पैसा खर्च करण्यात 'या' चार राशींचे लोक असतात आघाडीवर; कधीही कंजुसपणा करत नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 04:43 PM2022-01-24T16:43:29+5:302022-01-24T16:49:38+5:30

१२ पैकी ४ राशी अशा आहेत, ज्याचे लोक पैसा खर्च करताना कोणताही कंजुसपणा करत नाही. तसंच यांचं राहणीमानही उत्तम असतं.

एखाद्या व्यक्तीचा स्वभाव त्याच्या कुंडलीवर आणि राशीच्या स्वामी ग्रहावर अवलंबून असतो. ज्योतिषशास्त्रात १२ राशी आहेत. सर्व राशींचे स्वरूप देखील भिन्न आहे.

काही लोक पैसे खर्च करण्यात कंजुस असल्याचं आपण म्हणतो. तर काही लोक इतका पैसा खर्च करतात की त्यांच्याकडे पैसा टिकतच नाही. काही लोक असेही असतात की ज्यांच्याकडे आर्थिक आवक कमी असली तरीही ते पैसे खर्च करण्यात मागेपुढे पाहत नाहीत. जाणून घेऊया कोणत्या आहेत या चार राशी.

वृषभ (Taurus) : वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. शुक्राच्या प्रभावाने जीवनातील सर्व सुख-सुविधा प्राप्त होतात. त्यामुळे वृषभ राशीचे लोक खर्च करण्यात आघाडीवर असतात. या लोकांना कंजूषपणा अजिबात आवडत नाही. हे लोक चविष्ट जेवणाचेही शौकीन असतात. या लोकांना महागड्या वस्तू खरेदी करण्याचा शौक असतो.

मिथुन (Gemini): जसे मिथुन राशीचे लोक पैसे कमावण्‍यात पुढे असतात, त्याच प्रकारे खर्च करण्यातही हे लोक आघाडीवर असतात. ते त्यांच्या सुखसोयींवर मनमोकळेपणानं खर्च करतात. जणू कंजुषपणा हा शब्द त्यांच्या त्यांच्या डिक्शनरीमध्येच नसतो. बुधाच्या प्रभावामुळे या राशीचे लोक खूप हुशार आणि बुद्धीवान बनतात. बुध हा व्यवसायाचा कारक मानला जातो. म्हणूनच हे लोक चतुराईने व्यवसायात पैसा कमावतात.

सिंह (Leo) : सिंह: सिंह राशीवर सूर्य देवाचा प्रभाव असतो. सूर्याच्या प्रभावामुळे या राशीच्या लोकांना लक्झरी लाईफस्टाईल आवडते. ज्याप्रमाणे सूर्य देवाला ग्रहांचा राजा म्हटले जाते, त्याचप्रमाणे सिंह राशीच्या लोकांनाही राजासारखे जीवन जगणे आवडते. सुख-सुविधांमध्ये कोणतीही कमतरता भासू नये म्हणून या राशीचे लोक कठोर परिश्रम करतात. ते ब्रँडेड गोष्टींवर भरपूर पैसे खर्च करतात.

तुला (Libra) : तूळ राशीच्या लोकांना महागडे छंद असतात. शुक्राच्या प्रभावामुळे या राशीच्या लोकांमध्ये हा गुण आढळून येतो. ज्योतिषशास्त्रात शुक्र हा भौतिक सुखांचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र चांगल्या स्थितीत असतो, त्याला सर्व सुख प्राप्त होते. हे लोक जिथे कुठे फिरायला जातात तिथे खूप पैसा खर्च करतात.