस्तीसाठी आठवड्याच्या सुरुवातीपासूनच खबरदारी घेऊ शकता.

हा आठवडा चढ - उतारांचा आहे. कौटुंबिक तणाव दूर करण्यासाठी कुटुंबातील वयोवृद्ध व्यक्तींच्या मदतीने प्रयत्न करावे लागतील. प्रेमिकेस एखादी मोठी भेटवस्तू देऊ शकता. विचार पूर्णतः योग्य दिशेस नसल्याने मनात काही गैरसमज निर्माण होऊन स्वतःच आनंदाच्या योजनेत बाधक होऊ शकता. काही महत्वाच्या कार्यात अडथळे निर्माण होण्याची संभावना आहे. अशावेळी कोणतेही मोठे काम हाती न घेण्यातच शहाणपणा आहे. कोणाची मदत घ्यावी लागलीच तर ज्याच्यावर विश्वास असेल निव्वळ त्याचीच मदत घ्यावी. नोकरीत प्रयत्नरत असल्याचे दिसून येईल व त्यामुळे स्थिती मजबूत होईल. व्यापारासाठी आठवडा सामान्यच आहे. जास्त प्रयत्न करून लाभ कमी होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी मित्रांच्या मदतीने शिक्षणात चांगली कामगिरी करू शकतील. ह्या आठवड्यात आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

हा आठवडा मिश्र फलदायी आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होऊन जोडीदाराशी जवळीक वाढेल. ह्या आठवड्यात आपल्या स्थितीत चढ - उतार येत असल्याचे दिसून येईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींची स्थिती चांगली राहील. कामानिमित्त बाहेरगावी जावे लागू शकते. विद्यार्थ्यांना अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे अभ्यासावर लक्ष द्यावे लागेल. ह्या आठवड्यात प्रकृतीत चढ - उतार येतील.

हा आठवडा काहीसा प्रतिकूल असू शकतो. तेव्हा सावध राहावे. ह्या आठवड्यात कोणत्याही प्रकारे आर्थिक गुंतवणूक करू नका. कोणत्याही प्रकारच्या चिटफंडात पैसा गुंतवू नये, अन्यथा नुकसान होऊ शकते. कोणाला उसने पैसे देऊ नये. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी आठवडा चांगला आहे. एखाद्या कामगिरीने प्रशंसा सुद्धा होऊ शकते. तसेच नवीन प्रकल्प सुद्धा मिळू शकतात. त्यामुळे खुश व्हाल. वरिष्ठांशी समन्वय उत्तम राहील. तो फायदेशीर होईल. व्यापाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. काही नवीन लोकांच्या सहकार्याने कामात प्रगती करून चांगला फायदा मिळवू शकाल. व्यापाराच्या कामासाठी दूरवरच्या प्रवासाची योजना आखू शकाल. विद्यार्थ्यांना अडथळे आले तरी महत्वाच्या विषयांवर पकड मिळविण्याची संधी मिळेल. ह्या आठवड्यात आपणास आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

हा आठवडा चांगला आहे. वैवाहिक जीवन सुखद होईल. कुटुंबियांसाठी काहीतरी करण्याची इच्छा होईल. जमीन - जुमल्याशी संबंधित बाबींकडे आकर्षित व्हाल. नोकरीत स्थिती चांगली राहिली तरी कोणाशी चुकीचे वर्तन केल्यास नुकसान होईल. असे असले तरी नशिबाची साथ मिळाल्याने पदोन्नती संभवते. व्यापाऱ्यांना कष्टांचे यथायोग्य फळ मिळेल. एखादा मोठा फायदा होऊ शकेल, असा मोठा सौदा हाती लागेल. विद्यार्थी अभ्यासाच्या बाबतीत गंभीर असल्याचे दिसून येईल. मित्रांचा पाठिंबा मिळेल. ह्या आठवड्यात प्रकृतीत सुधारणा होईल.

हा आठवडा चांगला आहे. कौटुंबिक सौख्य मिळेल. कौटुंबिक दायित्वाची पूर्तता होईल. मातेच्या आशीर्वादाने महत्वाची कामे पूर्ण होतील. कौटुंबिक वातावरण सकारात्मक राहील. वैवाहिक जीवनात जोडीदाराचे सहकार्य मिळेल. प्रेमीजनांसाठी आठवडा अनुकूल आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना काही समस्यांना सामोरे जावे लागेल. व्यापाऱ्यांना प्रवास केल्याने लाभ होईल. काही प्रतिष्ठित व्यक्तींशी ओळख होईल. व्यापारासाठी त्यांचा पाठिंबा मिळेल. संततीसाठी आठवडा उन्नतीदायक आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. त्यांचे लक्ष अभ्यासावर केंद्रित होईल व त्यामुळे त्यांना चांगले परिणाम मिळतील. हा आठवडा आरोग्यास चांगला असला तरी बाहेरील पदार्थ खाणे टाळावे.

हा आपल्यासाठी चांगला आहे. विवाहितांना वैवाहिक जीवन सुखद असल्याची जाणीव होईल. ह्या आठवड्याच्या सुरुवातीस मित्र व कुटुंबियांसह सहलीस जाण्याची योजना आखून एखाद्या ठिकाणी फिरावयास जाऊ शकता. त्याने तजेला व नावीन्य जाणवू लागेल. नोकरीत परिश्रम करावे लागतील. परिश्रम केल्यास यशस्वी होऊ शकाल. पदोन्नती मिळण्याची संभावना सुद्धा आहे. व्यापाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. गुंतवणूक चांगला लाभ मिळवून देईल. व्यापार वृद्धीसाठी एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीची मदत सुद्धा मिळू शकते. विद्यार्थ्यांना अध्ययनाच्या प्रवाहात परतण्यासाठी पालकांच्या पाठिंब्याची गरज भासेल. ह्या आठवड्यात आपणास आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

हा आठवडा मध्यम फलदायी आहे. वैवाहिक जीवनाचे सौख्य लाभेल. संपत्तीशी संबंधित वाद संभवतो. आठवड्याच्या सुरुवातीस एखाद्या पूजेसाठी किंवा मंदिरासाठी दान देऊ शकता. त्याने शांती लाभून प्रतिष्ठा वाढेल. प्राप्तीत वृद्धी होईल. व्यापारात नवीन परिणाम मिळत असल्याचे दिसून येईल. विरोधकांवर मात कराल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे.