शूल-गंड योग: ५ राशींना अपार यश, शनी कृपेने मालामाल; नोकरीची नवी ऑफर, ‘या’ मंत्रांचा शुभ-लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2023 07:07 AM2023-09-02T07:07:07+5:302023-09-02T07:07:07+5:30

तुमची साडेसाती सुरू आहे? शनिवारी कोणते उपाय करावेत? ५ लकी राशी कोणत्या? जाणून घ्या...

०२ सप्टेंबर रोजी तिसरा श्रावणी शनिवार आहे. श्रावण शनिवारी अश्वत्थ मारुतिचे पूजन केले जाते. शनिवार हा नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी ग्रहाला समर्पित असल्याचे म्हटले जाते. साडेसाती आणि ढिय्या प्रभाव असलेले शनिवारी विशेषत्वाने शनी पूजन, नामस्मरण, जपजाप करतात, असे सांगितले जाते.

तिसऱ्या श्रावणी शनिवारी चंद्राचे भ्रमण गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीत असेल. तर उत्तराभाद्रपदा नक्षत्र असेल. सूर्योदयानंतर काही वेळ शूल नामक योग असून, त्यानंतर गंड योग सुरू होईल. या दोन्ही योगांच्या प्रभावाने या दिवसाचे महत्त्व वाढल्याचे सांगितले जात आहे.

श्रावणी शनिवारी जुळून येत असलेले योग तसेच शनी कृपेमुळे काही राशींसाठी संपत्तीत वाढ होण्याचा शुभ संयोग घडू शकेल. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. शनिवारी करायचे काही ज्योतिषीय उपायही सांगण्यात आले आहेत, ज्याने कुंडलीत शनीची स्थिती मजबूत होऊ शकेल. शनीदेवाचा आशीर्वादही प्राप्त होऊ शकेल.

आताच्या घडीला मकर, कुंभ आणि मीन राशीची साडेसाती सुरू असून, शनी स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत विराजमान आहे. साडेसाती आणि ढिय्या प्रभाव असणाऱ्यांनी शनिवारी शनी देवासह हनुमंतांचे विशेष पूजन, आराधना, उपसना, नामस्मरण करावे, असे सांगितले जाते. कोणत्या राशीच्या व्यक्तींना तिसरा श्रावणी शनिवार अनुकूल ठरू शकेल? जाणून घेऊया...

मेष राशीच्या व्यक्तींना तिसरा श्रावणी शनिवार शुभ ठरू शकेल. अडकलेले पैसे परत मिळू शकतील. बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या समस्यांपासूनही दिलासा मिळू शकतो. हितशत्रूंवर नियंत्रण ठेवण्यास सक्षम असाल. नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. विश्वासू सहकार्‍यांशी चर्चा करू शकतात. मुलांसोबत चांगला वेळ घालवू शकाल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. शनिदोषाचा प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी शनीमंत्रांचा यथाशक्ती जप करावा. हनुमंतांची यथाशक्ती उपासना, नामस्मरण करावे.

वृषभ राशीच्या व्यक्तींना तिसरा श्रावणी शनिवार लाभदायक ठरू शकेल. कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे अनेक कामे पूर्णत्वास जाऊ शकतील. भागीदारीत काम करत असाल, तर शनी देवाच्या कृपेने काळ अनुकूल असेल. कुटुंबात आनंद नांदेल. सासरच्या लोकांकडून आर्थिक लाभ होऊ शकतील. मदत करण्यास नेहमी तयार असतील. कुटुंबात सुख, शांतता आणि समृद्धीसाठी शनी चालिसाचे पठण किंवा श्रवण करा. गरजूंना मदत करावी.

मिथुन राशीच्या व्यक्तींना तिसरा श्रावणी शनिवार सुखद ठरू शकेल. व्यापारात तेजी दिसून येऊ शकेल. चांगले पैसे मिळू शकतील. मुलांकडून शिक्षणाशी संबंधित चांगली बातमी मिळू शकेल. आदर वाढेल. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. यथाशक्ती दान-धर्म करावा. शनी व हनुमानाच्या मंत्रांचा जप करावा.

धनु राशीच्या व्यक्तींना तिसरा श्रावणी शनिवार शुभ परिणामकारक ठरू शकेल. नोकरदारांना अधिकाऱ्यांकडून कौतुक आणि सहकाऱ्यांचे सहकार्य मिळू शकेल. विद्यार्थ्यांना शिक्षणात शिक्षक आणि वडिलांचे पूर्ण सहकार्य मिळू शकेल. अडथळे दूर होतील. मित्राच्या मदतीने व्यवसायात गती येईल. दीर्घकाळ रखडलेली कामे पूर्ण करू शकाल. कुटुंबातील सदस्यांसाठी वेळ काढू शकाल. सकाळी आणि सायंकाळी 'ॐ ऐं ह्लीं श्रीशनिश्चराय नमः' या मंत्राचा जप करणे उपयुक्त ठरू शकेल.

कुंभ राशीच्या व्यक्तींना तिसरा श्रावणी शनिवार अनुकूल ठरू शकेल. शनिदेवाच्या कृपेने धनवृद्धीचे संकेत आहेत. कोणत्याही सामाजिक व धार्मिक कार्यात सहभागी झाल्याने मान-सन्मान वाढेल. मित्र आणि प्रियजनांसोबत मजा-मस्ती करू शकाल. व्यवसायात कीर्ती सर्वत्र पसरेल. फायदा होऊ शकेल. अडथळे दूर करण्यासाठी पिंपळाच्या झाडापाशी दिवा लावावा. यासोबतच सकाळी आणि सायंकाळी 'ॐ शं शनैश्चराय नमः' या मंत्राचा जप करणे हिताचे ठरू शकाल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.