राहु-शुक्र युती: ५ राशींना राजयोगाचा लाभ, यश-प्रगतीची संधी; नशिबाची साथ, भाग्याचा काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 06:06 AM2024-03-30T06:06:06+5:302024-03-30T06:06:06+5:30

राहु आणि शुक्राचा युती योग जुळून येत आहे. याचा काही राशींना करिअर, नोकरी, व्यवसाय यांमध्ये उत्तम फायदा होऊ शकतो. जाणून घ्या...

एप्रिल महिन्यात नवग्रहांपैकी चार ग्रह राशीपरिवर्तन करणार आहेत. बुध ग्रह अस्तंगत, वक्री होणार असून, मीन राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य, मंगळ आणि शुक्र हे ग्रहही एप्रिल महिन्यात राशीपरिवर्तन करणार आहेत. मार्च महिन्याची सांगता होताना अखेरच्या दिवशी म्हणजेच ३१ मार्च रोजी शुक्र मीन राशीत प्रवेश करणार आहे.

मीन ही शुक्र ग्रहाची उच्च रास मानली जाते. विद्यमान स्थितीत मीन राशीत राहु आणि सूर्य ग्रह विराजमान आहेत. त्यामुळे मीन राशीत सूर्य-राहु-शुक्र यांचा त्रिग्रही योग जुळून येणार आहे. तर शुक्र आणि राहुचा युती योग जुळून येत आहे. शुक्र आणि राहुचा युती योग महत्त्वाचा मानला गेला आहे.

एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धात शुक्र मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करेल. तोपर्यंत राहु आणि शुक्राचा युती योग राहील. तसेच मालव्य नामक राजयोग जुळून येत आहे. या योगाचा ५ राशींना उत्तम लाभ मिळू शकतो, असे सांगितले जात आहे.

कर्क: शुक्र-राहु युतीमुळे नशिबाची पूर्ण साथ मिळू शकेल. नोकरदारांना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. पगार वाढू शकतो. व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभाच्या अचानक संधी मिळतील. प्रलंबित कामे लवकरच पूर्ण होऊ शकतील. मोठी संधी मिळू शकते.

सिंह: शुक्र-राहु युतीमुळे आर्थिक लाभ आणि नशिबाची साथ मिळू शकेल. आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल. वैवाहिक जीवन चांगले राहू शकेल. मुले आनंदी राहतील. व्यवसाय आणि नोकरीच्या ठिकाणी प्रगतीची शक्यता आहे.

कन्या: जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. भागीदारीत कोणतेही काम होत असेल तर त्यात फायदा होऊ शकतो. व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरदारांना पदोन्नती मिळू शकते. आर्थिक स्थिती सुधारेल. समाजात मान-सन्मान मिळेल.

वृश्चिक: अनेक प्रकारचे आनंद येऊ शकतात. वैवाहिक जीवनात सकारात्मक प्रभाव पडेल. एकमेकांसोबत अधिकाधिक वेळ घालवता येईल. अनेक संधी तुम्हाला मिळू शकतात. चांगल्या वेतनवाढीसह नवीन नोकरी मिळू शकते. शिक्षणाच्या दृष्टीने परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.

कुंभ: शुक्र-राहुचा युती योग शुभ सिद्ध होऊ शकतो. आर्थिक फायदा होऊ शकतो. नोकरदार लोकांना त्यांच्या कार्यालयात काही परिस्थितींचा सामना करावा लागू शकतो. पदोन्नती आणि पगार वाढण्याची शक्यता आहे.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.