एक राजयोग, चौपट लाभ: ६ राशींची इच्छापूर्ती, सरकारी कामात यश; व्यापारात नफा, प्रमोशन शक्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 09:09 AM2024-05-21T09:09:09+5:302024-05-21T09:09:09+5:30

मे महिन्यात एक शुभ राजयोग जुळून येणार असून, कोणत्या सहा राशी लकी ठरू शकतात, ते जाणून घ्या...

संपूर्ण मे महिन्यात विविध प्रकारचे शुभ योग, राजयोग जुळून येत आहेत. नवग्रहांपैकी गुरु, सूर्य, शुक्र आणि बुध हे ग्रह वृषभ राशीत असणार आहेत. पैकी गुरु, सूर्य आणि शुक्र वृषभ राशीत विराजमान असून, मे महिन्याच्या सांगतेला बुध वृषभ राशीत प्रवेश करणार आहे.

या ग्रहांच्या वृषभ राशीतील गोचरामुळे विविध प्रकारचे योग जुळून येत आहेत. पैकी शुक्राने वृषभ राशीत गोचर केल्याने मालव्य नामक विशेष योग जुळून येत असून, हा योग राजयोगाप्रमाणे फले देतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जात आहे. वृषभ राशीचा स्वामी शुक्र असल्याने, स्वराशीत आल्याने अधिक प्रबळ होतो, असे म्हटले जाते.

या मालव्य राजयोगाचा काही राशींना आगामी काळात उत्तम लाभ मिळू शकेल. अनेक शुभ संधी, यश-प्रगती साध्य करता येऊ शकेल, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...

मेष: हा योग फायदेशीर ठरू शकतो. आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. अनपेक्षित आर्थिक लाभही मिळू शकेल. तीर्थयात्रेला जाण्याचीही शक्यता आहे. अविवाहित लोकांसाठी चांगली स्थळे येऊ शकतात. प्रत्येक बाबतीत कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. व्यक्तिमत्व सुधारेल.

कर्क: सौभाग्य वृद्धी होऊ शकेल. व्यवसायात अपेक्षित यश मिळू शकेल. योजना पूर्ण होईल. काही सरकारी काम प्रलंबित होते, ते प्रशासनाशी संबंधित एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने पूर्ण केले जातील. नोकरदारांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत मिळू शकतात. वैवाहिक जीवन आनंदी असू शकेल. कुटुंबीयांसह कोणत्याही पर्यटनस्थळी जाऊ शकता.

सिंह: या योगात शानदार संधी मिळू शकतील. नोकरी करणारी व्यक्ती इच्छित ठिकाणी बदलीची इच्छा घेऊन बसली असेल तर इच्छा पूर्ण होणार आहे. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. पदोन्नतीसह आर्थिक लाभ आणि नवीन जबाबदाऱ्या मिळतील. कार्यक्षेत्राव्यतिरिक्त कुटुंबात सन्मान वाढेल. जोडीदारासोबत असलेले गैरसमज लवकरच दूर होऊ शकतील.

कन्या: हा योग अनुकूल सिद्ध होऊ शकतो. नशिबाची साथ मिळू शकेल. नोकरदारांना पदोन्नतीसह चांगल्या पगारवाढीचा आनंद मिळू शकेल. नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. देश-विदेशात फिरू शकता. कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.

धनु: शुभ आणि फलदायी सिद्ध होऊ शकेल. लहान भावंडांसोबत काही मुद्द्यावरून वाद होऊ शकतो. मात्र, कालांतराने गैरसमज दूर होऊ शकतील. अचानक लांब प्रवासाला जावे लागू शकेल. हा प्रवास आनंददायी आणि फायदेशीर ठरणार आहे. वैवाहिक जीवनात आनंद आणण्यासाठी तुम्हाला फक्त वादांपासून दूर राहावे लागेल.

मकर: मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. प्रत्येक बाबतीत कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण सहकार्य मिळू शकेल. प्रेमसंबंधात यश मिळेल. उत्पन्न वाढू शकते. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.