विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 17:48 IST2025-04-30T17:18:32+5:302025-04-30T17:48:31+5:30
Vaishakh Vinayak Chaturthi May 2025: मे महिन्याची सुरुवातच गणपतीच्या शुभाशिर्वादाने होत आहे. त्यामुळे हा आगामी कालावधी कोणत्या राशींसाठी कसा ठरू शकेल? कोणावर बाप्पाची विशेष कृपा होऊ शकेल? जाणून घ्या...

Vaishakh Vinayak Chaturthi May 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, आताच्या घडीला रवी मेष राशीत, गुरू हर्षल वृषभ राशीत, मंगळ कर्क राशीत, केतु कन्या राशीत, प्लूटो मकर राशीत आहे. बुध, शुक्र, शनि, राहु आणि नेपच्यून मीन राशीत आहे. चंद्राचे भ्रमण मेष, वृषभ, मिथुन आणि कर्क राशीतून राहील.
गुरुवार, ०१ मे २०२५ रोजी विनायक चतुर्थी, तर शुक्रवारी श्री आदि शंकराचार्य जयंती, रामानुजाचार्य जयंती आहे. शनिवारी गंगासप्तमी, गंगा पूजन आहे. हिंदू नववर्षाचा दुसरा वैशाख महिना सुरू झाला आहे. या महिन्यात अनेक सण उत्सव, व्रते मोठ्या उत्साहाने साजरी केली जातात.
प्रत्येक मासाच्या शुद्ध चतुर्थीला ‘विनायक चतुर्थी’ असे म्हटले जाते. गणपतीची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी, कृपा होण्यासाठी प्रत्येक महिन्यातील शुद्ध चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थीचे व्रत केले जाते. या दिवशी जुळून आलेल्या ग्रहयोगांचा कोणत्या राशींना सर्वाधिक लाभ मिळू शकेल? कोणत्या राशींना गणपती बाप्पाची अपार कृपा मिळू शकेल? जाणून घेऊया...
मेष: कितीही कष्ट पडले तरी बुद्धिमत्तेच्या जोरावर समस्यांवर सहजपणे मात करू शकाल. वैवाहिक जीवनातील समस्या वाढतील, ज्या दूर करण्यासाठी कुटुंबीयांची मदत घ्यावी लागेल. अशा समस्या निर्माण होऊ नयेत म्हणून नात्यात वैचारिक स्पष्टता ठेवावी. खर्चात वाढ होईल. असे असले तरी आपण काही आर्थिक गुंतवणूक करण्याचा प्रयत्न कराल. कारकिर्दीच्या ठिकाणी यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. एखाद्या ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केला असेल तर तेथून नोकरीची ऑफर येण्याची दाट संभावना आहे. विद्यार्थ्यांचे मन विचलित झाल्याने त्यांना अध्ययनात काहीसा त्रास होईल. एखाद्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यावयाचा असेल तर तो सहजपणे मिळू शकेल. मात्र त्यांचे लक्ष इतरत्र लागल्याने अभ्यासात समस्या येतील.
वृषभ: एखाद्या तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे तणाव उद्भवू शकतो. वैवाहिक जोडीदारापासून काहीही लपवून ठेवू नये. वैवाहिक जीवनात दोघांनी एकमेकांना समजून घेऊन संसार करावा. आर्थिक आघाडीसाठी काळ चांगला आहे. एखाद्या व्यक्तीस उसने पैसे दिले असतील तर ते पूर्णतः मिळण्याची संभावना आहे. एखाद्या मोठ्या योजनेचा लाभ घेऊ शकता. कोणाशीही भांडण किंवा वाद होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. व्यापारात मेहनतीचे यथायोग्य फळ मिळेल. योजनांना गती द्याल. व्यापारात थोडी गुंतवणूक कराल. कारकिर्दी विषयक काळजी असली तर ती दूर होईल. विद्यार्थ्यांचे अभ्यासावर लक्ष केंद्रित नसल्याने त्यांना काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. ते तणावाखाली वावरत असतील. तसेच त्यांनी इकडे-तिकडे फिरण्यात वेळ वाया दवडण्या ऐवजी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.
मिथुन: वैवाहिक जोडीदाराशी काही वाद झाल्याने वैवाहिक जीवनात थोडा गोंधळ उडेल. एकत्र बसून व चर्चा करून त्यास दूर केलेत तर ते उपयुक्त ठरेल. वैवाहिक जोडीदारावर विश्वास ठेवावा लागेल तरच एकमेकांना समजून घेऊ शकाल. एखाद्या जुन्या मित्राची भेट होण्याची संभावना आहे. खर्चात होणारी वाढ त्रस्त करू शकते. कारकिर्दीच्या बाबतीत काहीसे त्रासून जाल. कौटुंबिक खर्चांव्यतिरिक्त इतर काही कामांसाठी पैसे खर्च कराल. नोकरी करणाऱ्यांसाठी काळ मिश्र फलदायी आहे. नोकरीत बदल करण्यासाठी काळ अनुकूल आहे. एखाद्या जुन्या नोकरीच्या ठिकाणाहून बोलावण्यात येऊ शकते. आपण भागीदारीत एखादा व्यवसाय सुरू करू शकाल. विद्यार्थ्यांना अभ्यासात काही समस्या जाणवतील. ते तणावाखाली वावरत असतील. त्यामुळे अभ्यासात त्यांचा गोंधळ उडू शकतो.
कर्क: प्रेमीजन एकमेकांची काळजी घेतील. त्यांना एकमेकांना समजून घेण्याची संधी मिळाल्याने ते नात्यात प्रगती करू शकतील. विवाहितांसाठी काळ चांगला आहे. दोघेही एकमेकांच्या सहवासात खुश राहतील. एखादे नवीन घर किंवा वाहन खरेदी कराल व त्यासाठी खर्च होईल. असे असले तरी थोडी आर्थिक गुंतवणूक करण्याचा विचार करावा. कारकिर्दीच्या दृष्टीने काळ काहीसा प्रतिकूल आहे. मात्र मेहनत करणे सोडू नये. मेहनतीचे यथायोग्य फळ नक्कीच मिळेल. व्यापाराची वाढ होईल. नोकरी करणाऱ्यांनी सध्या नोकरी बदलण्याचा विचार करू नये. विद्यार्थी आपले ज्ञान वाढविण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतील. इतरत्र जाऊन ते ज्ञानवृद्धीचा प्रयत्न करतील. हे सर्व करण्यात ते यशस्वी होतील.
सिंह: जोडीदाराकडून जे काही अपेक्षित होते ते सर्व पूर्ण झाल्याने त्यांचे नाते अधिक दृढ होईल. अहंकार बाजूस सारावा लागेल. अन्यथा नात्यात तणाव उद्भवू शकतो. एखाद्या प्रॉपर्टीत किंवा जमिनीत आर्थिक गुंतवणूक केलीत तर ती लाभदायी ठरेल. आर्थिक थकबाकी मिळण्याची संभावना आहे. हिंडण्या-फिरण्यावर भरपूर खर्च कराल. मित्रांच्या सहवासात एखाद्या पार्टीचे आयोजन करू शकाल. विद्यार्थ्यांना अध्ययनावर लक्ष केंद्रित करावे लागेल. एखादा विषय न समजल्याने ते त्रस्त होतील. विषयांचे योग्य आकलन होण्यासाठी एखाद्या मार्गदर्शकाची मदत जरूर घ्यावी.
कन्या: प्रेमीजनांसाठी चांगला काळ आहे. दोघेही एकमेकांना भेटून सुखद क्षण व्यतीत करतील. कदाचित दूरवर फिरावयास जाण्याचे आयोजन ते करू शकतील. विवाहितांना वैवाहिक संबंध दृढ करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी त्यांना जोडीदाराच्या सहवासात थोडा वेळ घालवावा लागेल. विनाकारण काही खर्च करावे लागतील. त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा. कारकिर्दीत मेहनत केल्या नंतरच यथायोग्य फळ मिळेल. त्यासाठी भरपूर धावपळ करावी लागेल. अशी धावपळ केल्यावर एखादी चांगली नोकरी मिळू शकते. एखादी सरकारी नोकरी मिळविण्याच्या तयारीवर लक्ष केंद्रित करावे लागेल. व्यापारात योजनांसाठी भरपूर पैसे गुंतवाल. नोकरी करणाऱ्यांच्या प्राप्तीत वाढ होईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या काही सवयींमुळे अध्ययनात काही समस्या येऊ शकतात. तसेच ते मित्रांसह हिंडण्या-फिरण्यात व मस्ती करण्यात जास्त वेळ घालवत बसल्यामुळे अभ्यासावर परिणाम होऊ शकतो.
तूळ: वैवाहिक जोडीदारास कमी महत्व दिल्यामुळे दुरावा वाढण्याची संभावना आहे. प्रेमीजनांनी नाते सांभाळून ठेवावे. प्रेमिकेचे म्हणणे ऐकून घेतल्यास तिच्या विचारांबद्दल अंदाज येऊ शकेल. आर्थिक दृष्ट्या हा काळ चांगला आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कर्जासाठी अर्ज केला असेल तर ते मिळण्याची दाट संभावना आहे. नोकरी करणाऱ्यांना एखादे चांगले पद मिळू शकेल. त्यांची पदोन्नती होईल. व्यापारात योजनांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. मेहनतीने एखाद्या नवीन प्रकल्पाची सुरुवात कराल, जी लाभदायी ठरेल. विद्यार्थी आपले ज्ञान वाढविण्यासाठी पुस्तके, मासिके, सामाजिक माध्यमे इत्यादींची मदत घेतील. विविध स्पर्धांमध्ये सुद्धा सहभागी व्हाल. नोकरीसाठी तयारी करू लागाल.
वृश्चिक: वैवाहिक जीवनातील समस्येतून दिलासा मिळेल. एकमेकांची काळजी घ्याल व एकमेकांना समजून घ्याल. आर्थिक दृष्ट्या काळ चांगला आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला लाभ होण्याची संभावना आहे. व्यापारातील योजना गती घेतील. त्याचा आर्थिक फायदा झाल्यामुळे आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. व्यापारासाठी हा काळ चांगला आहे. व्यापारानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामात मनाप्रमाणे लाभ होईल. त्यांची पदोन्नती संभवते. हा काळ विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे. त्यांनी मेहनतीवर विश्वास ठेवावा. एखाद्या नवीन अभ्यासक्रमाची गोडी त्यांच्यात निर्माण होऊ शकते. ज्यात त्यांना सहजपणे प्रवेश मिळू शकेल.
धनु: वैवाहिक जीवन सुखद होईल. एकमेकांची काळजी घेतील तसेच एकमेकांच्या कामात सहकार्य करतील. आर्थिकदृष्ट्या काळ काहीसा प्रतिकूल आहे. सढळ हस्ते खर्च केल्यामुळे संचित धन काही अंशी कमी होईल. तेव्हा खर्चांवर नियंत्रण ठेवावे. त्याच बरोबर बचतीवर लक्ष द्यावे. व्यापारासाठी काळ मिश्र फलदायी आहे. भागीदाराकडून विश्वासघात होण्याची संभावना आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना जर दुसऱ्या नोकरीसाठी प्रयत्न करावयाचा असेल तर ते तसे करू शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. तसे न केल्यास त्यांना आई-वडिलांची बोलणी खावी लागतील. प्राप्तीच्या स्त्रोतांवर लक्ष द्यावे लागेल. उगाचच वेळ वाया दवडू नये.
मकर: एखाद्या गैरसमजामुळे तणाव निर्माण होऊ शकेल. त्याचा प्रभाव मुलांवर होऊ शकतो. वैवाहिक जीवन सुखद होईल. जोडीदाराच्या भावनांचा आदर कराल. तसेच त्यांच्या कामात त्यांना सहकार्य कराल. आर्थिक समस्यांबाबत वडिलांशी चर्चा करावी लागेल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. व्यापारातील थकबाकी मिळण्याची संभावना आहे. व्यापारासाठी काळ काहीसा प्रतिकूल आहे. एखाद्या चुकीच्या निर्णयामुळे व्यापारात काही समस्या निर्माण होऊ शकतात. भागीदारीत व्यवसाय करत असाल तर भागीदाराकडून फसवणूक होण्याची संभावना आहे. नोकरी करणाऱ्यांनी सध्याची नोकरी चालू ठेवणे हितावह होईल. विद्यार्थ्यांसाठी काळ मिश्र फलदायी आहे. त्यांना कष्टाच्या प्रमाणात अपेक्षित फलप्राप्ती होणार नाही. असे असले तरी उच्च शिक्षणासाठी ते मार्गस्थ होऊ शकतील.
कुंभ: वैवाहिक जोडीदाराच्या कारकिर्दीत मोठी उसळी आल्याचे बघू शकाल. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्यावे लागेल, अन्यथा नात्यात काही नवीन समस्या उद्भवू शकतात. एखाद्या जुन्या ओळखीमुळे वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होऊ शकतो. आर्थिकदृष्ट्या काळ मिश्र फलदायी आहे. खर्चात वाढ झाल्याने बचतीचे पैसे वापरास घ्याल. ह्या आठवड्यात कारकिर्दीवर लक्ष केंद्रित कराल. व्यापारात भागीदारी करू शकता. ही भागीदारी हिताची असेल. नोकरीत प्रगती संभवते. त्यामुळे बरीच कामे होऊ शकतील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला आहे. ते आपले ज्ञान वाढविण्यावर आपले लक्ष केंद्रित करतील.
मीन: प्रेमिकेसाठी थोडा वेळ काढावा लागेल. विवाहितांना त्यांच्या जोडीदाराचे भरपूर सहकार्य व सानिध्य मिळू शकेल. जोडीदाराशी चर्चा करून मुलांशी संबंधित समस्या सोडवू शकाल. धन-धान्याची वाढ होईल. असे असले तरी खर्चात वाढ होईल. परंतु घाबरू नका. ते सहजपणे करू शकाल. व्यापारासाठी काळ मिश्र फलदायी आहे. योजनांचा लाभ होईल. परंतु जास्त लाभ न झाल्याने आपण त्रस्त व्हाल. नोकरीत वरिष्ठ कामगिरीने प्रसन्न होतील. विद्यार्थ्यांना मेहनत वाढवावी लागेल. त्यांना त्यांच्या मेहनतीचे यथायोग्य फळ नक्कीच मिळेल. त्यांना मनाजोग्या अभ्यासक्रमात प्रवेश मिळू शकेल. सहजपणे अभ्यास करू शकाल.