४ महिने शुक्र राहु-केतु समसप्तक युती योग: ९ राशींना राजयोग वरदान, लाभच लाभ; भरभराट, शुभ घडेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 14:21 IST2025-01-28T14:07:30+5:302025-01-28T14:21:32+5:30
शुक्र उच्च राशीत प्रवेश करणार असून, पुढील चार महिने याच राशीत विराजमान असेल. कोणत्या राशींना सर्वोत्तम लाभ, सुख-समृद्धी, ऐश्वर्य-वैभव, यश-प्रगती प्राप्त होऊ शकेल? जाणून घ्या...

शुक्र हा रोमान्स, कलात्मक प्रतिभा, शारीरिक व भौतिक जीवनाची गुणवत्ता, धन, आनंद, ललित कला, संगीत, नृत्य, चित्रकला, मूर्तिकला यांचा कारक मानला जातो. २८ जानेवारी २०२५ रोजी शुक्र मीन राशीत प्रवेश करत आहे. मीन राशीचे स्वामित्व गुरु ग्रहाकडे आहे. तर मीन ही शुक्राची उच्च रास मानली जाते. म्हणजेच शुक्र या राशीत आल्यावर उच्च फले देऊ शकतो, असे म्हटले जाते.
विद्यमान स्थितीत राहु मीन राशीत विराजमान आहे. तर केतु कन्या राशीत विराजमान आहे. शुक्र मीन राशीत आल्यावर शुक्र आणि राहुचा युती योग जुळून येत असून, केतु ग्रहाशी समसप्तक योग जुळून येत आहे. राहु आणि केतु मे महिन्याच्या उत्तरार्धात राशी परिवर्तन करणार आहेत. तर शुक्रही ३१ मे पर्यंत मीन राशीत असेल. त्यामुळे शुक्र आणि राहु-केतु यांचा हा योग महत्त्वाचा मानला जात आहे.
०२ मार्च २०२५ रोजी शुक्र याच मीन राशीत वक्री होत आहे. तर १३ एप्रिल २०२५ रोजी शुक्र ग्रह मीन राशीत मार्गी होईल. तसेच ३१ मे पर्यंत शुक्र मीन राशीत असणार आहे. याचा केवळ राशींवर नाही, तर देश-दुनियेवर मोठा प्रभाव आणि परिणाम पाहायला मिळू शकतो. मेष ते मीन या राशींसाठी शुक्राचे गोचर आणि राहु-केतु समसप्तक युती योग कसा ठरू शकेल? तुमची रास कोणती? जाणून घेऊया...
मेष: अधिक धावपळीसह जास्त खर्च होऊ शकतो. चैनीच्या वस्तूंवर जास्त खर्च होईल. देशात-परदेशात प्रवास करण्याची संधी मिळू शकेल. विचारपूर्वक आखलेल्या रणनीती प्रभावी ठरू शकतील. या काळात कोणालाही जास्त पैसे उधार देऊ नका, अन्यथा आर्थिक नुकसान सहन करावे लागेल.
वृषभ: शुक्राचे गोचर आणि राहु-केतुचा योग वरदानापेक्षा कमी नाही. शैक्षणिक स्पर्धेत अनपेक्षित यश मिळू शकेल. प्रेमविवाह करण्याचा विचार करत असाल तर त्या दृष्टिकोनातून ग्रहांचे संक्रमण अनुकूल असेल. मुलांशी संबंधित चिंता दूर होतील. कुटुंबात एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. त्यामुळे मन प्रसन्न होऊ शकेल.
मिथुन: शुक्र गोचर आणि राहु-केतुशी योग करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत ते फायदेशीर ठरू शकतो. प्रमोशन मिळू शकते. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. अडकलेले पैसे परत येतील. व्यवसायात नफा आणि गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. केंद्र किंवा राज्य सरकारच्या विभागांमधील प्रलंबित कामे होण्याची शक्यता आहे. घर किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्या दृष्टिकोनातून ग्रहांचे भ्रमण अनुकूल राहील.
कर्क: शुक्राचे गोचर आणि राहु-केतुचा योग वरदानापेक्षा कमी नाही. नशिबाची साथ मिळू शकेल. देशात-परदेशात प्रवास करू शकता. प्रलंबित काम पूर्ण होऊ शकतील. नियोजित योजना यशस्वी होऊ शकतील .धर्म आणि अध्यात्माच्या क्षेत्रात प्रगती होईल. नवीन लोकांशी संवाद वाढेल. परदेशी कंपन्यांमध्ये नोकरी किंवा नागरिकत्व मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होण्याची शक्यता आहे. मित्र आणि नातेवाईकांकडूनही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा प्रयत्न करत असतील तर त्या दृष्टिकोनातूनही हा काळ उत्तम राहू शकेल.
सिंह: शुक्राचे गोचर आणि राहु-केतुचा योगाचा संमिश्र प्रभाव पाहायला मिळू शकतो. आरोग्य आणि वैवाहिक जीवनावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. परंतु कार्यक्षेत्रात प्रगती होईल. आदर आणि प्रतिष्ठा वाढेल. अचानक आर्थिक धनलाभ होण्याची शक्यता आहे. बराच काळ अडकलेले पैसे किंवा उधारी परत मिळण्याची शक्यता आहे. डोळ्यांशी संबंधित समस्यांबाबत काळजी घ्यावी. कोणतेही काम पूर्ण होईपर्यंत ते सार्वजनिक करू नका.
कन्या: उत्तम यश प्राप्त होऊ शकते. प्रगतीची कवाडे खुली होऊ शकतात. विशेषतः लग्नाशी संबंधित चर्चा यशस्वी होतील. वैवाहिक जीवनातही गोडवा येईल. सासरच्या लोकांकडून पाठिंबा मिळेल. कोणत्याही प्रकारचा व्यवसाय भागीदारीत करायचा असेल तर त्या दृष्टिकोनातूनही संधी अनुकूल असेल. कार्य क्षमता आणि उर्जेचा योग्य वापर केला तर सर्वोत्तम यशोशिखरावर पोहोचू शकाल.
तूळ: शुक्राचे गोचर आणि राहु-केतुचा योगाने अनेक अनपेक्षित परिणाम आणि चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. विशेषतः गुप्त शत्रू सक्रिय असतील. कामाच्या ठिकाणीही कटाचे बळी ठरू शकाल. केवळ कामावर लक्ष केंद्रीत करावे. आरोग्याची काळजी घ्यावी. वादाची प्रकरणे सामंजस्याने सोडवणे शहाणपणाचे ठरेल. विलासी वस्तूंमधून भौतिक सुखाचा आनंद घेऊ शकाल.
वृश्चिक: शुक्राचे गोचर आणि राहु-केतुचा योगाने शैक्षणिक स्पर्धांमध्ये अनपेक्षित यश मिळू शकेल. प्रेम प्रकरणांमध्येही यश मिळण्याची शक्यता आहे. नवीन लोकांशी संवाद वाढेल. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य आणि मोठ्या भावंडांकडून सहकार्य मिळू शकेल. घेतलेले निर्णय आणि केलेल्या कृतींचे कौतुक केले जाईल. नवीन योजना सुरू होतील, ज्या फायदेशीर ठरतील. एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्यास उशीर करू नका.
धनु: शुक्राचे गोचर आणि राहु-केतुचा योग लाभदायक ठरू शकतो. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित प्रकरणे सोडवली जाऊ शकतील. नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर असे निर्णय फायदेशीर ठरू शकतील. मित्र आणि नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. प्रवास सावधगिरीने करा. परदेशी मित्र आणि नातेवाईकांकडूनही सहकार्य मिळू शकेल. नवीन लोकांशी संवाद वाढेल, ज्याचा परिणाम आनंददायी असू शकेल.
मकर: स्वभावात सौम्यपणा येऊ शकतो. उत्तम यश मिळू शकेल. निर्णय यशकारक ठरू शकतील. धर्म आणि अध्यात्मात रस वाढेल. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य आणि भावंडांकडूनही तुम्हाला सहकार्य मिळेल. कमी प्रयत्न केले तरी यश सहज मिळेल. वैवाहिक चर्चा यशस्वी होतील. वैवाहिक जीवनातही गोडवा येईल. सरकारी विभागांचे प्रलंबित काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
कुंभ: सर्व प्रकारे फायदेशीर ठरू शकेल. आर्थिक बाजू मजबूत राहू शकेल. बराच काळ दिलेले पैसे किंवा उधारी परत मिळण्याची शक्यता आहे. अचानक आर्थिक धनलाभ होण्याची शक्यता आहे. डोळ्याशी संबंधित समस्यांबद्दल तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. नोकरीत बढती आणि मान-सन्मान वाढेल. रणनीती गुप्त ठेवून काम केल्यास अधिक यशस्वी होऊ शकाल.
मीन: ही रास शुक्राची उच्च रास असून, राहु-केतुचा योग अनुकूल ठरू शकतो. नियोजित योजना यशस्वी होऊ शकतात. प्रेमसंबंध अधिक दृढ होऊ शकतात. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. समाजात लोकप्रिय व्हाल. आदर आणि प्रतिष्ठा मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहू शकेल. प्रवास आणि विलासी वस्तू खरेदीवर जास्त खर्च होईल. सरकारकडून पूर्ण सहकार्य मिळेल. केंद्र किंवा राज्य सरकारच्या विभागांमध्ये कोणत्याही प्रकारच्या निविदा इत्यादींसाठी अर्ज करायचा असेल, तर त्या दृष्टिकोनातूनही हा काळ अनुकूल राहू शकेल. निर्णय घेण्यास उशीर करू नका. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.